सर्वोच्य न्यायालयाच्या ‘ त्या ‘ निर्णया विरुद्ध आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
19

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

अनुसूचित जातीची वर्गवारी करून , त्यांना क्रिमिलेयर लावून आरक्षण निश्चित करण्या बाबत राज्य शासनास अधिकार असल्या बाबतचा जो निर्णय सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे तो अनुसूचित जातीवर अन्यायकारक असून आरक्षणाची टक्केवारी त्यामुळे कमी होईल व अनुसूचित जातीत विनाकारण असंतोष निर्माण होईल तेंव्हा राज्यशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा कार्यक्रमासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होत, त्यावेळी त्यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. तसेच सर्वोच्य न्यायालयाचा तो निर्णय आम्हास का मान्य नाही, त्या बाबत अनुसूचित जाती तील जनतेच्या काय भावना आहेत याची कल्पना देण्यात आली .
यावेळी मुकुंद सपकाळे , जयसिंग वाघ , सुरेश सोनवणे , रमेश सोनावणे , सुरेश तायडे , विनोद रंधे , चंदन बिऱ्हाडे , सोमा भालेराव , साहेबराव वानखेडे , जगदीश सपकाळे , महेंद्र केदारे , आकाश सपकाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here