साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस निमित्त येथील शिवसेना जामनेर शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला व जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण उपशहर प्रमुख कैलास माळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील खुशाल पवार ज्ञानेश्वर राठोड युवराज पाटील यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहुर शिवसेना शहर शाखेच्या वतीने येथील गणपती मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रवक्ता…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मातोश्रीमध्येसुद्धा शुभेच्छा देणाऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली. गेटवर मध्यभागी फुलांनी धनुष्यबाण(Dhanushyaban) साकारण्यात आला आहे. तसेच मातोश्रीच्या परिसरात शुभेच्छा देणारे बॅनर्सही लावण्यात आलेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी सामान्य शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरेंचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वडिलांना शुभेच्छा दिल्यात. आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत उद्धव ठाकरे गॉगल लावून, जीन्स घालून अत्यंत कुल दिसत आहेत.”माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी करत असलेली प्रत्येक…
जळगाव : प्रतिनिधी संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन गोबा भोई रा. वाघ नगर, जळगाव हे संगायो योजनेचे फार्म जमा करता. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे. तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी २७ जुलै रेाजी त्यांच्याकडे आईचे काम करून ३ तीन…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी हद्दतील कंजरवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत हिस्ट्रीसिटरवरील 12 गुन्हेगारांना तपासण्यात आले. दरम्यान, या कारवाईत 7 जणांविरुध्द गुन्हे दाखल करत 95 हजार 500 रुपयांचा अवैध गावठी दारुचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या आदेशाने व एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी परिसरातील 12 हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दपार केलेल्या 1 हिस्ट्रीसिटरचा तपास करण्यात आला. त्याचबरोबर रेकॉर्डवर असलेल्या सात गुन्हेगारांना शोधण्यात आले. यावेळी कंजरवाडा परिसरात पाच पोलिसांच्या टिम तयार करण्यात आली होती. या दरम्यान सात ठिकाणी धाडी टाकल्या असता. सात आरोपींविरुध्द गुन्हे दाखल…
जळगाव : प्रतिनिधी वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभाग जळगाव, यावल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे तसेच वन्यजीवचे व्याघ्रदूत ‘वाघ वाचवा’चा संदेश देत गावागावात जनजागृती करणार आहे कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, जळगाव उपवनसंरक्षक विवेक होशिंग, यावल उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा, टायगर कॉन्झर्वेशन ॲण्ड रिसर्च सेंटर मुंबईचे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे रवींद्र मोहोड सहभागी होणार आहेत. आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाची आणि खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपलेली असताना आज सुद्धा बांधकाम अपूर्णच असल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता आणि रावेर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांचा आणि संबंधित ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांचा प्रभाव असल्याचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याबाबत तसेच यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाबाबत कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता आणि ठेकेदार गजानन सोनार यांच्या मिलीभगत कड़े जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे तसेच यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात…
जळगाव : प्रतिनिधी शिवसेना व शिंदे सेनेतील राजकीय वाद वाढतच चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता थेट पूर्वी दिलेल्या साधनसामग्री काढून घेण्याचे प्रकार सुरू आहे. शिंदे गटाने गेल्या शुक्रवारी रुग्णवाहिका परत घेतल्यानंतर शिवसेनेकडून तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली.पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 27 जुलै रोजी सकालली येथील शिवसेना कार्यालय परिसरात ज्येष्ठ शिवसैनिकांंच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले . याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,महापौर जयश्रीताई महाजन,महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौप कुलभूषण पाटील,माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,नगरसेवक बंटी जोशी आदींची…
मुंबई : प्रतिनिधी सतत प्रयत्न करुनही अनेकदा यश पदरी पडत नाही आणि तिथेच आपल्या संयमाचा बांध फुटतो. जीवाचा आटापिटा करुनही एखादी गोष्ट मिळत नाही, त्यावेळी होणाऱ्या वेदना नेमक्या काय असतात याची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. पण, स्वप्नांचा पाठलाग करणं सोडण्यापेक्षा त्या स्वप्नांच्याच साथीनं मोठं होण्याचा प्रयत्न केलाय का कधी? केरळमधील एका व्यक्तीनं हा प्रयत्न केला. आयुष्यातील खाचखळगे त्याच्यासाठी प्रमाणाहून जास्तच आव्हानात्मक ठरले. पण, तो खचला नाही. विश्वास बसणार नाही, पण इडली आणि डोश्याचं पीठ विकून त्यानं कोट्यवधींच्या श्रीमंतीचा डोलारा उभा केला. या व्यक्तीचं नाव, मुस्तफा पीसी. मुस्तफा पीसी यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांचे वडील कुली होते. इयत्ता सहावीमध्ये…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील उचंदा आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचार्यांचे दुर्लक्ष झाल्याने अक्षरश: साथीच्या काळात रुग्णांना मरण यातनांना सामोरे जावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात नागरी सुविधांसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य अधिकार्यांना निवेदन दिले आहे. याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुका अंतर्गत उचंदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा देणारे कर्मचारी आरोग्य केंद्रात दिलेल्या वेळेवर येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी मनसेकडे केली होती. यावरुन मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य केंद्रा संदर्भात माहिती जाणून घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेचे सदस्य गजानन पाटील यांनी आरोग्य केंद्राजवळ पाहणी केली असता आरोग्य केंद्रात तापाने फणफणत असलेले रुग्ण वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे…