Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली “ संवाद -उपक्रम ” या अभिनव उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनां देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा व विविध प्रश्नांबाबत समाधान शोधण्याच्या उद्देशाने योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी दि. २७.०७.२०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ येथे तर इतर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यां समवेत रात्रभर मुक्काम करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संवाद उपक्रमांतर्गत सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत सामुहिक भोजनाचा आस्वाद घेत विविध विषयांबाबत संवाद साधला.…

Read More

मेष- दिवस चांगला आहे.  चिंता करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. जोडीदाराची मदत मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ टाळा. वृषभ- गरजेपेक्षा अधिक खर्च होईल. गेलेली संपत्ती पुन्हा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तींचा सन्मान करा. धनलाभ होण्याचा योग आहे. कुटुंबात सर्वजण व्यग्र असतील. निर्धनाला दान करा. मिथुन- आळस मागे ठेवा. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. संध्याकाळी दह्याचं दान करा. मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. धनलाभ होणार आहे. कर्क- आज तुमच्या राशीला फायदा मिळणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. करिअरमध्ये फायदा होऊन बऱ्याच गोष्टी मनाजोग्या होणार आहेत. सिंह- दुपारपर्यंत जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. आरोग्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर जयंती चौधरी विजेंद्र हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण यशस्वीतेसाठी सहाय्यक अतुल वंजारी, गोविंदा पाटील दीपक चौधरी, पोलिस मित्र मोजउद्दीन शेख, विनोद चाटे, योगेश पाटील, मेहमूद सय्यद, यांनी परिश्रम घेतलेे. तसेच याच फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षीही एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण करण्यात आले होते. मागील वर्षी लावण्यात आलेले वृक्ष हे संपूर्ण जगवल्यामुळे फाउंडेशनने समाधान व्यक्त केलेे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण राज्यपाल कोश्यारी सतत महाराष्ट्राचा अपमान करत असतात. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, अशी संतप्त प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मुंबईतून…

Read More

राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. राज्यपाल हे मानाचे पद आहे. त्यांनी खुर्चीचा मान ठेवावा. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. कोल्हापुरी वहान हे जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो तुम्ही लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करतात. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई (Mumbai)देशाची आर्थिक राजधानी (financial capital) म्हटलं जातं तेदेखील म्हणता येणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहून कडक इशारा दिला. आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल तर उगाच काहीही बोलू नका. महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करून मराठी माणसाला डिवचू नका, असा कडक इशारा राज ठाकरे…

Read More

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. काय म्हणाले दीपक केसरकर? मुंबईच्या उभारणीत सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र यात सर्वांत मोठा वाटा आहे तो मराठी माणसाचा, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एखाद्या समाजाने मुंबईतील पैसा काढला तर मुंबईत पैसा राहणार नाही असे बोलणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नसल्याने हे वक्तव्य केले असावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.…

Read More

मोबाइल फोन अ‍ॅपच्या माध्यमातून इन्स्टंट लोन देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक तसेच कर्ज वसूल करताना छळ करणाऱ्या रॅकेटमधील १४ जणांना मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १४ कोटी रुपये आणि २.१७ लाख अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेची क्रिप्टोकरन्सी असलेली ३५० बँक खाती गोठवली आहेत. गुन्हे शाखेचे संयुक्त आयुक्त सुहास वारके यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. वारके यांनी सांगितले की, ‘या वर्षी मे महिन्यात यासंदर्भात एक तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्याने अटकेची कारवाई करण्यात आली. मोबाइल फोन अ‍ॅपद्वारे इन्स्टंट लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचा सर्व वैयक्तिक डेटा आरोपींच्या कंपनीकडे जात असे. कर्जाची परतफेड करू न शकलेल्या लोकांचा डेटा…

Read More

राज्यपालांच्या मुंबई बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 4 ट्विट करत भाजपची कानउघडनी केली आहे. महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला.स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. मराठी माणसाला आवाहन आता तरी, ऊठ मराठ्या ऊठ, शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक…

Read More