साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुक्ताईनगर महावितरण विभागाच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड १३२ केव्ही येथून दुई,कर्की/कोठा येथे उच्च दाब वाहिनी ३३ केव्ही पुरवठा करण्याकरता सुरू असलेल्या कामांमध्ये विद्युत खांब व विद्युत तारांच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे सचिन पाटील, श्याम दांडगे प्रफुल पाटील, गणेश दुट्टे ,अभिषेक पाटील , मधूकरभोई,श्रीराम भोई, मंगेश…
Author: Saimat
साईमत लाईव्ह धुळे प्रतिनिधी धुळे शहर तरुणाच्या हत्येनं हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणी ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी धुळे पोलिसांनीही दोघांवर कारवाई केलीय. दोघा संशयितांना पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी धुळे पोलीस करत आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे…
मेष- आरोग्य सुधारेल. धनलाभ होण्याचा योग असला तरीही आज उत्पनापेक्षा खर्च जास्त असेल. महत्त्वाची कामं उरका. वृषभ- नवी नोकरी मिळण्याची संधी आहे. करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण घेण्याचा निर्णय घ्याल. सायंकाळपर्यंत धनलाभ होणार आहे. आज करड्या रंगाचं वस्त्र परिधान करा. मिथुन- महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळपर्यंत एखादा प्रवासयोग आहे. कर्क- नातेवाईकांशी उगाचा वाद घालू नका. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. एखादा मित्र भेटण्याची शक्यता आहे. सिंह- नोकरीच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळणार आहे. घरातील वातावरण अल्हाददायक असेल. कन्या- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासावर लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुळ- विचार चांगले ठेवा. व्यापारात लाभ होणार आहे. अडचणी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसर रेमंड कॉलनी समोरील अपनाघर कॉलनीतील विजयकुमार हिरेंद्रसिंग यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगष्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान(11हजार रू. किंमत असलेल्या) ओप्पो कंपनीच्ाा मोबाईलची चोरून नेल्याप्रकरणी औद्योगिक पोलिस स्टेशनला गु.र.नं.605/2022 भादंवि380 कलमान्वये गुन्हा दाखल झाला.प्रकरणी पुढील तपास औद्योगिक पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार पो.हे.कॉ.विजय पाटील करीत आहे.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी रिझव्र्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. यासह आता सध्याचा रेपो दर ५.४ टक्के इतका झाला आहे. याशिवाय २०२२-२३ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ ते ४.१ टक्के असा असेल. २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष जीपीडी वाढ ६.७ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेपो दर म्हणजे काय? बँकांना पत निर्मितीसाठी म्हणजेच दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो…
साईमत लाईव्ह जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथे एकाच रात्रीतून तीन जणांच्या घरातून मोबाईल व एकाच्या घरातून चांदीच्या 5 मूर्तीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घरांमध्ये चोरी करणारा समाधान गोकुळ सपकाळे (वय 28, रा. एसएमआयटीजवळ,मुक्ताईनगर जळगाव) हा पोलिसांना रात्रीच्या गस्तीत सापडला. त्याच्याजवळ चोरीची दुचाकी मिळून आली. चिंचोली येथे युवराज भीमराव पवार हे आपली पत्नी मनीषा, मुलगा राहुल, मुलगी सरिता, व सून मनीषा यांच्यासह वास्तव्यासह आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र झोपण्यापूर्वी त्यांनी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला. ही संधी साधून चोरट्याने घरात घुसून मोबाईलची चोरी केली. सकाळी उठल्यानंतर मोबाईल चोरी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली होती. राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी कलम १५३ अ या कलमाचा वापर करत अटक केली होती. हनुमान चालीसा प्रकरणात जामीनावर सुटका झालेले खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात राणा दाम्पत्याच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपरिषद यावल बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता योगेश मदने हे आपल्या बांधकाम विभागातील विविध कामे नियोजनपूर्वक तसेच मंजूर,प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराकडून कामे करून न घेता,झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व खात्री न करता ठेकेदारांना पूर्ण बिल अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करीत असतात.तसेच शहरात खाजगी,व्यावसायिक सुरू असलेली बांधकामे काही परवानगी घेतलेली आहेत तर काही परवानगी न घेता सुरू आहेत,अनेक बांधकामे बांधकाम परवानगीनुसारच होता आहेत किंवा नाही याची खात्री स्थापत्य अभियंता करीत नसल्याने यावल शहरात सर्रासपणे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत इत्यादी अनेक कामांमध्ये स्थापत्य अभियंता योगेश मदने यांचे दुर्लक्ष होत आहे याकडे गोड बोलणाऱ्या आणि शांत…
जळगाव: प्रतिनिधी 3 ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त महापौर जयश्री महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी तसेच कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर ,गायत्री पाटील, अशोक भारुडे, विनोद पाटील व कर्मचारी उपस्थित होते.