Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  आज दहीहंडी असून दहिहंडीवेळी किरकोळ दुखापत झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. यानुसार राज्यातील सर्व  शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात मागणी केली होती. यंदा राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आधीच जाहीर केली आहे. तसेच, गुरुवारी राज्य सरारने दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत गोविंदा पथकांना सुखद धक्का दिला. या…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी फोन पे कंपनीकडून बक्षीस लागल्याचे सांगून हिंदी भाषिक भामट्याने आरोग्य कर्मचाऱ्यास कॉल चालूच असतांना अवघ्या पाचच मिनिटात ४३ हजार,१२९ रु स गंडविल्याची घटना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी उघडकीस आली याप्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्याने औरंगाबाद येथील सायबर कॅफे विभागात दिलेल्या फिर्यादीवरून एका हिंदी भाषिक भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे सोयगावातील ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. रविराज शेळके असे फसवणूक झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात ते दि.१३ कर्तव्यावर असतांना त्यांना सायंकाळी दीपक शर्मा या नावाने फोन पे कंपनीतून बोलतोय असे सांगून तुम्हाला कंपनीकडून ११९९ रु.चे बक्षिसासाठी पात्र असल्याचे सांगून…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) बनोटी (ता.सोयगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी गुरुवारी (ता१८) झालेल्या निवडणुकीत बेबाबाई खैरनार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने विजयी जल्लोष करण्यात आला. मुरलीधर वेहेळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायत निवडणूकीत अकरा जागांपैकी आठ जागांवरती वर्चस्व राखत एकहाती सत्ता असल्याने पाच वर्षांसाठी मुरलीधर वेहेळे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदासाठी पाच सदस्यांना एका वर्षांसाठी नियुक्तीच्या फार्मल्यानुसार नाजीयाबी शेख यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी दिलेल्या राजीनामाने रिक्त पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मारोती धोंडकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या उपसरपंचपदासाठी च्या निवडणूक बेबाबाई खैरनार यांचा एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  भुसावळ आणि औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलवर गुरुवारी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी हॉटेलमधून डझनभर कपल्सला पकडले असून चौकशी कामी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान , या कारवाईने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलीस अवैध धंद्यांना लगाम घालण्यात अयशस्वी ठरत आहे. जळगावात अनेक ठिकाणी अवैध कुंटनखाने, सट्टा, जुगार अड्डे सुरू असून पोलिसांना देखील त्याची माहिती आहे. सर्व खुलेआम सुरू असताना देखील पोलीस चिडीचूप असल्याने संशय व्यक्त होतो. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या…

Read More

जगभरातील आयफोन युजर्सना (iPhone users) सध्या एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आयफोनमध्ये फेसबूक (Facebook) या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटवरील डार्क मोड बंद झाला आहे. हजारो युजर्सनी सोशल मीडियावर , फेसबूकच्या डार्क मोड फीचर (dark mode feature) संदर्भातील समस्येबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. फेसबूकच्या डार्क मोडचे काम अचानक बंद झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, ही समस्या त्या आयफोन युजर्सना सहन करावी लागत आहे, ज्यांनी फेसबूकचे iOS ॲप 379.0 व्हर्जन अपडेट (updated version)केले आहे. हे लेटेस्ट व्हर्जन काही क्रॅश दुरुस्त करण्यासाठी आणि जलद रित्या फीचर लोड करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. मात्र या नव्या अपडेटमुळे आयफोन युजर्सना फेसबूक वापरताना त्रास होत असल्याचे…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी येथील अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलीने अतिशय धाडसाने या लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून पळ काढला आणि थेट अंबड पोलीस ठाणं गाठलं. यानंतर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा विवाह बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई आणि मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट ओमान सिक्युरिटीची असल्याची माहिती हाती आली आहे. आज दुपारी हरिहरेश्वर समुद्राच्या किनारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली. या बोटीत कुणीही व्यक्ती नसल्याने आणखीच भीती व्यक्त करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला. आज विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एटीएसच्या चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या प्रकरणी चौकशीचे आदेश…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन  सुरू आहे. अधिवेशनाचा आज (१८ ऑगस्ट) दुसरा दिवस असून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरले जात आहे. विधानसभेच्या कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातील विधेयकावर छगन भुजबळ  यांनी भाष्य केले. समोर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून “काळी दाढी आणि पांढरी दाढी” याचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर मिस्कील  टिप्पणी केली. छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला. “आत्तापर्यंत अन्नधान्यसहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे. कर वाढवल्यानंतर त्याचा फटका…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालवलेले प्रगती प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेत वकृत्व व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी व सहभाग देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्तम असे सादरीकरण केले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, प्रमुख पाहुणे अनिल वाघ  स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रगती प्राथमिकचे उपशिक्षक मनोज भालेराव व बालवाडी विभागाच्या उपशिक्षिका वैशाली चौधरी यांनी काम पाहिले. “हर घर तिरंगा ” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चैताली पाटील हस्ते संस्था सचिव सचिनदुनाखे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सुवर्णा पाटील…

Read More