साईमत लाईव्ह प्रतिनिधी औरंगाबाद औरंगाबाद: नाशिक- हिंगोली या बसला आज पहाटे १ वाजेच्या सुमारास ढोरेगाव येथे अचानक आग लागली. यात संपूर्ण बस (क्र. mh 14-bt 3805) जळून खाक झाली असून २६ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. नाशिकच्या आगार क्रंमाक १ मधून रविवारी रात्री नाशिक-हिंगोली ही बस रवाना झाली होती. पहाटे १ वाजेच्या दरम्यान गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे बस आली असता इंजिनमधून धूर निघू लागला. चालक आर .डी. लोखंडे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बस थांबवली. वाहक एम. पी. नरोळे यांना याची माहिती देत दोघांनी बसमधील २६ प्रवास्यांना खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरून सुरक्षितस्थळी थांबले. याचवेळी संपूर्ण बस आगीने वेढली…
Author: Saimat
तुम्हीही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ब्राउझिंगसाठी गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. हा इशारा आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SERT-In) ने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. SERT-In नुसार, Google Chrome मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स सहजपणे संगणक हॅक करू शकतात. SERT-In ने यापूर्वी Apple iOS, Apple iPad आणि MacOS मधील बग्सबाबत अलर्ट जारी केला होता. गुगल क्रोममध्ये काय त्रुटी आढळल्यात? SERT-In च्या अॅडवायजरीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या सिस्टमवर क्राफ्टेड रिक्वेस्ट अटॅकर्स आर्बिटरी कोड एक्झीक्यूट…
साईमत लाईव्ह नवी दिल्ली प्रतिनिधी ओबीसी आरक्षणासंबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता पाच आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी विशेष खंडपीठ स्थापन करताना जैसे थे परिस्थिती ठेवाण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. ओबीसी आरक्षणाची परिस्थिती जैसे थे आहे. ओबीसी आरक्षणासाठी जे नवीन खंडपीठ स्थापन होणार आहे, त्यावर पाच आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. आगामी ९२ नगर परिषदांसाठी आरक्षण लागू होणार की नाही यावरही पाच आठवड्यांनंतर निर्णय होणार आहे. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली थोडं…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हे कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. मारेकर्यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे.…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी :- येथे दिनांक २४/८/२०२२ पासून ते २९/८/२०२२ या सहा दिवसामध्ये माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बेरोजगारानी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन रामदास पाटील यांनी केले आहे. भारत सरकारच्या PASARA एक्ट -2005 च्या अंतर्गत प्रशिक्षण देऊन S.S प्रा .लिमिटेड या ISO मान्यताप्राप्त कम्पनीतर्फे कायमस्वरूपी नौकरीसाठी भर्ती मेळाव्याचे आयोजन केले आहे , भर्ती होणाऱ्या तरुणांना S.S. प्रा .लिमिटेड तर्फे सिलेक्शन करूँन नौकरी उपलब्ध केली जाणार असून , प्रोविडेंट फण्ड व सम्पूर्ण परिवारस मेडिकल सुविधा ,ग्रेचुटी ,PF पेंशन…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील हिने बापाची सेवा केली मुलाचा उणीव भासू दिली नाही. धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो.असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमाताई ने वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला निलीमाताईच्या निर्णयाचे समाज बांधवांनी कौतुक केले.निलीमाताई व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती,पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे.पाटील कुतुबात…
साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद वाळूज,- यंदा वाळूज भागातही आगामी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. गेल्या 15 वर्षापासून उत्सवात भर असलेल्या वाळूज(ग्रामीण) गणेश महासंघाची कार्यकारीणी (दि.19) शुक्रवारी निवडण्यात आली.अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक बबन गायकवाड हे होते.नुतन पदाधिकारी असे- अध्यक्ष- भय्या पठाण , उपाध्यक्ष-ललीत राऊत, नंदू सोनवणे , सचिव रतन आंबिलवादे, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष सचिन पानकडे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड, सहकार्याध्यक्ष नदिम झुबंरवाला,संघटक सचिन मुंढे आदी.सल्लागार- सईदा पठाण,योगेश आरगडे,नासेर पटेल,मुकेश बोहरा,मनोज जैस्वाल, नंदकुमार गांधिले, अमजदखा पठाण, शेख जमील,उत्तम भोंडवे,ईस्माईल पठाण,काकासाहेब चापे,शरदचंद्र अभंग, विजय साबळे, माणिक राऊत,नंदु राऊत,सचिन काकडे,उमर पटेल, दयानंद साबळे,अविनाश गायकवाड, लक्ष्मण पाठे,खालेद पठाण, संजय खोचे सिध्येश्वर ढोले, नामदेव…
साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त वाळूज औद्योगिक नगरीत बजाज नगरात श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात पार पडला प्रवचन,श्री कृष्ण जन्मा वरील प्रसंग,आदी कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर बजाज नगर ट्रस्टच्या वतीने आयोजित केल्याने श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात चैतन्यमय आणि भक्ती रसाचे वातावरण निर्माण झाले होते ११:४५ वाजता श्रीकृष्ण जन्म महापूजेस शुभारंभ झाला. सुरुवातीला भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीस पंच द्रव्यांनी महाभिषेक संपन्न झाला यावेळी महानुभाव पंथाचे विनोद बाबा शास्त्री आंबेकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाला 101 पदार्थाचा नैवद्य भरवून महिलांनी श्रीकृष्णाच्या बाल रूपाचे पूजन करत श्रीकृष्णाचा पाळणा हलवत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण मंदिर…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय अजय चव्हाण (वय-२३ रा. पिंप्राळा) असे मयताचे नाव आहे. या संदर्भात अधिक असे की, रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून वाद झाला. वाद वाढल्याने दोन्ही गटातील १० – १५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यानंतर अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार नामक तरुणाचं भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर वार केले.…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी पियुष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले पियुष पाटील यांच्या कार्याची दखल घेवून युवक प्रदेशाध्यक्ष अतिष गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष दिव्यांक सावंत, प्रसाद कोंडे, प्रदेश सर्चिटणीस योगेश पाटील यांच्या आदेशाने पियुष पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जळगाव महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.