Author: Saimat

साईमत लाईव्ह  कजगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव कजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण मधील बस स्थानक,स्टेशन रोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत,कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील पक्के व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा तेहतीस नागरिकांनी संबंधिताना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. बाबत वृत्त की कजगाव बस स्थानक प्रमाणेच स्टेशनरोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील, कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील काहि पक्के व दुकानांचे हे सारे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी येथील तेहतीस नागरिकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली असुन निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण बाबत सरपंच ग्रामविकास…

Read More

साईमत लाईव्ह  कजगाव प्रतिनिधी नुकताच ५ सप्टेंबर रोजी राज्यभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाने केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव म्हणून या दिवशी वर्षातून एक दिवस शिक्षकांचा सम्मान होत असतो. यादीदिवशी गावपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत शिक्षकांना विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. राज्य शासनातर्फे शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव व येणाऱ्या पिढीला घडविण्यासाठी व समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर कर्तृत्ववान शिक्षकांना राज्य शासनाने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. साधारणतः हा पुरस्कार शिक्षक दिनी म्हणजेच दिनांक ५ सप्टेंबर रोजी देण्याचा प्रघात होता निदान शिक्षक दिनी किंवा शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूक वाहन धारकांकडून RTO परिवहन विभागाच्या काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दर महिन्याला १ ते ५ तारखे दरम्यान अवैध हप्ते वसूल केले जातात तसेच जे वाहन चालक हप्ते देत नाहीत त्यांच्या गाड्या जमा करून त्रास दिला जात असल्याचा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. दि.३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे माल धक्क्याजवळ स्थानिक वाहतूक करणाऱ्या काही ट्रक RTO विभागाने जमा केल्या असल्याचे कळाले. मी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता संबंधित वाहन धारकांनी त्यांना होणारा त्रास माझ्याजवळ कथन केला. याबाबत मी RTO विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले मात्र…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी वृध्दापकाळात थकलेल्या शरिरास आधाराची गरज असते यात इतर साहित्यां पेक्षा मानसिक आधार अधिक महत्वाचा असतो तेव्हा पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले ते पाल येथील संत श्री.लक्ष्मण चैतन्यजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल मध्ये साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की आश्रम मधील जेष्ठांना काय आवश्यक आहे हे जाणुन घेत त्या नुसार त्यांनी साहित्य खरेदी करून हे साहित्य जेष्ठांना वितरण करण्यात आले.वेदनांनी ग्रासलेल्या जेष्ठांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हेचं माझे पुण्य संचय असे देशील डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले.…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये बोगस/खोटे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त दोन शिक्षकांची शिक्षक भरती लाखो रुपये घेऊन करण्यात आली असल्याची तक्रार संस्थेचे सभासद हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर (समाजसेवक,रा.खिर्णीपुरा यावल),आसिफ खान ताहेर खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल),युनूसखान रशिद खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल) यांनी केल्याने यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून यावल तालुक्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. गुरुवार दि.8 सप्टेंबर 2022 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक उपसंचालक आणि जळगाव…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी आई व मुलगी नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्या. तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी व पूजा किराण्याचे मालक भागवत मधुकर पाटील यांच्या पत्नी सौ. रुपाली (वय ३२) या कन्या कु. रितिकाला (वय १० ) सोबत घेवून दि. ८ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे थायरॉईडच्या टेस्टसाठी चाळीसगाव येथील शैलेश हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांनी नाव नोंदणी केली. नोंदणी क्र. ८० असल्याने मुलीला नाश्ता व पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या, त्या वेळेत आई व मुलगी बेपत्ता झाल्या. फोन स्विच ऑफ येत असल्याने भागवत पाटील हे तांदुळवाडी फाट्याजवळ दुपारी ३…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : दहशतवादी याकूब मेमनच्या  कबरीचं सुशोभीकरण केल्याचं काल समोर आलं होतं. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये  दफन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या वृत्ताने काल एकच खळबळ उडाली होती. अखेर आज मुंबई पोलिसांनी कारवाई करुन याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील बडा कब्रस्तानमधील मेमनच्या कबरीची पाहणी करतील. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचं वृत्त बुधवारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देत असतांना ही दुरदैवी घटना घडली. पाचोरा येथील पोलिस उपाधिक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येवून गणपती साठी घरी आला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी नांद्रा ता. पाचोरा येथील श्रीराम टेकडीवर आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, मार्केट कमिटी च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुरंगी – बांबरुड जि. प. गटाचा शिवसेना – युवासेनेचा जनसंवाद मेळावा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रविण ब्राम्हणे पाचोरा, पंढरीनाथ गोविंदा पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), योगेश पाटील, गणेश पाटील, सुभाष तावडे, विनोद तावडे, शिवाजी तावडे, डी. के. पाटील, इम्रान पटेल, विश्वनाथ सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, रमेश पाटील (निंभोरी), बापू पाटील (माहेजी), हेमराज पाटील (मोहाडी), जयविर पाटील (दहिगाव), योगेश…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथे यंदाच्या गणेशोत्सवात मोक्षभूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या निर्धारात्मक कल्पकतेतून ही आरास साकारण्यात आल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे. मानसिंगका मिलच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली .गेल्या दीड महिन्यांपासून सुरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंगाली कारागरांचा जमू या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती येथे साकारत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या…

Read More