साईमत लाईव्ह नवी दिल्ली प्रतिनिधी :- सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरू आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दोन्ही गटांच्या वकिलांनी पुढील दोन दिवसांत आपापला युक्तिवाद पूर्ण करावा, हे प्रकरण याच आठवड्यात मार्गी काढायचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालयातील घडामोडींना वेग आला आहे. तसेच न्यायालय काय निर्णय घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलावलेल्या विशेष सत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यपालांचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित होता, असेही सिंघवी म्हणाले. शिवाय राज्यपालांविरोधात अनादर नोटीस काढावी,…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल मध्ये इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव सर तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. दादासाहेब पवार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस ,व्यवस्थापक एकनाथ कोलते यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व शिक्षकांविषयी आपली मनोगत व्यक्त करुन शाळेस भेटवस्तू दिली. प्राचार्य डॉ यादव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि आपले ध्येय उंच गाठावे असे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक डॉ दादासाहेब पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निरोप समारंभासाठी मुख्याध्यापक…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळवून त्यातून मनोरंजन व समाज प्रबोधन देखील व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलनास चांगला प्रतिसाद मिळवून उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्या बद्दल मान्यवरांनी कौतुक केले. दि. १७ फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता मीरा लॉन्स या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या डॉ प्रशांत गोवर्धने,माजी सैनिक तुषार खरात,विलास घुले,विजय गडाख,परशराम कंक्राळे,सचिन कंक्राळे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलनाने करण्यात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या लावण्या,जेजुरीच्या खंडेरायाचा जागर,शिवजयंतीची गीते,नाटके, भारुड,लावण्या,हिंदी चित्रपटातील गाणी,देशभक्तिपर गीत,सरस्वती वंदना,गणेश वंदना,आदिवासी…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे काचे व्यासपीठ म्हणजे शाळेचे संमेलन मदरसा तालीमूल कुराण आणि मदरसा इस्लाहुल बनात निंबायती येथील वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात अल्हाज हजरत मौलाना अहमद मोहम्मद पटेल यांनी सांगितले, यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात मदरसा मधील १६ मुलींनी आपला मोमीन कोर्स पूर्ण केला तसेच यात ५०० मुलामुलींनी भाग घेतला त्यात २५ मुले आणि मुलींनी यश संपादन केले यावेळी यशस्वी मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदरसा येथील वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठावर हाजी सईद साहब लोहारी,हाजी आबीद हाजी गुलाम गौस बागवान पिंपळगाव हरेश्वर, अनवर मनवर तडवी,मौलाना अक्रम सलीम शेख,मौलाना अयुब,मास्तर सादिक सलाबत तडवी,जमिल पटेल, यांची उपस्थिती होती आणि…
कोमल पाटील मासिक पाळी म्हणजे चारचौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळी विषयी खुले आम चर्चाच होत नाही. या प्रक्रियेबद्दल वापरात येणारे आरोग्यदायी शब्दही मोकळेपणाने वापरले जात नाही. अडचण आहे. बाजूला बसली आहे, कावळा शिवला पासारखे शब्द वापरून या प्रक्रियेचे हेटाळणी केली जाते आजही समाजामध्ये ह्या गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलले जात नाही. ऐवढेच काय तर दुकानात किंवा केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकीन सुध्दा दबक्या आवाजात, आजूबाजूला कोणी ऐकत तर नाही ना, याची खात्री करूनच मग मागितला जातो आणि दुकानदारही तो सॅनिटरी नॅपकीन अगदी कागदात गुंडाळून देतो कशाला हवी एवढी लपवाछपवी या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभले. त्याच काळात तिला अशी वागणूक का द्यावी? परमेश्वराने…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी पाणी साठा मुबलक असताना सुद्धा नियोजन शून्य कारभारामुळे यावल शहरात सकाळी 2 वाजता पाणीपुरवठ्याची वेळ तसेच कचरा व साफसफाई अनियमित होत असल्याची तक्रार यावल शहर युवा सेने तर्फे करण्यात आली. यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.6 रोजी दिलेल्या निवेदनात यावल शहर युवा सेना प्रमुख सागर देवांग,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख योगेश राजपूत,सरचिटणीस विजय पंडित,शहर उपप्रमुख संतोष धोबी शिवसैनिक विवेक अडकमोल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात काही भागात सकाळी (रात्री) 2 वाजता पाणीपुरवठा केला जातो बऱ्याच भागातील नागरिक हे गाढ झोपेत असतात त्यामुळे या नागरिकांना एवढ्या रात्री पाणी भरणे शक्य होत नाही,त्यामुळे सुमारे दोन तास…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी वडापाव हा सर्वसामान्य ते सेलेब्रिटीपासून सगळयांचा एकदम आवडता पदार्थ आहे .आणि आजच्या दैनंदिन जीवन चालत बोलता खातायेणार एकदम सोपा पदार्थ म्हणजे वडापाव, आज हा पदार्थ देशात सर्व ठिकाणी मिळतो, आणि आता या वडापाव मध्ये किती न काई नवीन प्रकार लोक आता बनवायला लागले. पण तुम्हाला माहित आहे का या वडापाव चा जन्म कुठे झाला व कोणी केला. चला त मग जाणून घेऊया वडापाव चा जन्म कसा झाला व कोणी केला. वडापावचा जन्म हा मुंबईत अशोक वैद्य यांच्या सुपीक डोक्यातून १९६६ मध्ये झाला. दादरच्या स्टेशनजवळ चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी १९६० साली वडे , पोहे विकण्याचे दुकान सुरु…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी भडगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना निमित्त भडगांव येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आज दि.६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे,कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल व तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी (प्रविण चौरे) गुटका विक्रीस शासनाने बंदी घातलेली असताना ही ओझरला मात्र पोलिसांच्या आशिर्वादाने गुटका विक्री जोरात सुरू असुन अव्वाच्या सव्वा दराने घुटका विक्री करणारे जोमात आहे. गुटख्यावर शासनाने बंदी घातलेली आहे तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य धंदे बंद केलेले असताना ओझर गांवात मात्र गुटका, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत असुन पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत असल्यामुळे ओझरमध्ये बंदी कागदावरच असुन गुटकाविक्री बेकायदेशीर रित्या जोमात सुरू आहे. शासनाचे ओझर मधील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग…
साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात अधिक असे की, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीता बसस्टॅड जवळील वडिलांच्या दुकानावर असतांना भूषण नामदेव पाटील, जीवन प्रभाकर चव्हाण, चेतन रवींद्र पाटील (तिघं रा. कजगाव) या तिघांनी दुकानावर येत पिडीत मुलीशी अश्लिल संवाद साधत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.