मदरसा तालीमुल कुराण आणि मदरसा इस्लाहुल बनात निंबायती येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
1

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे काचे व्यासपीठ म्हणजे शाळेचे संमेलन मदरसा तालीमूल कुराण आणि मदरसा इस्लाहुल बनात निंबायती येथील वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात अल्हाज हजरत मौलाना अहमद मोहम्मद पटेल यांनी सांगितले, यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात मदरसा मधील १६ मुलींनी आपला मोमीन कोर्स पूर्ण केला तसेच यात ५०० मुलामुलींनी भाग घेतला त्यात २५ मुले आणि मुलींनी यश संपादन केले यावेळी यशस्वी मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मदरसा येथील वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठावर हाजी सईद साहब लोहारी,हाजी आबीद हाजी गुलाम गौस बागवान पिंपळगाव हरेश्वर, अनवर मनवर तडवी,मौलाना अक्रम सलीम शेख,मौलाना अयुब,मास्तर सादिक सलाबत तडवी,जमिल पटेल, यांची उपस्थिती होती आणि संपूर्ण मदरसा तालीमुल आणि मदरसा इस्लाहुल बनात निंबायतीचे सहकार्य या वार्षिक स्नेहसंमेलनात होते.

या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना मौलाना अहमद महंमद पटेल यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे मदरसा येथील स्नेहसंमेलन आणि यापुढेही निंबायती मदरसा यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही अशाच प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करत राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले या वार्षिक स्नेहसंमेलनात निंबायती ग्रामस्थासह विद्यार्थी व पालक वर्गाची मोठया संख्येने उपस्थिती होती, निंबायती गावचे मा.उपसरपंच शमा तडवी, सांडू तडवी,मजीद शेख, तौशिब तडवी,अश्रफ तडवी यांच्या सह इतरही या ठिकाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here