साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल शहरासह यावल मंडळात खाजगी व्यावसायिक तसेच शासकीय स्तरावरील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटसह बाधकाम व्यवसायाची अनेक कामे सुरू आहेत या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी वाळू प्रत्यक्ष दिसून येत असल्याने कोण म्हणतं यावल मंडळात अवैध वाळू वाहतूक आणि विक्री बंद आहे…? अशी चर्चा परिसरात रंगली आहे. यावल एसटी स्टँड आवारात श्री काळभैरव यांच्या साक्षीने मंदिराच्या समोर सार्वजनिक वापराच्या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून वाळू साठा प्रत्यक्ष सर्वांसमक्ष पडून आहे, याचप्रमाणे यावल शहरासह यावल मंडळात अनेक ठिकाणी सार्वजनिक व्यवसायिक आणि शासकीय स्तरावर अनेक बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या ठिकाणी सर्रासपणे यावल परिसरातील नदी नाल्यांमधील तसेच तापी, गिरणा नदीतील वाळू डपर,…
Author: Saimat
????️ हिंदू नववर्ष तथा आपला पहिला सण शालिवाहन शके 1945 चैत्र शु.1 बुधवार दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडवा… ????????चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तराचा आरंभ होतो, प्रत्येकाने आपल्या घरी ध्वजारोपण करावे, निंब पत्राचे भक्षण,वर्ष फळाचे श्रवण, नवरात्र ला आरंभ या दिवशी तैलभ्यंग करावे. ???? 4 महिन्यापर्यंत जलदान करावे,पाणपोई सुरु करण्यास असमर्थ असेल त्याने उदकाने कुंभ भरून वेदोक्त ब्राम्हणाच्या घरी द्यावा. ????गुढीपाडवा ला करावयाचे उपाय… ????️ग्रंथात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा ज्या वारी आला त्या वारा संबंधित देवतेचे पूजन करावे म्हणजे संपूर्ण वर्ष चांगले जाते. म्हणजे 22 तारखे ला बुधवार ???? बुधवार हा विष्णू देवता.. विठ्ठल रुखमाई… श्री कृष्ण यांचा आवडता वार……
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी फैजपूर शहरात यावल रावेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या आश्रय फाऊंडेशन कडून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिलांचा सन्मान हा स्तुत्य कार्यक्रम फैजपूर शहरातील शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ संपन्न झाला.या कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील १५ महिला व तीन महिला संघांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिन सेवा पंधरवाडा निमित्त दि.19 रविवारी रोजी फैजपूर शहरात हा कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यधापिका शुभांगी महाजन होत्या तर प्रमुख उपस्थितीत आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ.विलास पाटील,सचिव डॉ. पराग पाटील,डॉ.राजेश चौधरी,डॉ.दिलीप भटकर,डॉ नितीन महाजन,डॉ.भरत महाजन,डॉ.प्रशांत जावळे, डॉ.ताराचंद सावळे,डॉ.…
साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे स्वर्गीय कालिदास विठाेबा नेमाडे यांच्या स्मरणार्थ बहुभाषिक कालिदास काव्यमहाेत्सव यंदा आयाेजित केला आहे. रिंगराेडवरील संताेषी माता हाॅल येथे रविवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजेपासून हा महाेत्सव सुरू हाेईल. काव्यमहाेत्सवाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी समीक्षा पुरस्कार’ जाहीर झालेले डाॅ. मधू खराटे भूषवतील. निमंत्रित कवींमध्ये प्रा. डाॅ. जे. पी. सुचिक, हामीद भुसावली, हरीषकुमार नागदेव, प्रा. डाॅ. रघुनाथ कश्यप, प्रा. डाॅ. सुधा खराटे, रेल्वे सुरक्षा बलाचे निवृत्त आयुक्त रमेश सरकाटे, प्रा. डाॅ. सुरेश कुसुंबीवाल, हारुन उस्मानी, सीमा भारंबे, जयश्री काळवीट, संध्या भाेळे अशा १२ जणांचा समावेश आहे. निवेदकाची भूमिका संत गाडगेबाबा…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी बोदवड शहरातील माळीवाडा भागात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना प्रकाश माळी वय ३४ याने त्याच्या विरुद्ध पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग ठेऊन योगेश सुभाष माळी वय ३६ यांचे घरासमोर येऊन शिवीगाळ सुरू केली आणि त्याच वेळी रस्त्याने हिरो होंडा एच एफ डीलक्स क्र.एम एच २० एफ के ४२६४ मोटरसायकलने जाणारे अनिकेत श्रावण उमाळे, गणेश रामा देवरे रा रेवती यांना अडवले व दगडाने मारण्याचा धाक दाखवून पळवून लावले व त्या मोटरसायकलची पेट्रोलनळी काढून त्यातील पेट्रोल बाटलीत घेऊन योगेश माळी यांचे घरासमोरील चारा कुट्टी भरलेले कुट्टीचे शेड पेटवून दिले व उरलेले पेट्रोल मोटारसायकलवर टाकुन पेटवून दिली .या माथेफिरूने योगेश माळी…
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या सोनखांब गावाजवळ गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. या अपघातात तालुक्यातील मंगरुळ येथील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे. पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (वय २५) हे ट्रकमध्ये चोपडा नवापूर तालुक्यातील वेले येथून टरबूज भरून सुरतकडे जात होते. नवापूर तालुक्यातील सोनखांब जवळ हा ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. यात ट्रक चालक राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील वैले येथील शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले. यामुळे ट्रकमध्ये…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्रि गावी शेतकऱ्याच्या कापूस मोजणीत मापात केल्या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने दंडात्मक कारवाई केली. प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा गायकवाड यांनी 11000 रुपये दंडाची आकारणी कापूस व्यापाऱ्याकडून केली. यावल तालुक्यात पांढऱ्या सोन्याची म्हणजे कापूस खरेदी करताना मापात पाप करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे.एका शेतकऱ्याने कापूस व्यापाऱ्याची लबाडी प्रत्यक्ष पकडून तक्रार केली असता सहाय्यक निबंध सहकारी संस्था चोपडा हे सध्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आहे. त्यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेतली व 11 हजार रुपये दंडाचे आकारणी केली…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल नगरपालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रभारी कारभार सुरू असल्याने लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचा प्रभाव नसल्याने यावल नगरपालिकेतील सर्व कारभार संबंधित ठेकेदार, कर्मचारी,विकासक,मध्यस्थी दलाल आपल्या सोयीनुसार करून घेत असल्याने यावल नगरपालिकेच्या कारभारावर आणि नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात मोठा विपरीत परिणाम झाला आहे. नगरपरिषद मालकीच्या व्यापारी संकुलनातील गाळाधारकांना नोटीसा देऊन सुद्धा संबंधित गाळे धारक आपला गाळा यावल नगर परिषदेला रिकामा करून देत नाही, नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे,त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा वाहतूक करून विलगीकरण व त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ठेक्यात मोठा गैरप्रकार,भ्रष्टाचार दैनंदिन रित्या सर्रासपणे सुरू आहे. यावल शहरातील दैनंदिन…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी नगरपरीषदेचा मुख्याधिकारी यांचा चार्ज तात्पुरता चोपडा नगरपरीषद मुख्याधिकारी यांचे कडे आहे.परंतु यावल येथील लोकसंख्या व नगर परिषदेच्या कामकाजाची व्याप्ती पाहता शहर विकासाच्या दृष्टीने नियोजन शुन्य व विकासात्मक कामे व्यवस्थीत होत नाहीत. पर्यायी यावल नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत केली आहे. चोपडा येथील यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी यांना यावल साठी पुरेसा वेळ मिळत नसल्या कारणाने यावल शहरातील लोकांच्या मुलभुत अडचणी वेळेवर सुटू शकत नाहीत तसेच निवडणुक प्रकीया लांबणीवर पडल्यामुळे नगरसेवक नसुन प्रशासक नियुक्ती आहे,तरी शहरातील अडचणी खुप वाढत असुन त्यांचा निपटारा करणेकामी प्रशासन अपुर्ण…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी शहरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर एका विवाहितेची छेडखानी करून तिच्या पतीला देखील बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ रोजी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर चालत जात असतांना पाठीमागून ४ मुले पिडीतेचा पाठलाग करत होते. त्यापैकी एका उंच मुलांने मला बेबी असा आवाज दिला. तर अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले, चंद्रकात राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, अनिरुध्द उर्फ मोन्याचा भाऊ (पुर्ण नाव माहीत नाही, तिघं रा. अमळनेर) हे सर्व पिडीत विवाहितेचा पाठलाग करत होते. अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले याने पिडीतेच्या डाव्या…