साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील उजनी दर्ग्यासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना १८ मे रोजी घडली आहे. तालुक्यातील उजनी दर्ग्या समोरील चिंचेच्या झाडाखाली वराडसिम येथील शेख सादिक शेखर रसुन मण्यार यांनी त्यांच्या मालकीची लाल रंगाची मोटरसायकल (एम एच १९ सिटी ३२५३) १८ मे रोजी लावली होती. मात्र पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी येवून पाहिले असता मोटरसायकल गायब होती. त्यांनी परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी शेख सादिक मण्यार यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शशिकांत महाले करीत आहे.
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी परीक्षांचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या तीन वर्षीय अभ्यासक्रमांचे निकाल प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेवून निकाल जाहीर केले जाणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान करण्याच्या पध्दतीमध्ये एक वाक्यता आणण्याच्या दृष्टीने सर्व विषयांचे एकत्रित गुण मिळवून पदवी प्रदान करावी. केवळ शेवटच्या वर्षातील दोन सत्रांचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता संपूर्ण कालावधीतील सर्व सत्रांचे गुण विचारात घेतले जावेत असे आदेश दिले होते. याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने ठराव देखील मंजूर केला होता. त्याची…
साईमत जळगाव प्रतिनिधी रणरणत्या उन्हात भीषण पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. यापार्श्वभुमीवर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी तिघ्रे गावात पाणीटँकर पाठवून नागरिकांची तहान भागविली. भीषण पाणीटंचाईमुळे तिघ्रे गावातील रहिवाशांना पिण्याचे पाणी देखील मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थीतीत डॉ.उल्हास पाटील यांनी सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून स्व:खर्चाने पाण्याचे टँकर पाठविले. गावात पाण्याचे टँकर येणार ही माहिती मिळताच तिघ्रे वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी टँकरभोवतील कुटूंबातील पुरुष, महिला, मुले यांनी गर्दी केली. याबद्दल तिघ्रे गावकर्यांनी डॉ.उल्हास पाटील यांचे आभार मानले.
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या सायन्स आणि हुम्यानिटिज विभागातर्फे विध्यार्थानसाठी सामूहिक ध्यान साधनेचे आयोजन करण्यात आले होते. सहजयोग ध्यान केंद्राचे धीरज संगीत, संध्या पाटील, रुपाली चौधरी, श्री.दांडगे, चंदु पाटील आणि अविनाश सावळे यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेत योग, ध्यान साधना आणि विध्यार्थी जीवनात होणारा फायदा या विषयी प्रात्यक्षिक द्वारे समजावण्यात आले. या कार्यशाळेत प्रथम, द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विधार्थ्यानी सहभाग नोंदवला. शैक्षणिक जीवनात ध्यान साधना एकग्रेसाठी लाभ प्राप्त करून देते व विचार सरणीत बदल घडतो असे मत विध्यार्थानी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य संजय दहाड आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रज्ञा विखार, विभाग प्रमुख किरण…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून झालेल्या अंकेक्षणातून ” अ “दर्जा प्रदान करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून दर तीन वर्षासाठी शैक्षणिक अंकेक्षन केले जाते. त्याप्रमाणे महाविद्यालयाने तीन वर्षाची कामकाजाची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज करून पाठविले होती. अनेक बाबींची माहिती महाविद्यालयाने विद्यापीठाला सादर केली होती. विद्यापीठाने संपूर्ण माहितीची खात्री करून महाविद्यालयाला ” अ “दर्जा प्राप्त असल्याचे कळविले. महाविद्यालयाचा शैक्षणिक व गुणात्मक आलेख उंचावण्यासाठी कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांचे आशीर्वाद तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, संस्थेचे…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी घरी सोडून देण्याचा बहाणा करत सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधम तरुणाने दुष्कृत्य केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. घटनेप्रकरणी पिडीत अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सात वर्षाच्या बालिकेला स्टेशन रोड परिसरातून संशयीत आरोपीने स्कुटीवर बसवले. तुला घरी सोडून देतो असा बहाणा करत त्याने तिला न्यायालय परिसरातील टेनीस मैदान भिंतीच्या आडोशाला नेत तिच्यासोबत दुष्कृत्य केले. हा प्रकार पिडीत बालिकेने तिच्या आईला कथन केला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल…
साईमत कजगाव प्रतिनिधी कजगाव.ता.भडगाव येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्मघाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९)याला दिनांक १३ च्या संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उष्मघाताने अचानक त्याचा मृत्यू झाला नेहमी हिरारीने मित्रांच्या गोतावळ्यात राहणारा हसतमुख तरुण मुलगा अचानक गेल्याने कजगाव परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत तरुणांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी,आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे. मयत अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला चिरंजीव होता त्याच्यावर दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता कजगाव येथे शोकाकुल वातावरणात…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने थायरॉईड ग्रंथीने ग्रस्त दोन रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून दिलासा देण्यात यश मिळविले आहे. रुग्णांना नुकताच रुग्णालयातून निरोप देण्यात आला असून, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी विभागाच्या वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश भास्करराव पाटील (वय ३२, रा. भडगाव) यांच्या गळ्याला गेल्या १ वर्षापासून गाठ झालेली होती. त्यांचे कुटुंब अत्यंत साधे व मध्यमवर्गीय आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात तपासणी केली. तेथे वैद्यकीय पथकाने ही गाठ थायरॉईड ग्रंथीची असल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सुरेश पाटील यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक/लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या परीक्षा २२ मे ऐवजी २५ मे पासून सुरु होतील. विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा पुढील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विधी विद्याशाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ मे ते २ जून या कालावधीत होणार आहेत. तसेच बी.ए. एल.एल.बी. सेमीस्टर ३,४,७, ८, ९, १० व एल.एल.बी. सेमीस्टर ३, ४, ५, ६ या सर्व वर्गांच्या लेखी परिक्षा १० जून पासून सुरु होतील. विधी पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा…
साईमत मुंबई प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएस पक्षाला धूळ चारत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता स्वबळावर काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकाचा विचार केल्यास तिथे कोणतेच सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडला, तर ते बदलत असते. यावेळी आम्ही तो ट्रेंड तोडू शकू असे वाटत होते. पण, ते आम्ही तो ट्रेंड तोडू शकलो नाही. २०१८साली भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत…