कजगाव येथे उष्मघाताने तरुणाचा मृत्यू

0
2

साईमत कजगाव प्रतिनिधी

कजगाव.ता.भडगाव येथील एकोणतीस वर्षीय तरुणाचा उष्मघाताने मृत्यू झाल्याने कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
कजगाव येथील रहिवासी अक्षय रत्नाकर सोनार (वय२९)याला दिनांक १३ च्या संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उष्मघाताने अचानक त्याचा मृत्यू झाला नेहमी हिरारीने मित्रांच्या गोतावळ्यात राहणारा हसतमुख तरुण मुलगा अचानक गेल्याने कजगाव परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत तरुणांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी,आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे. मयत अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला चिरंजीव होता त्याच्यावर दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता कजगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मे हिटच्या तडाख्याने सध्या जिल्ह्याला हैराण करून सोडले आहे दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढत चालले असल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे त्यात आता एका तरुणाचा उष्मघाताने दुदैवी मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

“”:गावातील तरुण मुलगा गमावल्याने समाजमन सुन्न दरम्यान अचानक गावातील तरुण मुलगा उष्म घाताने मृत्युमुखी झाल्याने कजगाव येथे मोठी शोककळा पसरली आहे अचानक मुलगा गेल्याने मयत तरुणाचा दीड वर्षीय मुलगा आपल्या वडिलांना आर्त हाक देत होता तर मयताच्या पत्नी, आई, वडील, व भावाचे धाय ठोकून रडणे पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातही पाणी आल्याचे दिसून आले गावातील तरुणाची हृदय हेलावून टाकणाऱ्या दुर्दैवी घटनेने समाजमन सुन्न झाले आहे मयताला श्रद्धांजली म्हणून सुवर्णकार समाज बांधवानी तसेच संपूर्ण सराफ बाजारातील व्यवसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने कजगाव परीसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here