साईमत सोयगाव प्रतिनिधी कर्जाच्या ओझ्याखाली नैराश्य आल्या मुळे सोयगावात अल्पभूधारक शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे सहा वाजता शहरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे सोयगाव शहर सुन्न झाले असून, सोयगाव शहरात कर्जाला कंटाळून दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे. शहरातील नारळी बाग भागातील अतुल राजेंद्र देसाई (वय ३०) असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून त्याचे कुटुंबियांच्या नावावर शेती तारण करून घेतलेले वाहन कर्ज तीस लाख रु आणि शेतीच्या खरीप हंगामासाठी घेतलेले ७० हजार रु जिल्हा बँकेचे कर्ज असे एकूण तीस लक्ष ७० हजार रु इतके कर्ज कुटुंबावर असून या कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेने नैराश्य आलेल्या अतुल…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींना मंजुरी मिळण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फुंडकर, राजेश टोपे, नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरुन चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. या विहिरींच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत फेर भूजलसर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजलसर्वेक्षण करून प्रलंबित…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने (Maharshtra Government) राज्यातील 9 वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical College) मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही वाढणार आहेत. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यानंतर एमबीबीएसच्या (MBBS) 900 जागा वाढणार आहेत. आता महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 32 झाली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वाशीम, वर्धा, अमरावती, जालना, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार आहेत. नवीन महाविद्यालयांच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने शासन निर्णय (जीआर) काढला आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्यानंतर राज्यात एमबीबीएसच्या 900 जागाही वाढतील, असे त्यात म्हटले आहे. नीट…
साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्यातील दोषींवर अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज रामपूर येथील असंख्य ग्रामस्थ व तालुक्यातील ग्रामस्थ व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा तहसील कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रामपूर घरकुल घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ गेल्या तीन वर्षापासून सातत्याने करीत होते त्या अनुषंगाने अक्कलकुवा पंचायत समिती मार्फत चौकशीचा फार्स दाखविण्यात आला मात्र चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींवर कारवाई करण्यास पंचायत समिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने चार मुळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा…
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री आणि ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली नाही. या मुळे अनेक चर्चना उधाण आले होते .पवार यांची भूमिका काय? ते यु टर्न घेणार का ? यावर तर्क लावले जात असताना मात्र आज राष्ट्रवादी ने 21 पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता खवले आहे . महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री मंत्री पदाची तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या 9 जेष्ठ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली .या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी…
साईमत मुंबई प्रतिनिधी खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी श्री मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास…
साईमत जळगांव प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कृतियुक्त व स्वानुभवातून शिक्षण देणे महत्वाचे ठरते. या पद्धतीनुसार प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ‘हवेला वजन’ असते. हा हवेचा गुणधर्म विद्यार्थ्यांना स्वानुभवातून समजावा यासाठी त्यांनी ते विद्यार्थ्यांचा कृत्युयुक्त सहभाग घेऊन त्याना हवेलाही वजन असते हे सिद्ध करून दाखवले.यात त्यांनी सारख्या आकाराचे दोन फुगे घेतले, एक स्ट्रॉ ,तसेच एक बारीक दोरा घेतला.सर्वप्रथम त्यांनी स्ट्रॉ घेतला. स्ट्रॉ ला मध्यभागी दोरा बांधला व असा टांगला की तो बरोबर आडव्या रेषेत राहील.स्ट्रॉच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधले. स्ट्रॉ आडव्या रेषेत राहील. आता त्यांतील एक फुगा काढला आणि तो…
साईमत पाचोरा प्रतिनिधी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा (अग्निदाग देण्यात आला) दहन करण्यात आला व महिला कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारले गेले, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला या व्हिडिओमध्ये 100% सत्यता असणार या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा) यांच्याकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात तहसील ऑफिस मध्ये माननीय तहसीलदार साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी दीपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, नरेन्द्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, एडवोकेट दीपक पाटील, अनिल…
साईमत बोदवड प्रतिनिधी लुक्यातील सुरवाडे, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सरदार कंपनीच्या खतांमुळे कपाशी पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. कपाशीचे पाने उलटे पडून त्यांच्यावर पांढऱ्या रेषा उमटून रोपांची वाढ खुंटली आहे. या शेतकऱ्यांनी जय अंबिका कृषी केंद्र बोदवड येथून हे खत खरेदी केलेले आहे. या दुकानधारकांनी त्यांच्या गोडाऊन मधील सरदार कंपनी च्या नावाचे खतांच्या बॅगा सुरावाडा व बोरगाव व इतर गावांमध्ये खताचे ब्याग विक्रीसाठी उपलब्द करून दिले होते . शेतकऱ्यांनी या गोडाऊन मधुन रासायनिक खताच्या बॅगा वापरल्याने सुरवाडाव व बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या कपाशीचे भारी नुकसान झाले. त्यांनी खते टाकल्याच्या काही चार ते पाच दिवसांमध्ये त्यांच्या कपाशींचे पाने उलटे झाले आणि वाढ…
भारत (India) आणि फ्रान्स (France) हे अनेक शतके परस्परांचे मित्र राहिले आहेत. भारतावरचा इंग्रजांचा डोळा आणि पुढे त्यांनी काबीज केलेली भारताची सत्ता यांचाही या मैत्रीला एक सबळ कोन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुरतेत फ्रेंच वखारीला हात लावला नव्हता. फ्रेंचांनी राजापूरची वखारही महाराजांच्या परवानगीने चालवली आणि बदल्यात मराठ्यांच्या सैन्याला उत्तम दारुगोळा पुरविला. पुढे इब्राहीम खान गारदी यांच्या नाविक दलाला प्रशिक्षित करेपर्यंत ही मैत्री वाढली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत सर्वाधिक लक्षणीय करार लष्करी सहकार्याचे झाले आहेत.भारत लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक पाणबुड्या तर घेणार आहेच पण हिंदुस्थान एरोनॉटिक्स विकसित करीत असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टरला फ्रेंच बनावटीची इंजिने असणार आहेत.आजवर…