Author: Saimat

पाहा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून आपले मत मांडताना https://www.youtube.com/live/rIx6a0sui1c?feature=share

Read More

        चालू आर्थिक वर्षात भारताचा (India) विकास दर ६.१ टक्के राहील असे भाकित आंंतरराष्ट्रीय नाणे निधीने केले आहे. गेल्या एप्रिलमध्ये अंंदाज व्यक्त करताना नाणेनिधीने हा दर ५.९ टक्के राहील असे म्हटले होते.जागतिक विकास दराबाबतचा अंदाजही अल्पप्रमाणात  नाणेनिधीने उंंंचावला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे.जागतिक विकास दरात ०.२ टक्के वाढ होऊन तो या वर्षी तीन टक्के असेल, असा अंदाज नाणेनिधीने व्यक्त केला आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये बाजारपेठा व अर्थव्यवस्थांची स्थिती सुधारत असल्याचे हा वाढीव अंदाज एक निदर्शक आहे.गेले वर्ष-सव्वा वर्ष जग महागाईवाढीच्या उच्चदराने ग्रस्त होते.८.७ टक्क्यांवरून हा दर या…

Read More

साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शंकर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ चौकात बेताल वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. येथून पुढे जात आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान च्या नावाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली देशाचा चुकीचा इतिहास सांगत असून तरुणाईचे माथे फिरविणारे जातीय वादी भडकाऊ वक्तव्य करीत आहेत. नुकतेच अमरावती येथे बोलतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अक्षेपार्य वक्तव्य करुन गांधीजींचे वडील मुस्लीम असल्याचे बोलले आहे. तसेच या अगोदर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नूतन मराठा महाविद्यालय हे मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर असून प्रशिक विदयर्थी संघटनेची स्थापना याच महाविद्यालयात झाली आहे , सत्यशोधक समाज ही चळवळ सुद्धा याच महाविद्यालयातुन चालत असे , राज्यस्तरीय सत्यशोधकि साहित्य संमेलन यशस्वी करण्यात तसेच मागास व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना फक्त दहा रूपयात प्रवेश देवून एक नवी ओळख निर्माण केली असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले . नूतन मराठा महाविद्यालयातिल माजी विदयर्थी मेळावा ३० जुलै रोजी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असता वाघ बोलत होते . या प्रसंगी अनिल पाटील , प्रा. सुनील गरुड़ , जयप्रकाश महाडिक ,…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर (Muktainagar) सह जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठवडा उलटूनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास शासन आपले दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारला दिला. मुक्ताईनगर सह जिल्ह्यात ढगफुटी,पुरामुळे शेतकऱ्यांची पूर्णता वाहतात झालेली असून शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहे, शेती वाहून गेलेली आहे पिकं पूर्णतः उध्वस्त झालेली आहे तसेच नदीपात्रालगत गावातही पुरामुळे मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील हजारो शेतकरी बेघर झालेले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची घोषणा केली परंतु आठवडा उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे शिंदे सरकार हे…

Read More

साईमत ओझर प्रतिनिधी महाराष्ट्र जंपरोप असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक (Nashik) जिल्हा जंपरोप असोसिएशन, अस्मिता दर्शन महिला मंडळ नाशिक आणि स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व्या ज्युनियर गटाच्या महाराष्ट्र राज्य जंपरोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या आग्रा रोड येथील शुभमंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातून यजमान नाशिक समवेत धुळे ,परभणी, नंदुरबार, बुलढाणा, मुंबई उपनगर ,रायगड, ठाणे, पुणे सोलापूर ,सोलापूर ,जालना यवतमाळ, अमरावती ,बीड ,लातूर पालघर ,सांगली ,अहमदनगर छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नांदेड, अशा एकूण २२ जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मुलांमध्ये पालघर संघाने यजमान नाशिकचा पराभव करून वीजेतेपद मिळवले. तर ,मुलींच्या गटात यजमान नाशिकच्या संघाने…

Read More

साईमत यावल प्रतिनिधी आज गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून अचानक मोकाट गुरांनी ठिय्या आंदोलन केले याबाबत संपूर्ण यावल शहरात चर्चेचा विषय सुरू झाला आहे. यावल नगरपरिषदेत प्रशासक राज सुरू असल्याने यावल शहरातील प्राथमिक सुविधांकडे यावल नगरपालिकेचे 90% दुर्लक्ष होत आहे.नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात समस्यांबाबत काही आजी माजी नगरसेवक यावलकरांच्या हितासाठी, विविध समस्यांबाबत आणि कोणत्याही बाबतीत आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत नसल्याने नगरपरिषदेच्या दैनंदिन व इतर काही महत्त्वाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विविध समस्यांबाबत काम कोणी कसे करावे..? याबाबत संभ्रमात पडले आहेत. प्रभारी मुख्याधिकारी आणि प्रशासकराज असल्याने ठोस…

Read More

साईमत कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव:येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षरोपन करण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षरोपण व प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप व वृक्षारोपण शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कजगावसाठी शंभर झाडे व झाडांना संरक्षण जाळी वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने देण्यात आली, यावेळी सरपंच रघुनाथ महाजन,उपसरपंच शफी मणियार, केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील,वैद्यकिय अधिकारी डॉ.दीप्ती मगर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक सोनवणे ग्रा.प.सदस्य विजय गायकवाड,माजी सरपंच मनोज धाडीवाल,अनिल टेलर,राजेंद्र चव्हाण,जे.के पाटील, जि.प.मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गोसावी,मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन,दिनेश…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी हल्लीच राष्टवादीमध्ये बंड करून सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) साध्य राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपला कारभार सांभाळत आहेत. पण ते आता लवकरच महाराष्ट्र (Maharashtra) राज्यचे मुख्यमंत्री होतील असे दावे पक्षतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सातत्याने केले जात आहे. २२ जुलै रोजी म्हणजेकी चार दिवसापूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी राष्टवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनकडून होर्डिंग लावण्यात आले होते, त्यावर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे अनेक नेते आपआपले मतं यक्त करत आहेत. दुपारी अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी प्रसारमाध्यमांशी संभाषण साधला, यावेळी पटेल याना देखील हाच प्रश्न…

Read More

साईमत पाचोरा प्रतिनीधी उबाठा सेना (shivsena uddhav balasaheb thackeray) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा भडगाव तालुक्यातिल सर्वच गावांमध्ये सुमारे ५ हजार झाडांची लागवड करून त्यांचे संगोपण करण्याचा संकल्प उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेउन बोलुन दाखवला. शिवसेना शिवतिर्थ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे,तालुका प्रमुख शरद पाटिल,युवासेना उपजिल्हा प्रमुख संदिप जैन,शेतकरी सेनचे जिल्हा प्रमुख अरूण पाटिल,रमेश बाफना,विलास पाटिल,अभिशेष खंडेलवाल,हरिष देवरे,मिथुन वाघ,नंदु पाटिल,शुभम पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना वैशाली पाटील म्हणाल्या की,उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना,युवासेना व महिला…

Read More