साईमत मलकापूर प्रतिनिधी चाळीस बिघा परिसरातील अभ्यासिका ही सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित अशी राहणार असून ही अभ्यासिका विदर्भातील पहिल्या क्रमांकावर असावी या संकल्पनेतून निर्मिती केली जात आहे. किंबहुना याच संकल्पनेची पूर्तता व्हावी या अनुषंगाने आ.राजेश एकडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या धर्तीवर आ.एकडे यांनी निर्मिती सुरू असलेल्या अभ्यासीकेची पाहणी करीत न.प.चे बांधकाम अभियंता आकाश वाघ यांचेशी बांधकाम बाबत चर्चा करीत कामाच्या योग्यतेबाबत सूचना दिल्या. आ. राजेश एकडे यांचे प्रयत्न आणि संकल्पनेतून तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून शहरातील चाळीसबिघा परिसरात न. प. शाळा क्रमांक ४ टीपी स्कीम नं. १ मधील भूखंड क्रमांक २४८ वर सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित ६ कोटी १२…
Author: Saimat
साईमत मलकापूर प्रतिनिधी येथील डॉ. प्रशांत पाटील यांनी ९ लाख ५९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याची घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आली. बुलढाणा येथील पथकाने गोपनीय माहिती वरून डॉ प्रशांत पाटील यांच्या दवाखान्यात धाड टाकुन कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, मलकापूर येथील चाळीस बिघा परिसरातील गणेश नगर येथील डॉ. प्रशांत पाटील यांच्या दवाखाना असुन या मध्ये महावितरण कंपनीचे वीज मीटर दत्तात्रय पांडुरंग पाटील या नावाने असुन या वीज मीटरचा वापर डॉ प्रशांत पाटील हे करीत असुन या वीज मीटर ची गोपनीय माहिती महावितरण कंपनीच्या बुलढाणा वीज चोरी पथकाला मिळाली त्या वरून मलकापूर येथे ९ ऑगस्ट रोजी…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात मुबलक पिकणाऱ्या केळीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा भाग म्हणून बनाना क्लस्टर व्हीलेज निर्माण करून व्यक्तिगत लाभाच्या गोदाम योजनेतून प्रत्येक केळीच्या शेताच्या बांधावर कोल्ड स्टोरेज उभारता येणार असल्याने जिल्ह्याच्या उत्पादन क्षमतेला उंची प्राप्त व्हावी म्हणून शिवार तिथे गोदाम योजनेला जिल्हा प्रशासन प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देणार असल्याची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीनंतर आ.शिरीष चौधरी यांची शिफारस घेवून शिरसाळा मारोती आत्मनिर्भर फार्मर प्रोड्युसरचे तज्ञ संचालक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात अध्यक्ष भगवान देवराम वंजारी, व्यवस्थापकीय संचालक सुभाष पोतदार, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे, रावेर तालुका…
साईमत साकेगाव ता. भुसावळ वार्ताहर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार भुसावळ विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या. यात साकेगाव येथील आनंद (बबलु) पुंडलिक धनगर यांची उपजिल्हा युवा अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली. भुसावळ विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा चिटणीसपदी हेमंत पुरुषोत्तम बऱ्हाटे, उपजिल्हा युवा अधिकारी आनंद (बबलु) पुंडलिक धनगर, तालुका युवा अधिकारी सूरज प्रमोद पाटील, शहर युवा अधिकारी पवन गणेश बाक्से यांची नेमणूक करण्यात आली. नवनियुक्तांचे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, विस्तरक चैतन्य बनसोडे, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत शर्मा, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत,…
साईमत भुसावळ प्रतिनिधी जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब तर्फे शहरात जनजागृती अभियान राबवण्यात आले. शहरातील रिक्षांवर चार विषयावर बॅनर लावण्यात आले. भुसावळ शहरातील वीस रिक्षावर वेगवेगळी बॅनर लावण्यात आले. बॅनरवर पाणी वाचवा पृथ्वी वाचवा, पाण्याची नासाडी थांबवावी, पाण्याचा वापर जपून करावा या साठी जन जागृती करण्यात आली. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे, खालवत चाललेली भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रतेकांनी पावसाचे पाणी जमिनीत जीरवणे गरजेचे आहे. सद्या पाऊस समाधानकारक होतोय हेच पावसाचे पाणी रेन वॉटर हा्वेस्टिंग सिस्टम आपापल्या घरात बसविले तर आपल्या गच्ची वरील पाणी आपल्याच बोरिंग मधे जीरेल व भूजल पातळी वाढविण्यास मदद होईल. अन्नाची नासाडी थांवण्यासाठीचे बॅनर बऱ्याच समारंभ, हॉटेल्स व…
साईमत भुसावळ प्रतिनिधी अधिक मासानिमित्त श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सुरभी नगर भुसावळची एक दिवसीय तीर्थक्षेत्र भेट सहल दिनांक 9 रोजी उत्साहात पार पडली. तीर्थक्षेत्र भेटीत वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी जवळील श्री साईमंदिर, मेहुण व कोथळी येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई, नवीन मुक्ताबाई मंदिर, महान तपस्वी चांगदेव महाराज मंदिर , हरताळे येथील श्रावणबाळ समाधी मंदिर, शिरसाळे येथील श्री हनुमान मंदिर,वरणगाव जवळील श्री नागेश्वर मंदिर, आदिशक्ती साडेतीन पीठ मंदिर व वेल्हाळे येथील पुरातन श्री महादेव मंदिर आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या. तीर्थक्षेत्र भेटीत विजय चौधरी, अशोक ढाके, जयश्री इंगळे, सरोज सपकाळे, मनिषा टोपरे या सभासदांनी सुंदर भक्ती गीते सादर केलीत. प्रवासात…
साईमत मलकापूर प्रतिनिधी केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अपंग जनता दल सामाजिक संघटना स्वातंत्र दिन १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयावर अपंगांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन करणार आहे. अपंगांना जलद गतीने न्याय व हक्क मिळावा म्हणून केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु अमरावती विभागात हा कायदा फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे…
साईमत बोदवड प्रतिनिधी मी माझ्या आयुष्यात काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपले करियर करत असतांना शोधणे महत्त्वाचे आहे, तरुणांना समाजातील रोजगारासाठी महत्त्वाच्या संधी हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे. असे आवाहन ‘निर्माण ‘चे कार्यक्रम संचालक अमृत अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री सन्मानित डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे ते सुपुत्र आहेत . बोदवड येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने बंग यांचे व्याख्यान घेण्यात आले. ‘ निर्माण: अर्थपूर्ण करिअरच्या शोधात ‘ या विषयावर घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन रेमेडियल व ब्रिज कोर्स समितीतर्फे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन…
साईमत , चाळीगाव ; प्रतिनिधी चाळीसगाव हे गुटखा विक्रीचे केंद्र असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली. चाळीसगावातील गोदामांमध्ये गुटखा साठवून तो देशभर पाठविला जातो. गुटखा विक्रीतून चाळीसगावात करोडो रुपयांचा टर्न ओहर असल्याचे बोलले जात आहे. येथे वारं धाडी टाकून गुटखा जप्त केला जात असल्यामुळे त्यात असल्याचे स्पष्ट होते गुरुवारी सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरा पर्यंत तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी अतिक्रमण करून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेत भरगच्च पगारावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. पण दरमहा नियमित पगार घेऊन या पथकातील कर्मचारी काम न करता पत्त्यांचा डाव मांडत असतात. शहरातील महात्मा गांधी मार्केट समोर असलेल्या पार्किंगच्या शेड मध्ये हा डाव सुरू असतो. या संदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. महापालिका आयुक्तांपर्यंत तो पोहोचल्याची माहिती आहे. हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांमुळे अतिक्रमण वाढून अनेक रस्त्यांचा जीव गुदमरत आहे. टॉवर चौक, कोर्ट ते गणेश कॉलनी, रेल्वे स्थानक, फुले मार्केट परिसर याशिवाय शहरात वेगवेगळया भागात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत.…