साईमत भुसावळ प्रतिनिधी अधिक मासानिमित्त श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ सुरभी नगर भुसावळची एक दिवसीय तीर्थक्षेत्र भेट सहल दिनांक 9 रोजी उत्साहात पार पडली. तीर्थक्षेत्र भेटीत वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी जवळील श्री साईमंदिर, मेहुण व कोथळी येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई, नवीन मुक्ताबाई मंदिर, महान तपस्वी चांगदेव महाराज मंदिर , हरताळे येथील श्रावणबाळ समाधी मंदिर, शिरसाळे येथील श्री हनुमान मंदिर,वरणगाव जवळील श्री नागेश्वर मंदिर, आदिशक्ती साडेतीन पीठ मंदिर व वेल्हाळे येथील पुरातन श्री महादेव मंदिर आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या. तीर्थक्षेत्र भेटीत विजय चौधरी, अशोक ढाके, जयश्री इंगळे, सरोज सपकाळे, मनिषा टोपरे या सभासदांनी सुंदर भक्ती गीते सादर केलीत. प्रवासात…
Author: Saimat
साईमत मलकापूर प्रतिनिधी केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी या कायद्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अपंगांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अपंग जनता दल सामाजिक संघटना स्वातंत्र दिन १५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयावर अपंगांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन करणार आहे. अपंगांना जलद गतीने न्याय व हक्क मिळावा म्हणून केंद्र सरकारने नविन अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात आणला व हा कायदा सक्तीने लागू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु अमरावती विभागात हा कायदा फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे…
साईमत बोदवड प्रतिनिधी मी माझ्या आयुष्यात काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपले करियर करत असतांना शोधणे महत्त्वाचे आहे, तरुणांना समाजातील रोजगारासाठी महत्त्वाच्या संधी हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे. असे आवाहन ‘निर्माण ‘चे कार्यक्रम संचालक अमृत अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री सन्मानित डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे ते सुपुत्र आहेत . बोदवड येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने बंग यांचे व्याख्यान घेण्यात आले. ‘ निर्माण: अर्थपूर्ण करिअरच्या शोधात ‘ या विषयावर घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन रेमेडियल व ब्रिज कोर्स समितीतर्फे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन…
साईमत , चाळीगाव ; प्रतिनिधी चाळीसगाव हे गुटखा विक्रीचे केंद्र असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली. चाळीसगावातील गोदामांमध्ये गुटखा साठवून तो देशभर पाठविला जातो. गुटखा विक्रीतून चाळीसगावात करोडो रुपयांचा टर्न ओहर असल्याचे बोलले जात आहे. येथे वारं धाडी टाकून गुटखा जप्त केला जात असल्यामुळे त्यात असल्याचे स्पष्ट होते गुरुवारी सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरा पर्यंत तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी अतिक्रमण करून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेत भरगच्च पगारावर कर्मचारी नियुक्त केले आहेत. पण दरमहा नियमित पगार घेऊन या पथकातील कर्मचारी काम न करता पत्त्यांचा डाव मांडत असतात. शहरातील महात्मा गांधी मार्केट समोर असलेल्या पार्किंगच्या शेड मध्ये हा डाव सुरू असतो. या संदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. महापालिका आयुक्तांपर्यंत तो पोहोचल्याची माहिती आहे. हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांमुळे अतिक्रमण वाढून अनेक रस्त्यांचा जीव गुदमरत आहे. टॉवर चौक, कोर्ट ते गणेश कॉलनी, रेल्वे स्थानक, फुले मार्केट परिसर याशिवाय शहरात वेगवेगळया भागात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी प्रतिबंधक कारवाईच्या प्रस्तावात तारीख न देता जामिनावर मुक्तता करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबुराव जोंधळे (वय ४७, रा.शास्त्रीनगर, प्लॉट नंबर १६, कापड मिल मागे, चाळीसगाव) यास गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता तहसीलमधील दालनातच अटक करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, ३० वर्षीय तक्रारदार यांच्या पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरीता तसेच मदत करण्यासाठी…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेसोबतची युती तुटली तेव्हा भाजप नेते गिरीश महाजन अर्ध्या चड्डीत फिरत होते, अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजनांवर शरसंधान साधताना केली आहे. शिवसेना-भाजपची युती उद्धव ठाकरे यांनीच तोडली होती, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केला होता. त्यावर संमिश्र प्रतिकिया उमटत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनीही मोदींच्या या दाव्याची पाठराखण करत युती तुटण्याचे खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना – भाजप युती तुटली तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरत होते. तेव्हा ते कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हते. त्यांना…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांचं हेलिकॉप्टर भरकटले होते. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने परत फिरले. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँिंडग करण्यात आले. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या दिशेनं निघाले. मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री िंशदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँिंडग करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून पुन्हा…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करुन रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी चार एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, २० विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. कुठल्याही मोठ्या आजाराचे निदान करायचे असल्यास पॅथॉलॉजी लॅबमधून विविध चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. आपणही डोळे झाकून संबंधित लॅबकडे जाऊन चाचण्या करून घेतो. ह्या पॅथॉलॉजी लॅब पात्रताधारक तंत्रज्ञांकडून चालवली जाते की नाही, याचा विचार कोणी करत नाही. मात्र, आता हा विचार करण्याची व्ोळ आली आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरु करणासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी सरकारच्या विविध संस्थांअंतर्गत ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्याच्या संख्येत मोठी घट करण्यात आली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय अंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी घट करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. बार्टी संस्थेकडून आता ८६१ च्या ऐवजी २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, तर सारथीमधील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६०० वरून ५० वर आणण्यात आली आहे. महाज्योतीमध्ये देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये घट करण्यात आली असून ती १२०० वरून थेट ५० वर आणण्यात आली आहे. तर टीआरटीआय १४६ च्या ऐवजी १०० जणांनाच शिष्यवृत्ती देण्य़ात येणार आहे. सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या…