साईमत, मुंबई ः प्रतिनिधी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत होणार आहे. तर या निवडणुकांसाठी मनसे, िंशदे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सिनेटच्या निवडणुकीवर ज्यांची सत्ता त्यांच्यासोबत मुंबईतली युवाशक्ती असे जवळपास समीकरण तयार झाले असल्याचं म्हटले जात आहे. आतापर्यंत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पाहायला मिळाली आहे.
Author: Saimat
साईमत, पाचोरा ः प्रतिनिधी येथील िंशदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जिवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसात केली आहे. पाचोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. या प्रकरणावर भाष्य करणारे एक वृत्त संदीप महाजन यांनी दिले होते. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरात गेल्या महिन्यात शिवाजीनगर-हुडको भागात लहान मुलांच्या भांडणावरून, तसेच के.सी. पार्कजवळ वाळूमाफियांकडून खंडणी वसुलीसाठी गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच औद्योगिक वसाहतीतील फातिमानगर भागात पुन्हा गुरुवारी सकाळी 11 वाजता गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोफ्लदवण्यात आला असून कुसुंबा येथील स्वप्नील उर्फ सोपान चंदुसिंग परदेशी (वय 25) या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील व्ही. सेक्टरमधील प्रभा पॉलिमर कंपनीसमोर गुरूवारी सकाळी 11 वाजता जुन्या वादातून…
साईमत सोयगाव प्रतिनिधी बहुलखेडा येथे जागतिक आदिवारसी दिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुलखेडा ग्रामविकास अधिकारी योगेश सपकाळ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ईदबार तडवी,हनिफ तडवी,दगडू तडवी,शकिल तडवी,जाकिर तडवी,अनवर तडवी,न्ईम तडवी, भैया तडवी,आमिर तडवी,आबिद तडवी,माजिद तडवी,कबीर तडवी,वसिम तडवी,जाकिर हुसैन तडवी,सुल्तान तडवी, मुसा तडवी, मेघराज राठोड,सुनिल पाटील,आत्माराम पवार आदी उपस्थित होते.
साईमत प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी ‘पंच प्रण प्रतिज्ञा’ महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गाने मनपा प्रांगणात सकाळी ठिक 10 वाजता घेतली. यावेळी सदरची ‘पंच प्रण शपथ’ ही महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून त्यांचे समवेत मनपाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे दिली. यावेळी अधिकारी कर्मचारी व सन्माननीय सदस्यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून ‘ पंच प्रण शपथ’ घेतली . तसेच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम, आरोग्य,पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग युनिट्स अंतर्गत येत…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्त्व असून, स्व. अमोल अण्णाभाऊ कोळी यांच्या स्मरणार्थ अण्णाभाऊ विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या रुग्ण्वाहिकेमुळे गरजू रुग्णांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार आहे. भोलाणे व परिसरातील नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहे. महर्षी वाल्मिक सभागृहासाठी व वाचनालयासाठी निधी मंजूर करणार असल्याचे सांगत भोलाणे व परिसर ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार असल्याचे भावनोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. ते भोलाणे येथे रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते. या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन सुरुवातीला ढोल -ताश्ाांच्या गजरात पालकमंत्री गुलाबराव…
साईमत मलकापूर प्रतिनिधी क्रांती दिन.. याच दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात देशात झाली ह्याचे औचित्य साधून “मेरी मिट्टी मेरा देश””मिट्टी को नमन विरो को वंदन” ह्या कार्यक्रमा अंतर्गत आज दि.९ऑगस्ट बुधवार रोजी मलकापूर येथील शहीद स्मारक येथे आ प्रदेश उपाध्यक्ष चैनसूख संचेती ह्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्ष मलकापूर तर्फे पुष्पचक्र अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. मातृभूमीचे रक्षण करण्याकरता जवान संजयसिंग राजपूत शहीद झाले होते.त्यांच्या स्मारकला पण अभिवादन केल्यानंतर त्यांची वीरपत्नी सुषमा राजपूत सत्कार आपल्या पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजुकाका जाधव, शहर अध्यक्ष मिलिंदजी डवले, जिल्हा…
साईमत मलकापूर प्रतिनिधी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दि.9 ऑगस्ट शहीद संजयसिंह राजपुत यांच्या स्मारका वर उपस्थित राहून शहिद संजयसिंह राजपुत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व क्रांतिवीरांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सोपान शेलकर , प्रमोद अवसरमोल , अँड. जावेद कुरेशी , राजू पाटील , बंडूभाऊ चौधरी , निवृत्ती तांबे , अनिल गांधी , तुषार पाटील , अनिल मुंधोकार , उस्मान मास्टर , अनिल भारंबे , गजानन भारंबे , सिद्धांत इंगळे , युसुफ खान , शेख सादिक , दिलीप गोळीवाले , ईश्वर भदाले , हर्षल दशरथे , भुषण सनिसे , विनय काळे , गोविंद राहाटे ,…
साईमत मलकापूर प्रतिनिधी मलकापूर (Malkapur) ते खामखेड रेल्वे अप रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना दिनांक 8 ऑगस्ट रात्री उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्टर मलकापूर तर्फे ट्रॅकमन किशोर बराटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचे वय अंदाजे पंचवीस वर्ष, रंग- गोरा, लांब केस, लांबट चेहरा, काळे डोळे, नाक सरळ दबके , शरीर बांधा सळपातळ, अंगामध्ये निळ्या कलरची जीन्स असे वर्णन आहे. सदर मृतदेह शवगृहात तीन दिवसांपर्यंत फ्रीज करून ठेवलेले आहे. या इसमाची ओळख पटल्यास मलकापूर शहर पोलीस स्टेशन 07267-222018 वर संपर्क साधावा. असे आव्हान मलकापूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कुलकर्णी यांनी…
साईमत बोदवड प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर बंद झालेल्या व नविन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी बोदवड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात होता. रिक्षा स्टॉप जवळच प्रवेश मार्ग बंद करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस तैनात होते. प्लॅटफॉर्म तिकिट काढल्यावरही आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी बाहेर रिक्षा स्टॉप जवळच रोखून धरले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल आंदोलना स्थळी दाखल होताच रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलीस प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांवरील दबाव पाहता आमदार पाटील यांनी भुसावळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत , बंदोबस्त मोडून काढत आंदोलनकर्त्यांना सोबत घेत रेल्वे स्थानकावर दाखल झाले. आमदार चंद्रकांत…