साईमत, प्रतिनिधी, जळगाव गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे जळगाव खुर्द येथे गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी गोदावरी फार्म फ्रेशचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शेतातील ताजा व स्वच्छ माल तसेच कृषी महाविद्यालयात निर्मित अन्य उत्पादनेही येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे गोदावरी फार्म फ्रेशचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आजी, सचिव डॉ.वर्षा पाटील, परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च डॉ.अशोक चौधरी, ॲग्री कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.शैलेश तायडे, डॉ.पी.आर.सपकाळे, डायरेक्टर ऑफ हॉर्टीकल्चर प्रा.सतीश सावके,…
Author: Saimat
साईमत मलकापूर प्रतिनिधी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्पोर्ट्स क्लब ठाणे येथे दिनांक १५ ते १९ ऑगस्टला ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी नुकतीच केली. या वर्षी झालेल्या दोन जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ ठाणे मुंबई येथील राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी शेगाव येथील रुद्र कचरे व मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी जळगाव जामोद येथील रेवा पाचपोर यांची…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शनिवार दि. 12 ऑगस्टपासून सुरु झालेल्या रॅगिंग प्रतिबंधक सप्ताहानिमित्त नशिराबाद पोलिस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालय स्तरावर रॅगिंग होऊ नये, अपराध होऊ नये, याकरिता हा उपक्रम घेण्यात आला असून येत्या 18 ऑगस्टपर्यंत असणाऱ्या या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार रॅगिंग करणे हा दंडनीय अपराध आहे. यानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2023 या कालावधीत अँटी-रॅगिंग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातर्फे 12 ऑगस्ट हा दिवस रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून पाळण्यात आला. तसेच रॅगिंग प्रतिबंधक…
साईमत फैजपूर ता. यावल प्रतिनिधी ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाम विस्तार सोहळ्याच्या वर्धापनदिनानिमित्त धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे यांच्या शुभहस्ते डॉ. रंगनाथन व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी डॉ. रंगनाथन व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांचे महत्व व त्यांचे वाचन आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजवून सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन विद्यार्थी व प्राध्यापकाकरिता आयोजित करण्यात आले होते.…
साईमत वरणगाव ता. भुसावळ प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” हे अभियान देशात राबवण्यात येणार असून वरणगाव नगर परिषदेत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानातंर्गत माजी मंत्री आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत देशासाठी बलीदान देणाऱ्या शुरविरांसाठी समर्पित अभियान देशभरात राबवले जात आहे . यामध्ये ‘ मेरी मिट्टी , मेरा देश ‘ या अभियानातंर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच मातृभुमी झटणारे व प्राणाची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान असा कार्यक्रम वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे . १४ ऑगस्ट रोजी सकाळी…
साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील चिखली बु।। येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक २०२३/२४वर्षे मराठा सेवा संघा तर्फे साजरा करण्यात येत असून या निमित्ताने चिखली बु येथे राज्यभिषेक पुस्तके वाटप करून वाचन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा राज्यभिषेक सोहळा ६ जुन रोजी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला, तसा मराठा सेवा संघाने विविध कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण भारतभर साजरा केला. ६ जुन २०२३ ते ६ जुन २०२४ हे संपुर्ण वर्ष मराठा सेवा संघ “शिवराज्यभिषेक त्रि शतकोत्तर सुवर्तमहोत्सवी वर्ष” म्हणुन विविध कार्यक्रम , संस्था, शाळा विद्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था यांना सोबत घेऊन साजरे करणार आहेत, त्यातीलच एक भाग म्हणुन चिखली बु।। ता बोदवड…
साईमत भुसावळ प्रतिनिधी येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय प्रसंग नमूद असलेल्या शिवराज्याभिषेकाचा पराक्रम या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. येथील आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून युवकांना देशाचे स्वातंत्र्य संस्कृती आणि संस्कार यांची जपणूक कशी व्हावी, कशी करावी, त्यांना तीमिरातून तेजाकडे जाण्याचा मार्ग मिळावा. खऱ्या अर्थाने भारत समृद्ध , संपन्न , आदर्श बलशाली सशक्त व्हावा व आजची युवा पिढी मार्फत उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविण्यात यांचा खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने आदिवासी ठाकूर समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे नाहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत वर्षाच्या इतिहासातील संस्मरणीय…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 9 ऑगस्ट रोजी ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रण’ प्रतिज्ञा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने ‘माझी मातृभूमी माझा देश’ यावर आधारित ‘पंच-प्रणाची’ शपथ घेतली. या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वांनी ‘पंच-प्रण’ आत्मसात करून भारत देशाला विकसित देश करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे, ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा.सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ताहिरा मीर,…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व समाज या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व टिळकांनी राजकीय व समाज सुधारक म्हणून केलेल्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथालय अधीक्षक प्रा. एन.जी. सरोदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. आर.टी. चौधरी,…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून सुद्धा मराठी साहित्याच्या जगतात साहित्यसम्राज्ञी बनल्या. त्यामुळे आजच्या युवा पिढीसाठी बहिणाबाई दीपस्तंभ आहेत, त्यामुळे आजच्या युवकांनी कवी, लेखक व वक्ता बनून बहिणाबाईंचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले. श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र चौधरी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…