साईमत, प्रतिनिधी, जळगाव
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे…क्षणात येतेे सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे…अशा सुंदर शब्दात श्रावणमासाचे वर्णन करणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जयंती समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी साहित्यिकांनी त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कविताही सादर केल्या.
कवींनी यांना वाहिली आदरांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानकवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी, प्रा.प्रकाश महाजन, निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, युवराज सोनवणे, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, गोविंद पाटील, किशोर पाटील, भीमराव सोनवणे, किशोर नेवे, प्रज्ञा नांदेडकर, समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी. कोळी उपस्थित होते.