साईमत, धुळे : प्रतिनिधी आदिवासी पाडे जोडरस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविली जाणार आहे.योजनेच्या माध्यमातून शेकडो आदिवासी पाडे रस्त्यांच्या माध्यमातून बारमाही जोडली जाणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. अनुसूचित जमाती प्रमाणपत्रांचे दाव्ो तत्काळ निकाली काढले जाव्ोत याकरिता आदिवासी विकास विभागात कार्यरत असलेल्या विद्यमान आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांव्यतिरिक्त लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सात समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी चालू आर्थिक वर्षाकरिता एक लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व समुदायांतील गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल रौप्यमहोत्सवी वर्षात देण्याचा आमचा संकल्प असून, राज्यात ओबीसी बांधवांसाठी येणाऱ्या तीन वर्षांत…
Author: Saimat
साईमत, शहादा : प्रतिनिधी कळंबू ता. शहादा येथील देवरे (माळी) कुटुंबातील पांडुरंग सोनू देवरे यांचे अल्प आजाराने आठवडाभरापूर्वी निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने दशक्रिया विधी होण्याआधीच वयोवृद्ध आईनेही जगाचा निरोप घेतला. यामुळे गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उतारवयात मुलाच्या खांद्यावर जाण्याच्या व्ोळेत आपल्या आधीच मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. या विरहाने आईला धक्का बसला. अन.. खाणे-पिणे बंद झाले. यातून प्रकृती खालावून एका आठवड्यात आईचेही निधन झाले. मुलाच्या व आईच्या निधनाने देवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.कळंबू (ता. शहादा) येथील निवृत्त वीज वितरण कर्मचारी झेंडू देवरे, रमेश देवरे यांच्या मातोश्री व भरत देवरे यांच्या आजी नवसाबाई सोनू देवरे…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास समस्या मुक्त होऊन सुंदर, सक्षम, स्मार्ट शहर होऊ शकते. यातून शहराचा विकासही होईल, असे भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश जैन यांनी सांगितले. भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे प्रभात चौफुली, अग्रवाल चौक,गुजराल पेट्रोल पंप व दादावाडी येथे हायवे अंडरपासमध्ये लावण्यात आलेल्या आठ कॉन्व्हेक्स मिररच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापौर जयश्री महाजन, भाविपचे क्षेत्रीय सचिव गिरीश दोशी, प्रांताध्यक्ष विश्वास लातूरकर, माजी महापौर सीमा भोळे, किरण बच्छाव, यझदी पाजनीगारा, यश मंत्री श्रीराम पाटील, जळगाव शाखेचे अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिलेले डॉ.जालिंदर सुपेकर यांचा कृषीसम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. नुकतीच डॉ.सुपेकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र या पदावर पदोन्नती मिळाली. लक्ष्मी केमिकल्स प्रा. लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी हे डॉ. सुपेकरांचे व्याही असल्यामुळे कृषी सम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने त्यांचा हा सहृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमदार राजुमामा भोळे, रजनीकांतजी कोठारी, भालचंद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, सुरेंद्र पाटील, अनिल पाटील, अनिल भोकरे, दीपक परदेशी, डॉ.दीपक पाटील, सलीम खान यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणात डॉ.सुपेकर साहेबांनी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हाभरात गावठी हातभट्ट्यांवर कारवाई; सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट धडक कारवाई करण्यात आली. यात जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी दुपारी १ वाजता प्रसारमाध्यमांना दिली. जिल्ह्यात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ व्ही.टी. बुकन यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यापुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून शनिवारी पहाटे नाशिक येथील महसूल खात्याचे पथक, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासन थेट शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात उतरत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी अनेक अधिकृत वाळू वाहून नेणारे जवळपास १०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केले आहेत. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात असल्याचे दिसून आले. मात्र, याकडे महसूल खात्यासह पोलिसांनी अक्षरशः कानाडोळा…
साईमत, पुणे : प्रतिनिधी सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलतात, तरीही त्यांची वक्तव्ये माध्यमे वारंवार का दाखवतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. िंपपरी येथे पत्रकारांच्या गौरव संमारंभात ते बोलत होते. याव्ोळी त्यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता अजूनही जिवंत आहे, ती कायम जिवंत ठेवा, असे आवाहन करत माध्यमांवर खोचक टीकाही केली व काही सूचनाही केल्या. राज म्हणाले, सध्याची पत्रकारिता म्हणजे, हा नेता काय म्हटला आणि त्यावर तो नेता काय बोलला? एवढेच सुरू आहे. अशा राजकारण्याला एकट्याला बोंबलू द्या ना शौचालयात. तिथे जे बाहेर पडायचं ते माध्यमे समोर आले की त्याच्या तोंडातून बाहेर पडते आणि माध्यमेही वारंवार त्याच्यासमोर आपला…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाच्या राज्यभरातील सहा ते सात फर्मवर ईडीने छापे टाकून कारवाई केली. सलग दोन दिवस साठ अधिकारी तपासणी करीत होते. शनिवारी सकाळ पर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईत ९० लाखाची रोकड आणि विक्रीसाठी असलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ईडीने या फर्मचे मालक, माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी, माजी आमदार मनिष जैन, त्यांच्या पत्नी अशा चौघांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे या सर्वांना ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. चौकशीला सामोरे जाऊ : ईश्वरलाल जैन या कारवाईनंतर राजमल लखीचंद ज्व्ोलर्स समुहाचे मालक ईश्वर जैन म्हणाले की, ईडीची कारवाई चुकीची असून न्यायासाठी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने- चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबवणाऱ्या चार संशयिताना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतर चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी ३ वाजता दिली. गोजोरे येथील मालतीबाई अभिमान चौधरी (वय ५७) ह्या घराला कुलूप लावून पुण्याला गेलेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी…