साईमत, तळोदा : प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेत सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील गव्हाणीपाडा येथील येथील जि. प. शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना लोभाणी गृप ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब वंचित आदिवासी समुदायातील विध्यार्थी शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालु असाव्ो आणि पटसंख्या टिकून राहावी या उद्देशाने ग्रूप ग्रामपंचायत लोभाणी ग्रामपंचायतचे सरपंच शानुबाई वळवी यांच्याकडून गव्हाणीपाडा येथील जि. प. शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वही-पेन, चित्रकला…
Author: Saimat
साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले व अखेर बलिदानही दिले. विचार करणारा, प्रश्न विचारणारा, कार्यकारणभाव तपासणारा समाज त्यांना घडवायचा होता. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून त्यांचा गोळ्या घालून खून झाला त्याला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अद्याप न्यायालयात निर्णय होऊन मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे असे प्रतिपादन अशोकभाई शाह यांनी केले. महाराष्ट्र अंनिसच्या शिंदखेडा शाखेतर्फे आयोजित केलेल्या अभिवादन निर्धार सभेत ते बोलत होते. येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘आठवणीतील डॉ.…
साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी ‘वई वई येजो व मनी कानबाई माय… लव्ह लव्ह चाल माता माथे ऊना याय व…’ यासह विविध अहिराणी-मराठी गीतांच्या मधुर आवाजात बँड व डीजेच्या तालावर नाचत, ठिकठिकाणी महिला-युवतींनी फुगडी खेळत जल्लोषात सोमवारी खानदेशचे कुलदैवत कानुबाईमातेला निरोप देण्यात आला. हिंदू धर्मातील गणेशोत्सव, नवरात्र व कानुबाई उत्सव नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात साजरे केले जातात. हे तिन्हीही उत्सव सामाजिक, कौटुंबिक एकता टिकवून ठेवणारे आहेत. सणानिमित्त नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेली कुटुंबेही गावाकडे परततात. त्यामुळे उत्साही वातावरण तयार होते. कानुबाई उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावाकडे आली आहेत. त्यामुळे गजबज वाढली होती. रविवारी कानुबाईची स्थापना, रोटपूजन व सोमवारी विसर्जन असे स्वरूप उत्सवाचे…
साईमत, धुळे : प्रतिनिधी सरवड (ता. धुळे) फाटा ते गाव दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक चोऱ्या व दरोड्यात या टोळीचा समाव्ोश असल्याचे निष्पन्न झाले आहे.बळसाणे येथील जैन मंदिर व चिमठाणे येथील मोबाईल दुकानातील चोरीतही या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. येथील पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीपथकाला सरवड फाटा ते सरवड गावादरम्यान लामकानी रस्त्यावर तीन दुचाकी व नऊ लोक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिस वाहन पाहताच ते तिघी दुचाकीवर भरधाव निघाले. पोलिसांनी पाठलाग करून एका दुचाकीस थांबविले. दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेण्यात…
साईमत, साक्री (धुळे) : प्रतिनिधी अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी समोर आली आहे. इच्छापूर (ता. साक्री) येथील राजेंद्र बुगा मारनर (वय 32) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र मारनर यांनी रविवारी विषप्राशन करत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी, मुले आहेत. त्यांचे नातलग योगेश थोरात यांच्या माहितीवरून साक्री पोलिसांत मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर इच्छापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मारनर यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिहीन झालेले राजेंद्र मारनर दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंब चालवण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते.…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकूण १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्तीपत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत , पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हास्तरीय गट ‘क’ व ‘ड’ ची सामायिक प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.. शिफारस यादीतील या पात्र उमेदवारांना भुसावळ, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, फैजपूर या नगरपरिषदेत नियुक्ती देण्यात आली. अनुकंपावर यांची झाली नियुक्ती कार्तिक ढाके, जुबेर…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी, जळगाव- येथील कांचन नगरात दशक्रिया विधीच्ाा स्वयंपाक सुरू असताना गॅस लिक झाल्यामुळे भीषण आग लागून घराची राखरांगोळी झाल्याची घटना कांचननगरात मंगळवारी सकाळी 10. वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अकस्मात आगीची नोफ्लद शनिपेठ पोलिसात करण्यात आली आहे. येथील कांचननगरातील सुभाष भाऊलाल बाविस्कर (वय 52) यांच्या शेजारी वृद्घाचे निधन झाले होते. या वृद्घाचा आज दशक्रिया विधी असल्याने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडर लिक झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच याठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसारोपयोगी साहित्य, त्यांचे एलआयसीचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, परिवाराचे शैक्षणिक…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील आकाशवाणी चौकात मोटारसायकलस्वारास भरधाव गॅस सिलिंडर घेवून जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येणाऱ्या कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिवांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कोल्हाडी(ता. बोदवड) येथील वि.का.सोसायटी सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच 19, एसी 224) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले त्या वेळी तेथे मागून भरधाव गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच 04 जेयु 9596) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात बोरसे मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा…
साईमत, नाशिक ः प्रतिनिधी जिल्ह्यात कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्काविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापारी यांनी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन केले. वणी येथे रास्तारोको करण्यात आला. निफाड प्रांताधिकाऱ्यांकडे ठाकरे गटातर्फे शुल्क हटविण्याची मागणी करण्यात आली. तर, िंपपळगाव बसवंत येथे आमदार दिलीप बनकर यांनी निर्णयाचा निषेध करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वणी येथील वीर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना आणि सर्व पक्षांच्या वतीने तासभर आंदोलन करुन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची होळी करण्यात आली. वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना निव्ोदन देण्यात आले. आंदोलनामुळे तासभर वाहतूक थांबली होती. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या. िंदडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेचाही…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील गटात सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून उद्या मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर नवाब मलिक घरी परतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील…