राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे यांची निवड

0
4

साईमत, प्रतिनिधी, जळगाव
 राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ॲड. रोहिणीताई एकनाथराव खडसे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या सभारंभात पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुपियाताई सुळे, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी सहकार मंत्री आ.बाळासाहेब पाटील, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आ. एकनाथराव खडसे, आ. शशिकांत शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले आदि मान्यवर उपस्थित होते.
ॲड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा असून विद्यमान संचालिका आहेत. त्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्यादेखील अध्यक्षा आहेत.

पक्षाचे संघटन मजबूत करीन: रोहिणी खडसे
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीवर पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. पक्षाचे संघटन मजबुत करण्यावर माझा भर राहिल. तसेच राज्यातील महिलांना बळ देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या संधीचा वापर करीन, असे प्रतिपादन नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी यावेळी केले. त्यांनी संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here