Author: Saimat

साईमत, नाशिक : प्रतिनिधी तालुक्यातील सारुळ, राजुर, बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित 15 खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सारूळ, राजुर, बहुला व पिंपळद या परिसरातील गौण खजिन उत्खननाचा विषय चांगलाच गाजत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने 21 खडी क्रशरवर कारवाई करीत ते बंद केले होते. परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला होता. खडीक्रशर चालकांनी नियमांचे पालन केले नसल्याने ही कारवाई झाल्याचे सांगितले गेले. या कारवाई विरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब…

Read More

साईमत, सिन्नर : प्रतिनिधी वडांगळी ता.27 किर्तांगळी (ता.सिन्नर )येथे सुट्टीवर आलेल्या सैन्यदलातील जवानाचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. अमोल सखाराम चव्हाणके (वय 33) सैन्यदलात असल्याने सुट्टी आले.शनिवारी (ता.26) ला पत्नीसह त्र्यंबकेश्‍वरला जाऊन देवदर्शन करून आले. घरी कुटूंब सोबत असताना अमोलच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे अमोल तात्काळ किर्तांगळी येथून वडांगळीला मोटारसायकलने येत होते. वडांगळीच्या बसस्थानक परिसरात रस्त्यात पडले. अमोलला मित्रांनी डॉ माणिक अडसरे यांच्या दवाखान्यात दाखल केले. अमोलला घाम फुटला होता. त्यांनी खाजगी रुग्णवाहिका सिन्नरला पाठविले. सिन्नर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास किर्तांगळीला अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

साईमत, त्र्यंबकेश्‍वर: प्रतिनिधी संगीत शिक्षणाचा गंध नव्हता, पण गायी चारताना बासरीतून गवसलेल्या सुरामुळे सावरपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे कलावंत घडले. इथल्या सनई-संबळ वाद्याला जिल्हाभरातून मागणी असते. शेतातील कामे झाली, की कलावंत पाड्यावरील मंदिरात एकत्र येतात. आता त्यांचा समूह तयार झाला आहे. त्यांचे सनई-संबळ लग्नसराईत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले असते. रामदास राऊत, गणपत राऊत, गोविंद राऊत, गोपाल बोरसे हे संबळ वाजवतात. लवसू राऊत हे काडीचे गाणे सादर करतात. धर्मा राऊत ढोलकीवादन करतात. हे सर्व कलावंत साठी पार केलेले आहेत.लहानपणी जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्यावर बांबूपासून बासरी बनवत विविध गाणी वाजवत असत. त्यातून आवड वाढून त्यांना सूर सापडले आहेत. बोहाडामध्ये हे कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण…

Read More

साईमत, नाशिक : प्रतिनिधी यंदा पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम देण्याचे नियोजन सुरू कराव्ो, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिली दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 30 टक्केच पाऊस झाला, साधारण 92 पैकी 53 महसूल मंडळात 21 दिवसांचा खंड पडला आहे. 60 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. 41 गावात पेरण्याच झालेल्या नाहीत. पीक विमा उतरविलेला नाही अशा शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण नसेल म्हणून हा विषय शासनाकडे नेला…

Read More

नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांच्या कामांच्या सुरक्षा अनामत रकमेच्या सादर केलेल्या 110 फायलींना पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नामंजूर केल्या.याशिवाय सुरक्षा अनामत रकमेच्या फायलींना कामांचे फोटो सक्तीचे करण्याचा निर्णय बैठकीत झाला. या निर्णयामुळे ठेकेदारांवर वचक राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारे विभागांतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कामांची सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतात.मात्र, अनेकदा कामांच्या तक्रारी असतात, कामे पूर्ण न करता ठेकेदार अनामत रक्कम काढण्याच्या मागे लागतात, असे प्रकार सरार्सपणे होत आहेत. यावर आता अकुंश येणार आहे.श्रीमती मित्तल यांनी सुरक्षा अनामत रक्कम काढण्याबाबत सादर होणाऱ्या फायलींना झालेल्या कामांचे फोटो…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव रक्षाबंधनासाठी यंदा भावाला नजर लागू नये यासाठी खास इव्हिल आय राखी बाजारात दाखल झाली आहे. इतकेच नव्हे तर एडी, फॅन्सी, पेंडल, स्टोन, झरदोजी, लुंबा, लाँग डोरी राखी हे राख्यांचे प्रकारही पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर किड्स, पर्यावरणपूरक सीड राखी व कपल राखी (भय्या-भाभी) अशा अनेक प्रकारच्या राखी असून, सोने- चांदीच्या राखीच्या वेगवेगळ्या डिझाइनचीही क्रेझ वाढली आहे. यंदा बाजारात 300 पेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. शहरात अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथून येणाऱ्या राख्यांची अधिक विक्री होते. पण, स्थानिक राख्यांनाही मागणी दिसते. एक रुपयापासून ते आठ हजार रुपयांपर्यंत राखी बाजारात आहे. कार्टून राखी 10 ते 130 रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी ॲड. रोहिणीताई एकनाथराव खडसे यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या सभारंभात पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुपियाताई सुळे, मावळत्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी सहकार मंत्री आ.बाळासाहेब पाटील, विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते आ. एकनाथराव खडसे, आ. शशिकांत शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले आदि मान्यवर उपस्थित होते. ॲड. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा असून विद्यमान संचालिका आहेत. त्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्यादेखील अध्यक्षा आहेत. पक्षाचे…

Read More

साईमत, प्रतिनिधी जळगाव श्रावण पौर्णिमा ही नारळी पैर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि संस्कृतदिन म्हणून साजरी करण्यात येते. बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक, प्रेम, आणि आपुलकी दृढ करण्यासाठी, रेशमाच्या धाग्यातून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व समजण्यासाठी मंगळवारी कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिन आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश चौधरी आणि विभाग प्रमुख राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. दोनही विभागात सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश चौधरी आणि विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे आणि संस्कृत ग्रंथाचे पूजन करण्यात…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालयातील क्रीडापटूंचा सत्कार आयोजीत केला होता. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा.डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका घाटे व अक्षया दानी या विद्यार्थिनींनी केले. क्रीडा विभागाचे राहुल धूळनकर व ममता प्रजापत यांनी सहकार्य केले.…

Read More

साईमत, प्रतिनिधी जळगाव शहरातील नेरीनाका पांझरापोळ येथे श्रावण महिन्यानिमित्त भव्य पाच दिवसीय संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हा पवित्र संगीतमय शिव महापुराण कथा महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रशासक विशाल सुरेश भोळे यांनी दिली. श्रावण मासानिमित्त्ा उत्तर प्रदेशातील श्रीधाम वृंदावन येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिव कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांच्या मुखातून संगीतमय शिव महापुराण कथा सादर होईल. या शिवकथेचे अमृत श्रवण करण्याचे पुण्य लाभण्यासाठी भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांनी सोमवारी सायंकाळी कथास्थळी पाहणी दरम्यान…

Read More