एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

0
5

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या भव्य अशा क्रीडांगणावर सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईकांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

राष्ट्रीय क्रीडादिननिमित्त तृतीय वर्ष संगणक विभागातील लिखित विजय चौधरी या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमेती या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक व तसेच काथा या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्यबद्दल प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईक यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी क्रीडा समिती प्रमुख डॉ.दिनेश पुरी, डॉ.एम हुसैन, डॉ.एम.पी. देशमुख, प्रा.एन.के. पाटील, प्रा. पी.डी. पाटील, प्रा. सुनील खोडे, डॉ.एन.एम.काझी, जयपाल देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here