साईमत, नाशिक : प्रतिनिधी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग केला जात आहे. दोनच दिवसांनी हे पेव्हर ब्लॉक निखळत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त असून अपघाताची शक्यता आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्ड्यांवरून मागील महिन्यात विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळाली होती.पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, इगतपुरी येथील सिन्नर चौफुली, बोरटेंभे फाटा, पिंपरी फाटा येथे अजूनही खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मंगळवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अक्षरश: पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. हा केवळ…
Author: Saimat
साईमत, प्रतिनिधी, जळगाव भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी भारत सरकारची संस्था आहे. दरवर्षी 1500 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म स्टुडंटशिप कार्यक्रम अंतर्गत संशोधन करण्याची संधी मिळते. या वर्षी ती संधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या व महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असलेला वरुणराज नन्नवरे याला मिळाली आहे. यासाठी वरुणराजला फारमॅकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राहुल भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे 20 हजार प्रपोजलमधून केवळ 1 हजार एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रपोजल निवडले जातात. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव राष्ट्रीय हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या भव्य अशा क्रीडांगणावर सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईकांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिननिमित्त तृतीय वर्ष संगणक विभागातील लिखित विजय चौधरी या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमेती या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक व तसेच काथा या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्यबद्दल प्राचार्य डॉ.जी. के. पटनाईक यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा समिती प्रमुख डॉ.दिनेश पुरी, डॉ.एम हुसैन, डॉ.एम.पी. देशमुख, प्रा.एन.के. पाटील, प्रा. पी.डी. पाटील,…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव येथील के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय-मू जे.(स्वायत्त) महाविद्यालय येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक प्रबोधिनीची सालाबादप्रमाणे स्थापना होऊन त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. अध्यापन करत असताना आनंददायी शिक्षण देत विद्यार्थांना सतत प्रोत्साहन देत असताना काय शिकायचे हे न सांगता कसे शिकायचे हे आपल्या अध्यापन कार्यातून विषद करणे अधिक महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी समिती प्रमुख प्रा.मीनल…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी हे पद गेल्या चार महिन्यापासून रिक्त होते. या पदावर वर्धाहून सोपान कासार यांची शासनाने नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आपल्या कार्याचा पदभार घेतल्यावर शहरातील अल्पसंख्याक समाजातील क्रीडा, राजकीय, सामाजिक व बिरादरीतर्फे प्रातनिधिक स्वरूपात त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व साने गुरुजी लिखित इस्लाम दर्शन हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरी तथा क्रीडा संघटनांतर्फे फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, भुसावळचे माजी नगर अध्यक्ष मुन्ना तेली, हुसैनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अनवर सिकलगर, रंगरेज बिरादरीचे दानिश रंगरेज, उस्मानिया पार्कचे समीर शेख व मिर्झा चौक शिवाजी नगचे प्रमुख राजा मिर्झा यांचा…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी महागडी नेक्सा कार बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून सदरची कार मिळविण्यासाठी या ना त्या कारणाने पैसे उकळून सायबर भामट्याने एका वयोवृद्धाला तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला आहे.याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यु नामदेव माळी (62, रा. जगन्नाथ चौक, मेट्रो झोन, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या व्हॉटसॲप क्रमांकांवर अज्ञात सायबर भामट्याने व्हॉटसॲप कॉल केला. संशयिताने माळी यांना नेक्सा कंपनीची महागडी कार बक्षिस लागल्याचे सांगितले.वारंवार संपर्क साधून त्याने माळी यांचा विश्वास संपादन केला आणि कार मिळविण्यासाठी काही प्रक्रियेसाठी पैसे ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. त्यानुसार माळी यांनी सायबर भामट्याच्या 8272988068 या व्हॉटसॲप क्रमांकावर, 7980978726 या फोन…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातील सामजंस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुणे येथे बार्टीच्या कार्यालयात हा करार झाला. या करारान्वये बार्टीच्या अर्थसहायातुन अनुसूचित जातीच्या 50 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिले जाईल. त्यासाठी 63 लाख 10 हजार रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांच्या अशा दोन तुकड्या राहतील. याशिवाय अनुसूचित जातीच्या 150 विद्यार्थ्यांना बँकींग परीक्षांचे मार्गदर्शन दिले जावे, यासाठी 71 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यापीठात गेल्या काही वर्षांपासून डॉ.…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख 72 हजार 152 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 435 कोटी 61 लाख 23 हजार 578 रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचारी करत होते, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली. राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने 27 मार्च 2023…
साईमत, नाशिक : प्रतिनिधी येथील तालुका क्रीडासंकुलात लिंबाच्या झाडाला मुलीचे छायाचित्र, अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य आढळून आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, संतापही व्यक्त होत आहे.येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शहरातील क्रीडासंकुलात हा प्रकार लक्षात येताच जागरूक नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले. त्यावरून कार्यकर्त्यांनी पाहणी करून अघोरी विद्येचा प्रकार असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव उदयकुमार कुऱ्हाडे व येवला शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली.त्यांनी तत्काळ हवालदार गेठे व गायकवाड यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. झाडाला लावलेला ताइत, मुलीचे छायचित्र, लटकवलेली…
साईमत,जळगाव, प्रतिनिधी भावा-बहिणीचे पवित्र नाते म्हणून आपल्या संस्कृतीत साजरी होणारी श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय. आज या पावन दिनी जळगाव शहरातील शेकडो भगिनींनी आमदार राजूमामा भोळे यांना शहरातील तेली मंगलकार्यालयात रक्षासूत्र बांधून यशासाठी आशीर्वाद दिले. यावेळी सुमारे 300 हून अधिक भगिनी उपस्थित होत्या.यावेळी राजूमामांनी भारतीय संस्कृतीचा पवित्र सण रक्षाबंधनाच्या सर्व भगिनींना शुभेच्छाही दिल्या. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी सेवाभाव जोपासून कार्य करणाऱ्या शहर महानगरपालिका दवाखाना विभागात कार्यरत कायम व एनयूएचएम कर्मचारी भगिनी, आशा वर्कर्स भगिनी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम म्हणजेच ‘अतूट बंधन’ शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासमोरील तेली मंगल कार्यालयातील समाजरत्नअण्णासाहेब आर.टी.चौधरी…