Author: Saimat

साईमत जळगाव प्रतीनिधी केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही आयटी कंपनीत लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे तीन महिन्यांची विशेष ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे. सेमिनारला आयएमआरचे ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे, त्यासाठी कुठल्या स्किल्स लागतात, त्या कश्याप्रकारे साध्य कराव्यात, आयटी कंपनीत इंटरव्यूची तयारी कशी करावी, रेज्युमे कसा बनवावा, सध्या भारतात आणि जगात कुठल्या आयटी क्षेत्रात जास्त वाव आणि नोकरीच्या संधी आहेत तसेच त्यांनी…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहराच्या नजीकच असलेल्या कंडारी गावात काल रात्री उशीरा झालेल्या भयंकर घटनेत दोन सख्ख्या भावांचा खून झाला असून भुसावळात पहाटे एकाचा खून झाला आहे. एकाच रात्री तीन खून झाल्याने भुसावळ शहर हादरले असून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कंडारी गावामध्ये रात्री दहा वाजता तू माझ्या भावाला शिवीगाळ का केली याची विचारणा केली असता जुनावाद उकरत दोन संख्या भावांना १० जणांनी मिळून संपवले. तर श्रीराम नगर मध्ये कुख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याचा त्याच्या शालकाने खून केला याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात व कंडारी येथील प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी संस्कृत सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा शनिवार, दि.२ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका भारती दक्षिणकर यांची उपस्थिती होती. प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी लुंकड हिने तर आभार नंदिनी टाकणे यांनी मानले. संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कालभैरवाष्टक स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अश्या…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी युवावर्गामध्ये एचआयव्ही / एड् स संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२३ चे औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, ऑथलेटिक असोसिएशन, यांचे संयुक्त विदयामाने दि.२ सप्टेंबर रोजी सागर पार्क येथे १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी करिता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून तसेच प्रा. राजू धनवाड , प्रा. विजय पाटील यांचे उपस्तिथीत करण्यात आली. सुरुवातील प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन व स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी गटात प्रथम…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी रोजी एकलव्य क्रीडा संकुल येथे झालेल्या शैक्षणिक वर्ष 23-24 च्या शालेय स्केटिंग या क्रीडा प्रकारा मध्ये पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव येथील स्केटिंग खेळाडूंनी विविध प्रकारात घवघवीत यश संपादन केले. शालेय विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून त्यांना प्रशिक्षक जागृती काळे, अश्विनी निकम यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार , वेल्फेअर अधिकारी, कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडू सक्षम बाउस्कर ,श्रवण महाले ,प्रणव नेरकर, लावण्या पुराणिक, अनुज पवार, दीपेश पाटील, तेजस्विनी सोनवणे, मानसी चौधरी, ललित…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी  देशपातळीवरील विविध राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया गटाची दोन दिवसांपासून मुंबईत बैठक होत असतानाच स्थानिक पातळीवरही ‘इंडिया’तील घटकपक्षांची येथे बैठक झाली. आगामी निवडणुका भाजपविरोधात एकदिलाने लढवू, असा निर्धार ‘इंडिया’तील घटकपक्षांनी येथे केला.काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी गुरुवारी (ता. १) काँग्रेस भवनात इंडिया मीट बोलावली. भाजपविरोधी पक्ष, संघटनांचे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधींनी भाजपच्या ध्येयधोरणांवर कडाडून टीका केली. तसेच पाच ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. दुष्काळासह इतर ठराव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, मनपात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी  नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, मरणासन्नावस्थेत आढळले.त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. श्री. चव्हाण यांना संबंधित रुग्ण कोण हे माहीत नव्हते. त्यांनी रुग्णाच्या आधारकार्डव्दाद्वारे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यावर ओळख पटू शकली. स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख चव्हाण बेवारस व्यक्तींच्या मदतीसाठी धडपडत असतात. त्यांना शहरातील सुरत बायपासजवळ अजळकरनगरात गुरुवारी एक व्यक्ती निपचित पडून असल्याची माहिती मिळाली. सायंकाळनंतर त्या व्यक्तीला श्री. चव्हाण व गणेश ढापसे यांनी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू झाले. खिशात आढळलेल्या आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी येथील सुरत – नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सुरतकडून नागपूरकडे येणारा अवजड मालवाहतूक कंटेनर (एनएल ०१, एई ७७७०) व नेर येथील दुचाकी (एमएच ४१, एएच ५५७९) यांचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीचालक पित्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.दुचाकीस्वार देवा भिल (वय ४२), भटाबाई श्रीराम सूर्यवंशी (वय ६६), पूनम छोटू माळीच (वय १४) हे महालकाळी शिवारात वास्तव्यास होते. ते बाजारासाठी नेर येथे आले होते. घरी परतीच्या मार्गावर असताना रस्ता ओलांडताना राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने त्यांना ओढत नेले. यात दुचाकीचालक देवा भिल, मुलगी पूनम माळीच जागीच ठार झाले. वृद्ध भटाबाई श्रीराम भिल गंभीर…

Read More

साईमत, नवापूर, प्रतिनिधी ब्राह्मणगाव तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन नवापूर तालुका शाखेतर्फे नवापूर पंचायत समिती आवारा धरणे आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणगाव येथे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रामसभेत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एक दिवशीय धरणे आंदोलन करुन घटनेचा निषेध करण्यात आला. तसे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत ब्राह्मणगांव ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक बांधवास घरकुल विषयावरुन ग्रामसभेत मारहाण झालेली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी घरकुल विषयावरुन ग्रामपंचायत रामपूर ता.अक्कलकुवा येथे देखील एका ग्रामसेवक बांधवावर खोटे अन्यायकारक गुन्हे दाखल झालेले आहेत. ग्रामसेवक बांधवावर नेहमीच अन्याय होत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांना ग्रामसभा…

Read More

साईमत, नवापूर, प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील शंभर गणित व विज्ञान शिक्षक कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनला प्रशिक्षणासाठी ३० ऑगस्टला अहमदाबाद ते यशवंतपुरम या रेल्वेने रात्री २ वाजेला रवाना झाले. प्रशिक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच जिल्ह्यातून शिक्षक रवाना झाले ही अभिमानास्पद बाब आहे; असे प्रशिक्षण जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी सांगितले. राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांचे पत्रानुसार शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि अगस्त्या आंतरराष्ट्रीय फाउंडेशन यांचेमध्ये शिक्षक व प्रशिक्षकांकरिता विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सन २०२३ -२०२४ मध्ये विज्ञान शिक्षकांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत…

Read More