Author: Saimat

साईमत, जालना ः वृत्तसंस्था जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तुफान मारहाण झाली होती.या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभरात दिसून आले.जालना शहरात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत,अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे जालना शहरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. सध्या जालना शहरात तणावपूर्ण शांतता आहे. जालना शहरातील प्रमुख भाग असलेल्या अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन सुरू होताच हा जमाव अनियंत्रित…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी नवविवाहित स्त्रीयांच्या आनंदाला उधाण आणणारा श्रावणातील प्रमुख सण म्हणजे मंगळागौर होय.. आधुनिक जगतात वावरतांनाही मंगळागौरसारखे धार्मिक विधी पार पाडत आधुनिक जगातील सत्यता शब्दबद‍्ध करुन त्यावर मंगळागौरीचे खेळही उत्साहाने खेळले जातात… असाच एक मंगळागौर सोहळा पार पडला तो व्यावसायाने डॉक्टर असलेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या कुटूंबात… नाच गं घुमा कशी मी नाचू…, पोरी पिंगा ग पोरी पिंगा गं… ह्यासारख्या गाण्यांचे बोल आणि विविधरंगी जरी काठापदराच्या साड्या नेसून सोळा-श्रृंगार करत पायी ठेका धरण्याचा मोह महिलावर्गाला आवरला गेला नाही. त्याचे कारणही तसेच काहीसे होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व डॉ.वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ.अनिकेत…

Read More

साईमत,बंगळुरू ः वृत्तसंस्था चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर, इस्रोने शनिवारी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपली पहिली मोहिम पाठवली.आदित्य एल-१ नावाची ही मोहीम पीएसएलव्ही-सी ५७ च्या आवृत्ती रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ११.५० वाजता प्रक्षेपित करण्यात आली. हे चार टप्प्यातील रॉकेट आहे. रॉकेटने ६३ मिनिटे १९ सेकंदानंतर आदित्यला २३५ १९५०० किमीच्या कक्षेत सोडले. सुमारे ४ महिन्यांनंतर ते पॉइंट-१ वर पोहोचेल.या ठिकाणी ग्रहणाचा कोणताही प्रभाव दिसत नाही, त्यामुळे येथून सहजपणे सूर्यावर संशोधन करता येते. आदित्य यानला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. इस्रोचे म्हणणे आहे की, १ बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलेला उपग्रह…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीए-एमसीए विभागात प्राध्यापक-पालक सभे प्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे उपस्थित होते. पालकांना मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी केसीई इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमसीए शाखेच्या १० विद्यार्थ्यांची पुणे स्थित ग्राव्हीटी सोफ्टवेअर तर्फे निवड करण्यात आली. त्यांची निवड ही आयटी कंपनीत लाइव्ह प्रोजेक्टसाठी झाली असून त्यांना कंपनीतर्फे तीन महिन्यांची विशेष ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे. सेमिनारला आयएमआरचे ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एमसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राव्हीटी सोफ्टवेअरचे संचालक निखील चौधरी ह्यांनी चार तासांचा सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी आयटी कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न कसे करावे, त्यासाठी कुठल्या स्किल्स लागतात, त्या कश्याप्रकारे साध्य कराव्यात, आयटी कंपनीत इंटरव्यूची तयारी कशी करावी, रेज्युमे कसा बनवावा, सध्या भारतात आणि जगात कुठल्या आयटी क्षेत्रात जास्त वाव आणि नोकरीच्या संधी आहेत तसेच त्यांनी…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहराच्या नजीकच असलेल्या कंडारी गावात काल रात्री उशीरा झालेल्या भयंकर घटनेत दोन सख्ख्या भावांचा खून झाला असून भुसावळात पहाटे एकाचा खून झाला आहे. एकाच रात्री तीन खून झाल्याने भुसावळ शहर हादरले असून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कंडारी गावामध्ये रात्री दहा वाजता तू माझ्या भावाला शिवीगाळ का केली याची विचारणा केली असता जुनावाद उकरत दोन संख्या भावांना १० जणांनी मिळून संपवले. तर श्रीराम नगर मध्ये कुख्यात गुन्हेगार निखिल राजपूत याचा त्याच्या शालकाने खून केला याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात व कंडारी येथील प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी संस्कृत सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा शनिवार, दि.२ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका भारती दक्षिणकर यांची उपस्थिती होती. प्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, जगदीश चौधरी, विभाग प्रमुख सुर्यकांत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी लुंकड हिने तर आभार नंदिनी टाकणे यांनी मानले. संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कालभैरवाष्टक स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अश्या…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी युवावर्गामध्ये एचआयव्ही / एड् स संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२३ चे औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, ऑथलेटिक असोसिएशन, यांचे संयुक्त विदयामाने दि.२ सप्टेंबर रोजी सागर पार्क येथे १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी करिता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून तसेच प्रा. राजू धनवाड , प्रा. विजय पाटील यांचे उपस्तिथीत करण्यात आली. सुरुवातील प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन व स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी गटात प्रथम…

Read More

साईमत जळगाव प्रतीनिधी रोजी एकलव्य क्रीडा संकुल येथे झालेल्या शैक्षणिक वर्ष 23-24 च्या शालेय स्केटिंग या क्रीडा प्रकारा मध्ये पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव येथील स्केटिंग खेळाडूंनी विविध प्रकारात घवघवीत यश संपादन केले. शालेय विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून त्यांना प्रशिक्षक जागृती काळे, अश्विनी निकम यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार , वेल्फेअर अधिकारी, कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडू सक्षम बाउस्कर ,श्रवण महाले ,प्रणव नेरकर, लावण्या पुराणिक, अनुज पवार, दीपेश पाटील, तेजस्विनी सोनवणे, मानसी चौधरी, ललित…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी  देशपातळीवरील विविध राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया गटाची दोन दिवसांपासून मुंबईत बैठक होत असतानाच स्थानिक पातळीवरही ‘इंडिया’तील घटकपक्षांची येथे बैठक झाली. आगामी निवडणुका भाजपविरोधात एकदिलाने लढवू, असा निर्धार ‘इंडिया’तील घटकपक्षांनी येथे केला.काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी गुरुवारी (ता. १) काँग्रेस भवनात इंडिया मीट बोलावली. भाजपविरोधी पक्ष, संघटनांचे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधींनी भाजपच्या ध्येयधोरणांवर कडाडून टीका केली. तसेच पाच ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. दुष्काळासह इतर ठराव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, मनपात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत…

Read More