साईमत, नंदुरबार, प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून कुठेही पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात देखील मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी वरुण देवाला आराधना केली जात आहे. याचदरम्यान जिल्ह्यातील प्रकाशा येथे पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले. साधारण महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत. पाऊस नसल्याने पीक करपण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या ही समोर येऊ लागली आहे. आता पाऊस आला नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होणार आहे. पिकांना जीवदान मिळावे आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून प्रकाशा येथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी पुरातन नीळकंठेश्वर महादेव…
Author: Saimat
साईमत, धुळे, प्रतिनिधी, एसटी महामंडळाच्या चालकांची 3 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला ‘अल्को टेस्ट’ मशिनद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात चालकांच्या तपासणीत धुळे विभागातील 9चालक मद्यप्राशन करून कामावर आढळले. सर्व मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे. एसटी चालकांनी मद्यप्राशन करून कामावर राहणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या हातून अपघात घडण्याची दाट शक्यता असते. काही एसटी बसचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याच्या तक्रारी झाल्या. विशेषत: ज्या बस रात्री मुक्कामी जातात अशांच्या बसचालकांबाबत या तक्रारी जास्त होत्या. त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी…
साईमत, शिरपूर, प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीची शिरपूर शहर मंडळ, सांगवी मंडळ, शिरपूर ग्रामीण मंडळ अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्षा तथा धुळे जिल्हा प्रभारी माजी आ. श्रीमती स्मिताताई वाघ, धुळे ग्रा.जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती चिंतनभाई पटेल, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिरपूर कृउबा समिती सभापती के. डी. पाटील, बोराडी उपसरपंच राहुल रंधे आदी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धुळे भाजपा जिल्हा प्रभारी श्रीमती स्मिता वाघ म्हणाल्या की, येणारा काळ निवडणुकीचा असून अध्यक्षपदाला न्याय देण्याची अनेक कार्यकर्त्यांत क्षमता आहे. मात्र पद एकालाच देता…
साईमत, धुळे, प्रतिनिधी सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरवात झाली. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली. उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. णवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि…
साईमत, धुळे, प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. याद्वारे शेती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. सध्या निवडणूक लढविण्याचा विचार नाही. मात्र, पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल, असे नाशिक परिक्षेत्राचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता.3) पत्रकार परिषदेत सांगितले. श्री.दिघावकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करीत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपत प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. धुळे लोकसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांचे भाग्य सिंचनामुळे पलटू शकते. पश्चिम वाहिनी नद्या, नदीजोड प्रकल्प, नार- पार प्रकल्प यातून जलऑडिट करायचे ठरविले आहे. नार-पार प्रकल्पाची 1956 पासून चर्चा…
साईमत, शिरपूर, प्रतिनिधी तालुक्यातील भाटपुरा गावासारख्या ग्रामीण भागातून आयएस पदावर एक युवक पोहोचला. हा फक्त भाटपुऱ्याचा नव्हे तर तालुक्याचा गौरव आहे आणि खऱ्या अर्थाने हा गौरव शिक्षणामुळे शक्य झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. ते शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे आयएएस कॅडरपदी नियुक्ती झालेले भूमिपुत्र डॉ.प्रवीणकुमार पीतांबर देवरे याां गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देवरे यांचा भाटपुरा ग्रामस्थांच्या वतीने हृदय स्पंदन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी आ.काशीराम पावरा,चोपड्याच्या आ.लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, निवृत्त…
साईमत जळगाव प्रतीनिधी माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. कारण माताने लग्नाआधीच शिवजींना पती म्हणून स्वीकारले होते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अद्भुत प्रेमाची आणि विवाहाची ही रंजक कथा आंतरराष्ट्रीय कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी कथन केली आहे. तसेच यावेळी शिव पार्वती विवाह सोहळा हर्षोल्हासात झाला. शहरातील नेरी नाका परिसरातील पांजरापोळ संस्थानच्या मैदानात सुरू असलेल्या भव्य संगीतमय शिव महापुराण कथेचा आज (दि. 2) तिसरा दिवस होता. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत अरुण भोळे यांनी सपत्नीक केले तर मनीष बाहेती यांनी सपत्नीक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. तिसर्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर अविनाश बोरोले, मनिष…
साईमत जळगाव प्रतीनिधी डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे. त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. मुंबईचे मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्यक्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कलियुगातील परमेश्वर म्हणजे डॉक्टर असून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी अब्दुल करीम तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यातील हा आरोपी. त्याच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिले आहे. २००१ मध्ये तेलगीचा हजारो कोटी रूपयांचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर आता संजय सिंग यांच्या पुस्तकावर आधारीत ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज आली आणि अब्दुल करीम तेलगीचे नाव पुन्हा चर्चेत आले. अब्दुल करीम तेलगीची कहाणी या सिरीजमधून मांडण्यात आली आहे. त्याचे वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे. अब्दुल तरुण होता तेव्हाच त्याचे वडील वारले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अब्दुलच्या खांद्यावर येऊन पडली. अब्दुलने उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम केली. फळविक्रेता म्हणून तेलगी काम करायचा. हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नड या चारही भाषा…
साईमत जळगाव प्रतीनिधी अभिवाचनाचे कौशल्य शिक्षकांसाठी प्रभावी अस्त्र असून त्याचा सुयोग्य वापर केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. शमा सुबोध सराफ यांनी केले. रोटरी क्लब जळगावतर्फे शालेय शिक्षकांसाठी आयोजित अभिवाचन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष मनोज जोशी, मानद सचिव ऍड. हेमंत भंगाळे, लिटरसी कमिटी चेअरमन डॉ. शुभदा कुलकर्णी व प्रकल्प प्रमुख सुबोध सराफ मंचावर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या की, एखादी कथा, लेख किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण वाचून दाखवताना त्याला वाचिक अभिनयाची जोड दिली की ते अभिवाचन होते. आपल्या आवाजातील अभिनयातून वाचन प्रभावी आणि उठावदार करणे हे ह्यातून अभिप्रेत…