Author: saimat

वाहतूक कोंडीवर प्रहार  जैन मंदिरासमोर अतिक्रमण हटवले साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेता जळगाव महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी नवी पेठ परिसरात धडक कारवाई करत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. टॉवर चौक परिसरातील जैन मंदिरासमोरील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर विशेष लक्ष केंद्रित करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सकाळपासूनच महानगरपालिकेच्या पथकाने नवी पेठ परिसरात मोहीम हाती घेतली. विशेषतः टॉवर चौकाजवळ रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, हातगाड्या व इतर साहित्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. परिणामी वाहनचालकांना कसरत…

Read More

“जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहतील, त्यांची नोंद वेळीच घ्या महापौर साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील स्वच्छतेवर कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम संदेश देत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी, दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक ५ मधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. पहाटे सुमारे ७ वाजता झालेले या दौऱ्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. महापौरांनी थेट हजेरी पुस्तकाची तपासणी केली. पटावर नोंदलेले कर्मचारी व प्रत्यक्ष कामावर उपस्थित कर्मचारी यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी स्पष्ट केले की, “जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहतील, त्यांची नोंद वेळीच घ्या. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त…

Read More

 “इतकी भक्ती करूनही देव आडवा का आला नाही? देवा तू खरंच कुठे आहेस?” साईमत/चोपडा/प्रतिनिधी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास चोपडा-विरवाडे रस्त्यावर एक भयंकर अपघात घडला, ज्याने संपूर्ण परिसरात हळहळ उडवली. जैन समाजाच्या पारमार्थिक कार्यक्रमातून परत येत असलेल्या चारचाकी गाडीला (एमएच-१९ बीएस-१००८) अचानक नियंत्रण सुटल्याने भीषण धडक लागली. अपघात इतका भयानक होता की, गाडीच्या दोन्ही बाजूंच्या काच आणि धातूंचा वायव्यव्यू उडाला, तरुण राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत जागीच मृत्युमुखी पडले. मृतांचा तपशील राहुल आणि मयुर हे दोघे पाच दिवसांपासून जैन धर्मीयांच्या कार्यक्रमात सहभागी होते. उपवास, भक्ती आणि साधना यामध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे गुंतवले होते. आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने, ते…

Read More

“रामू, मी गेल्यानंतर माझी स्टोरी इन्स्टावर टाक.”असे त्याने लिहिले आहे. साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील एका खाजगी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्याच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी उघडकीस आली. नेहरू नगर परिसरातील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. श्याम प्रभाकर पाटील (रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमुळे महाविद्यालयाचे प्राचार्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील शेतकरी कुटुंबातील श्याम जळगावात राहून उच्च शिक्षण घेत होता. रविवारी त्याचे रूममेट मित्र गावी गेल्याने तो खोलीवर एकटाच होता. संध्याकाळी सुमारे…

Read More

नेवरा मारुती मंदिराजवळ भीषण अपघात; चालक फरार, ग्रामस्थांनी पाठलाग करून वाहन अडवले साईमत/शिरसोली/जळगाव/प्रतिनिधी   जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा मार्गावर शनिवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश अशोक पाटील (वय ३७, रा. शिरसोली प्र. बो.) हे १४ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता आपल्या हिरो स्प्लेंडर (क्रमांक एमएच १९ बीडी ११६५) या दुचाकीने शिरसोलीकडून वावडदाकडे जात होते. नेवरा येथील मारुती मंदिराजवळ पोहोचताच…

Read More

पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार  महापौर दिपमाला काळे यांची प्लास्टिकविरोधी मोहीम वेगात साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरात वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या एकेरी (सिंगल यूज) प्लास्टिकमुळे निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय व आरोग्याच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या महापौर सौ. दिपमाला काळे यांनी पुढाकार घेत निर्णायक पाऊल उचलले आहे. प्लास्टिक विक्रेते आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात शहरातील सध्याची परिस्थिती अधोरेखित केली आहे. एकेरी वापराचे प्लास्टिक मोकाट जनावरांकडून खाल्ले जात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक…

Read More

अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील महाबळ कॉलनी परिसरात शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) रात्री उशिरा एका भाजीपाल्याच्या दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण माल जळून खाक झाला. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील दुकाने आणि परिसर मोठ्या अनर्थापासून वाचला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाबळ कॉलनीतील नवजीवन दुकानासमोर किरण महाजन यांचे भाजीपाल्याचे दुकान असून, शनिवारी रात्री सुमारे १०.५० वाजेच्या सुमारास दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येताना स्थानिकांना दिसल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून किशोर चावरे यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. दरम्यान, काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत दुकानातील सर्व साहित्य पेट घेतले. या आगीत बटाटे, पालेभाज्या…

Read More

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली आढळला  पोलिसांकडून सखोल तपास सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) सकाळी रेल्वे पुलाजवळ एका प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून बाहेरगावी असल्याची माहिती असलेल्या या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली सापडल्याने हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अमर वसंत सपकाळे (वय ४४, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. इस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. साधी राहणी आणि कष्टमय जीवन जगणाऱ्या सपकाळे…

Read More

कुढापा चौकात अग्नितांडव; शॉर्टसर्किटनंतर सिलिंडर फुटून मोठी दुर्घटना  साईमत/जळगाव/प्रतिनिधी जुन्या जळगावातील कुढापा चौक परिसर रविवारी सकाळी भीषण स्फोट आणि आगीच्या तांडवाने अक्षरशः हादरून गेला. सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीन घरे जळून खाक झाली. काही क्षणांतच धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसर व्यापला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शॉर्टसर्किटनंतर भीषण स्फोट प्राथमिक माहितीनुसार, कुढापा चौकात निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांच्या घरात अचानक आग लागली. सुरुवातीला शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता…

Read More

पिंप्राळा परिसरात धक्कादायक घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा येथील कोळीवाडा परिसरात शनिवारी दुपारी ३८ वर्षीय तरुण मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव जगदीश शिवदास सोनवणे असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. जगदीश शिवदास सोनवणे (वय ३८, रा. कोळीवाडा, पिंप्राळा) हे शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १२:३० वाजता आपल्या घरात होते. या वेळेस अज्ञात कारणांमुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. जगदीश हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कष्टकरी स्वभावाचे असूनही त्यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.…

Read More