जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित रहावी, यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता काढले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम, ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) असे स्थानबद्ध केलेल्या दोघांची नावे आहेत. सविस्तर असे की, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध ३ गुन्हे, एमआयडीसी पोलीस स्टेशनला २ तर फैजपूर आणि शनीपेठ पोलीस स्टेशनला प्रत्येकी एक…
Author: saimat
साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आजपर्यंत आमरण उपोषण सुरूच आहे. शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच वरूणराजा बरसत आहे. पावसाची कुठलीही पर्वा न करता प्रमोद पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार नाही आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे. गेल्या तीन महिन्यापासून साकेगाव ग्रामपंचायतीत प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी जल जीवन मिशन नळ जोडणी तसेच दलित वस्ती सुधारणा लाईट तसेच गटारी यांच्यामध्ये पंधरा लाख ते वीस लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रमोद पाटील…
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबीर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आली आणि आतापर्यंत त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही. तर आलिया-रणबीरची मुलगी राहाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. आता आलियाने राहाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. आलिया नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांची संवाद साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी राहाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची…
मुंबई : भारतीय संघापासून बराच काळ दूर असलेला पृथ्वी शॉ फॉर्मच्या शोधात इंग्लंडला पोहोचला. रॉयल लंडन वन डे कपमध्ये दोन मोठी शतके झळकावली. मात्र चार सामन्यांनंतर नशिबाने पुन्हा एकदा दगा दिला. क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी केवळ स्पर्धेतून बाहेरच नाही तर पुढील काही महिने मैदानापासूनही दूर राहणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे वादात सापडलेल्या पृथ्वीसाठी ही बातमी प्रचंड धक्कादायक होती. अशा परिस्थितीत आता त्याचा बालपणीचा मित्र आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एक मन जिंकणारी पोस्ट टाकली आहे. अर्जुनने त्याचा बालपणीचा मित्र पृथ्वी शॉचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मित्राला प्रोत्साहन दिले. तसेच पृथ्वी शॉला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना…
पुणे : केंद्र सरकारने देशभरात वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही अत्याधुनिक गाडी असल्यामुळे प्रवाशांमध्येही तिच्याबद्दल कुतूहल आहे. आता ही गाडी आणखी आधुनिक रूपात दाखल होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणांसह या गाड्यांचे उत्पादन चेन्नईतील रेल्वे उत्पादन प्रकल्पात सुरू आहे. लवकरच नव्या स्वरूपातील ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मागील वर्षीपासून चेन्नईतील प्रकल्पातून दोन हजार ७०२ रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षात या प्रकल्पातून ३० प्रकारच्या तीन हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नवीन प्रकारच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. याच वर्षी वंदे भारत गाड्यांचे…
होलागढ : भारताचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. आपला तिरंगा ध्वज हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मात्र याच तिरंग्याचा अपमान केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये घडली. एकीकडे स्वातंत्र्य दिवस साजरा होत होता आणि प्रयागराजमधल्या एका मदरशात तिरंग्यावर नाश्ता ठेवण्यात आला. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई पोलिसांनी व्हायरल फोटोच्या आधारे मदरसा प्रमुखासह चार जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदराशात घडली आहे असं सांगितलं जातं आहे. होलागढ पोलीस…
दिल्ली : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी आज सकाळी मिळाली होती. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सकाळी साडेसात वाजता प्रवाशांचे बोर्डिंग सुरू असताना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ दिल्ली विमानतळावर विमानातून बाहेर काढण्यात आले. “१८ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली ते पुण्याला जाणारे विमान UK971 ला अनिवार्य सुरक्षा तपासणीमुळे उशीर झाला आहे. आम्ही यासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत आहोत”, विस्ताराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात ही माहिती दिली. दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आणि त्यांचे सामान विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. “आम्ही आमच्या ग्राहकांना अल्पोपहार दिला असून त्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न…
बेंगळुरू : टेलिग्रामच्या माध्यमातून धर्मांतरासाठी सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या मुंबईतील एका मॉडेलला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मॉडेलने तिच्या काही साथीदारांसह टेलिग्रामवर काही लोकांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवले. त्यानंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देत मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ही घटना बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. २० ते ५० वयोगटातील पीडितांना केले टार्गेट नेहा ऊर्फ मेहर, असे अटक केलेल्या मॉडेलचे नाव असून, प्राथमिक तपासात ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा ऊर्फ मेहर टेलिग्रामवरून बेंगळुरूमधील २० ते ५० वयोगटातील अनेकांशी रोमँटिक संवाद साधायची. अशा प्रकारे ती तरुणांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवून, त्यांना…
इंदूर : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत बँकेचा एक सुरक्षा रक्षक गोळ्या झाडताना दिसतो आहे. ज्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचंही दिसतं आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. गोळी चालवणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ कुणीतरी मोबाईलवर चित्रित केला आणि व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओत काय? व्हायरल व्हिडीओतल्या बँकेच्या सुरक्षा रक्षकाचं नाव राजपाल सिंह राजवत आहे असं समजतं आहे. इंदूर येथील खजराना भागातल्या कृष्ण बाग कॉलनी ११७ बी मध्ये दोन कुत्रे फिरवण्यावरुन वाद-विवाद झाला. त्यानंतर चिडलेल्या राजपाल राजवतने घरातल्या गॅलरीतून आपल्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळ्या लागल्याने विमला आचला आणि राहुल आमचा या दोघांचा…
मुंबई : कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.” “कॅगच्या अहवालामागे…