घरगुती ग्राहकांना मोफत वीज; केंद्र –राज्य अनुदानामुळे प्रकल्प खर्च अत्यंत कमी; महावितरणच्या निर्बंधांवर ग्राहकांनी नोंदवले तक्रारी साईमत/ पुणे / प्रतिनिधी – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत राज्यातील १,०८,३२७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले आहेत. केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्राने ५ लाख ५७ हजार २२४ देशभर बसवलेल्या घरगुती सौर प्रकल्पांपैकी १९% बसवले. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (९५,६६५ प्रकल्प), तिसऱ्या क्रमांकावर गुजरात (९४,३६४), राजस्थान (३९,४८४) आणि केरळ (३६,८३६) आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर…
Author: saimat
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणला साईमत/शेंदुर्णी/ प्रतिनिधी, शेंदुर्णी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दणाणून गेला. भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच नगरसेवक संजय गरुड, शरद बारी, जितू पाटील, जे.के.चव्हाण, कमलाकर पाटील, प्रदीप लोढा, अरविंद देशमुख, दीपक तायडे यांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण शेंदुर्णी…
सावित्रीबाई फुले योजनेत ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मासिक शिष्यवृत्ती सुधारित रकमेवर साईमत/ मुंबई / प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत रक्कमेची मोठी वाढ करण्यात आली आहे.याअनुसार, ५ वी ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक २५० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक ४०० रुपये मिळणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, सध्याची शिष्यवृत्ती रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली त्यांनी केली आहे. सध्या ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ६० रुपये आणि ८ वी ते १० वीच्या…
ऐतिहासिक आगमन, भाविक उत्साहात रंगले शहर साईमत/फैजपूर / प्रतिनिधी फैजपूर शहरात यावर्षी आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पालखी सुभाष चौकात आगमन होणार आहे, अशी माहिती डिंगंबर महाराज चिनवलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यावर्षीच्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचे यजमानपद सेवा यावल व रावेर तालुक्यांना मिळाले असून, महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज व रवींद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पालखी सोहळा सुभाष चौकातून खुशालभाऊ रोड मार्गे श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ होणार असून, पुढे विठ्ठल मंदिरात थांबणार आहे. आयोजकांनी भाविकांना आवाहन केले आहे की, विठ्ठल मंदीर परिसरात…
पाडळसे कथास्थळावर प्रशासनाच्या सूचना फेटाळ भाविकांची सुरक्षितता धोक्यात साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी यावल तालुक्यातील पाडळसे (अकलूद शिवार) येथे सुरू असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथानाट्य दररोज हजारो भाविकांना आकर्षित करत आहे. तथापि, कथास्थळाच्या सुरक्षेसंदर्भातील नियोजनात आयोजकांकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत तापी नदीकाठी सुरक्षा वाढीसाठी ग्रीन शेडनेट लावण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच, नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्याचे व महामार्गावरील उड्डाण पूलाजवळ दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही दिले गेले होते. मात्र, आयोजकांकडून या आदेशांचे पालन न केल्यामुळे अनेक भाविक अकलूद शिवारातील पूर्व भागातील तापी नदीपात्रात…
शिक्षणासाठी सामाजिक जबाबदारीची प्रेरणा साईमत/पारोळा/ प्रतिनिधी तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री एंटरप्राइझेस, जळगाव यांनी केले असून, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली. लोणी खुर्द येथील समाधान पाटील, रुपाली पाटील, नितीन पाटील आणि तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लोणी खुर्दचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच समाधान पाटील, तसेच लोणी बु.चे सरपंच सहादू केदार, उपसरपंच शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, ईश्वर पाटील, किरण पाटील, बंटी पाटील, मनोहर केदार, संतोष पाटील व सुनंदा पाटील आदी उपस्थित होते. या वेळी गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी सक्षम…
पोलीस कारवाई; २७ हजार रुपयांचा कट्टा जप्त साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गावठी पिस्तूलसह एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, एकूण २७ हजार रुपयांवर मूल्य असलेली शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संजय गोपाल चंदेले (वय ५०, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, वरणगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सिल्वर रंगाची गावठी पिस्तूल (कट्टा) तसेच दोन पितळी राऊंड जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला गेला असून, पुढील चौकशी सुरू आहे. आरोपीस मुद्देमालासह वरणगाव पोलीस…
साईमत/ धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव-लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा पाटीजवळ रविवारी भीषण तिहेरी अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या अपघातात तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसून आला. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो ही कार अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने समोरील वॅगनार कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बोलेरो गाडी पलटी होऊन दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारने बोलेरोला धडक दिल्याने तिहेरी अपघात…
नागरिकांनी रेती डंपर वाहतूक रोखून आंदोलन केले साईमत/ अमळनेर/ प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात भीषण अपघात झाला, ज्यात भरधाव रेतीने भरलेल्या डंपरने मोटारसायकलस्वार घनश्याम तुकाराम पाटील (वय सुमारे ३५, रा. पवन चौक, मुठे गल्ली) यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये हळहळ व संतापाचे वातावरण निर्माण झाले. अपघात दगडी दरवाजा ते फरशी पुल या परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम पाटील मोटारसायकलवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेती डंपरने त्यांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल…
महावितरणच्या कारवाईत तलाठी कार्यालयातील कामकाज ठप्प साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी भुसावळ शहरातील प्रशासनाचा पुन्हा एकदा हलगर्जीपणा समोर आला आहे. तलाठी कार्यालयाचे तब्बल ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत राहिल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)ने १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. माहितीनुसार, एप्रिल २०२४ पासून तलाठी कार्यालयाचे वीज बिल थकीत होते. महावितरणने वारंवार सूचना दिल्या, परंतु थकीत रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. अखेर वीजपुरवठा खंडित करणे हा एक अत्यंत आवश्यक निर्णय झाला. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. विविध दाखले, नोंदी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, कार्यालयात…