आलिया भट्टने दिली लेक राहाबद्दल मोठी अपडेट, म्हणाली, “ती आता…”

0
3

मुंबई :

अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबीर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आली आणि आतापर्यंत त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही. तर आलिया-रणबीरची मुलगी राहाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. आता आलियाने राहाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

आलिया नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांची संवाद साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी राहाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची आलियाने खूप मोकळेपणाने उत्तरं दिली.

या सेशनदरम्यान एका चाहत्याने आलियाला प्रश्न विचारला की, “बेबी राहा कशी आहे?” त्यावर आलियाने उत्तर दिलं, “राहा आता नऊ महिन्याची झाली आहे आणि ती खरा आनंद आहे.” आलियाने दिलेल्या या उत्तराने आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, आलिया नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटातील आलियाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here