रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यास आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त ८ लाख रुपये स्वतंत्र द्यावे साईमत / अलाहाबाद / प्रतिनिधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने गर्भातील बाळाच्या मृत्यूपर्यायी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जर आईच्या गर्भात ५ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे बाळ असेल, तर त्याला जिवंत मुलासारखे मानले जावे. अशा परिस्थितीत, रेल्वे अपघातात गर्भातील बाळाचा मृत्यू झाला, तर रेल्वेला आईच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त वेगळी (स्वतंत्र) भरपाई द्यावी लागेल, असे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. ‘लाईव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, एका गर्भवती महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. आधी रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल ने केवळ महिलेच्या मृत्यूसाठी भरपाई मंजूर केली होती, पण गर्भातील बाळासाठी…
Author: saimat
साईमत / वृत्तसंस्था / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणात त्यांनी इराणी जनतेला नवरोज आणि ईद या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी आशा व्यक्त केली की, या सणांच्या काळात पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदो. संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आखाती प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील अलीकडील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी या प्रदेशातील पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होईल आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होईल.” याचवेळी पंतप्रधानांनी जागतिक व्यापारासाठी महत्वाच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यावर भर दिला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल…
राष्ट्रवादीकडे राहणार महिला आयोगाचे अध्यक्षपद? साईमत मुंबई प्रतिनिधी रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आपला राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय व महिला अधिकार मंडळांमध्ये मोठी हलचाल उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यापाठीमागील पार्श्वभूमी म्हणून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यावर सुरू असलेली गंभीर घोटाळ्यांची चर्चा व आरोप प्रमुख आहेत. फेब्रुवारी महिन्यात अशोक खरात यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर, त्यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर फिरू लागल्याने प्रकरणाची गंभीरता उघडकीस आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीविषयीही प्रश्न उपस्थित झाले. विविध धार्मिक कार्यक्रमांत अशोक खरातसोबत दिसलेल्या फोटोच्या माध्यमातून विरोधकांनी चाकणकर यांना निशाणा साधला. वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे…
२४ मार्चपासून आरक्षण सुरु, तिकीट मिळवण्यासाठी रेल्वे संकेतस्थळ वापरा साईमत भुसावळ प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून, आगामी ३ आणि ४ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर तसेच पुणे–नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर मार्गावरील विशेष गाडी क्र. ०१०२१ ही ३ एप्रिल रोजी रात्री १२.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. नागपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस परतीची गाडी क्र. ०१०२२ ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. या गाड्यांचे प्रमुख थांबे ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर,…
महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन लोकार्पित साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेचा २३ वा स्थापना दिन शनिवारी (२१ मार्च) उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. सकाळी साडे-दहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातून झाली. त्यानंतर महापालिकेच्या प्रांगणातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सिंधूताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि इतर…
“स्कार्फ अडकून ४५ वर्षीय कामगार महिलेची प्राणज्योत गेली” साईमत जळगाव प्रतिनिधी,: जळगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असताना ४५ वर्षीय जमुना रामकरण पाटील (रा. जामोद, जि. खंडवा, मध्य प्रदेश) या महिलेचा मशीनमध्ये स्कार्फ अडकल्यामुळे झालेल्या गंभीर जखमेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जमुना पाटील आणि त्यांचे पती रामकरण पाटील हे एमआयडीसीमधील ‘डी-६’ सेक्टरमधील आर.सी. फूड कंपनीत काम करीत होते. १७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे काम करत असताना जमुना यांच्या गळ्यातील स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. स्कार्फसह त्यांच्या केसाही मशीनमध्ये ओढले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जमुनाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात…
साईमत / धरणगाव / प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील बांभोरी-टाकरखेडा फाटा जवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी गुरूवारी, १९ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संदर्भानुसार, स्वप्निल दत्तात्रय निकम (वय ३८, रा. वाटिका आश्रम जवळ) हे १८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बांभोरी फाट्याकडे जात होते. या वेळी संशयित आरोपी अमोल लांडगे (रा. शिव कॉलनी) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून स्वतंत्र फोरव्हीलर गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्वप्निल यांनी “तू धडक का दिली?” असे विचारले असता, आरोपी अमोल लांडगे यांनी गाडीतून…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मुंबई – जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर जाणवत आहे. तेल कंपन्यांनी आज प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे, तर साध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना सध्या दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, इस्रायल-इराण संघर्षामुळे आखाती प्रदेशातील ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्याने जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी बीपीसीएलच्या ‘स्पीड’, एचपीसीएलच्या ‘पॉवर’ आणि आयओसीएलच्या ‘XP95’ पेट्रोलच्या दरात २.०९ ते २.३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एचपीसीएलने पेट्रोल पंप मालकांना ‘पॉवर ९५’ मध्ये दरवाढ लागू करण्याची सूचना दिली आहे. तथापि, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये…
साईमत / नंदुरबार / प्रतिनिधी नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल २० लाख ५० हजार १४८ रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. तपासात असे स्पष्ट झाले आहे की तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व निवृत्त कृषी उपसंचालक वसंत धर्मराज चौधरी आणि कर सल्लागार राकेश भालचंद्र कोठावदे यांनी GST रक्कम संगनमताने अपहार केली. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून राकेश कोठावदे याला अटक करण्यात आली आहे. प्रशासनात या घोटाळ्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२० दरम्यान वसंत चौधरी नवापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत…
साईमत / मुंबई / प्रतिनिधी मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो आंबेवाडीतील चगन पटेल चाळीत राहात होता. घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दिव्यांशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. घटनेची माहिती मिळताच कुरार व्हिलेज पोलीस घटनास्थळी दाखल झाले.…