फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी मानवी जीवन अनपेक्षित चढउतार, सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. दिनांक 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे. या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने…
Author: saimat
भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी केली असता त्यात…