चोपडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू साईमत / जळगाव / प्रतिनिधी: जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावात अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली असून, दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मामलदे गावाजवळील शेतात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी मुलीचा जन्म झाला होता. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेच्या रात्री चिमुकली आईच्या कुशीत झोपलेली असताना अज्ञात हिंस्त्र प्राण्याने तिला उचलून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सकाळी मुलगी आईजवळ न आढळल्याने कुटुंबीयांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. शोध घेतल्यानंतर शेताजवळ काही अंतरावर…
Author: saimat
साईमत / वृत्तसंस्था जागतिक पातळीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सुमारे महिनाभर सुरू असलेल्या या तणावामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून अनेक देशांमध्ये महागाई वाढल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर International Monetary Fund (IMF) ने गंभीर इशारा दिला आहे. IMF च्या अहवालानुसार, आशिया आणि युरोपमधील ऊर्जा आयात करणाऱ्या देशांना वाढत्या इंधन दरांचा सर्वाधिक फटका बसत आहे. इंधन आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे महागाई वाढत असून आर्थिक वाढ मंदावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम होण्याची शक्यता IMF ने वर्तवली आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील तणावामुळे आधीच संकटातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या…
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण साईमत जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असताना, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बंद घरावर लक्ष ठेवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील यश हाइट्स समोरील राजयोग गुरुदत्त नगर भागात ही घटना घडली. अमोल गंगाधरराव भेंडे (वय ३८) हे खाजगी नोकरी करतात. २६ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० मार्चच्या पहाटे ४.३० वाजेपर्यंत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेली सुमारे ५० हजार…
मुख्य गेटवर पास तपासणी, महासभेत बाहेरच्या हस्तक्षेपावर बंदी साईमत जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत अनियंत्रित गर्दी आणि सुरक्षेच्या समस्यांवर महापौर दीपमाला काळे यांनी ठोस पाऊल उचलले आहे. आगामी महासभेपासून सभागृहात प्रवेश करण्यासाठी ‘एन्ट्री पास’ बंधनकारक करण्यात येणार असून, पासशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. वाढती गर्दी, कामकाजात अडथळा आज पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वेळा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना या गर्दीमुळे कामकाजात अडथळा निर्माण झाला. सभागृहाच्या मर्यादित क्षमतेमुळे गोंधळाची परिस्थितीही दिसून आली. यामुळे प्रशासनाने महासभेतील शिस्त राखण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले. महापौरांचे स्पष्ट वक्तव्य महापौर दीपमाला काळे यांनी…
“जर तात्काळ घंटागाडी सुरू झाली नाही, तर स्वखर्चाने कचरा उचलून तो आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर फेकू.” साईमत जळगाव प्रतिनिधी: महापालिका निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या महासभेत आज सोमवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहरभर गाजलेली वादळी चर्चा रंगली. आरोग्य, स्वच्छता, कचरा संकलन आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रशासकीय प्रश्नांवरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेषतः कचरा संकलनातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर सभागृहात तीव्र टीका झाली. सभेचे अध्यक्षस्थानी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा, नितीन बरडे आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी प्रशासकीय कामकाजातील रखडलेल्या…
प्रेस फोटोग्राफर संघाचे कप्तान भूषण हंसकर मिळाले मालिकावीर पुरस्कार साईमत जळगाव प्रतिनिधी: पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रीमियर लीग’ पर्व-२ चा समारोप २९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली, तर प्रेस एडिटर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. पत्रकारांचा उत्साह आणि मेहनत समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनी, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी सहन करत, दिन-रात्र धावपळ करत ही स्पर्धा साजरी केली. राज्यात अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी विविध खेळ स्पर्धा आयोजित केल्या तरी पत्रकारांसाठी…
हवामान खात्याचा अंदाज खरा; अचानक आलेला पाऊस शहरात साईमत जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरासह परिसरात सोमवारी (३० मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांना आश्चर्यचकित केले. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली, तर उकाड्यातून सुटका मिळाल्याचा आनंदही अनुभवायला मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारीच आकाशात ढगांची दाटी सुरू झाली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत गर्दी झालेल्या ग्राहकांनी पळ काढली, तर रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांनी आपले सामान वाचवण्यासाठी धावपळ केली. पावसाचा जोर वाढल्याने शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता. वादळी…
भोर तालुक्यात दोन भीषण अपघात, नागपूर महामार्ग ‘हॉटस्पॉट’ ठरतोय; प्रशासनाच्या उपाययोजनेची मागणी साईमत / पुणे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. भोर तालुक्यातील संगमनेर गाव हद्दीत भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील राजेश दशरथ राठोड (वय 21, रा. कोथरूड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. प्राथमिक माहिती नुसार, भोरकडे येताना तीव्र वळणावर अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला. स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. राजगड पोलीस…
स्विफ्ट डिझायरला अज्ञात वाहनाची जोरदार धडक, अविनाश चौधरी जागीच मृत साईमत धरणगाव प्रतिनिधी: सोमवारी ३० मार्च रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास धरणगाव परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. धरणगावच्या माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चौधरी यांचा मुलगा, ३५ वर्षीय अविनाश संजय चौधरी, एरंडोलकडे खाजगी कामासाठी जात असताना त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकामुळे कार रस्त्यावर उलटली आणि अविनाश यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश हे पेशाने रुग्णवाहिका चालक होते. ते आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (नोंदणी क्रमांक MH 46 X 2636) बोरगाव मार्गे एरंडोलकडे जात होते. समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला भीषण धडक दिली, ज्यामुळे त्यांच्या छातीला आणि डोक्याला…
हातकणंगले तालुक्यात जमिनीच्या वादातून संतापलेल्या भाऊने केलेला हल्ला; परिसर हादरला साईमत / कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून धक्कादायक दुहेरी खून घडला. या घटनेत शितल मारुती कुंडले (४५) आणि त्यांचे वडील मारुती बंडू कुंडले (७२) यांचा निर्घृण खून झाला. आरोपी मोठा भाऊ संभाजी कुंडले पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शितल आणि मारुती यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्याने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे दोघेही जागीच ठार झाले. कुटुंबातील जमिनीच्या वाटपावरून सतत वाद सुरू होत होते, आणि काल सायंकाळी झालेल्या वादानंतर संभाजी कुंडले संतापून हा हल्ला केला. घटनेनंतर आरोपी स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात…