साईमत / तलसारी प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचे अचानक निधन मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक ठरले आहे. रविवारी ओडिशा येथील तलसारी किनाऱ्यावर ‘भोले बाबा पार करेगा’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते समुद्रात बुडले. घटनास्थळी उपस्थित क्रू सदस्यांनी त्यांना तत्काळ बाहेर काढले, परंतु दीघा येथील रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राप्त माहितीनुसार, शूटिंगपूर्वी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच स्थानिक पोलिस ठाण्यालाही सूचित केलेले नव्हते. त्यामुळे तलसारी मरीन पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मृत्यू ‘अनैसर्गिक’ म्हणून नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, समुद्रातील जोरदार लाटा किंवा पाण्याची अचानक खोली यामुळे राहुल यांचा तोल गेला असावा. राहुल यांचे निधन झाल्याप्रसंगी, पत्नी…
Author: saimat
साईमत /जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची महार वतनाची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, हे प्रकरण २००२ सालातील असून भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ मधील जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे व त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी संबंधित जमीन खरेदीची तयारी दर्शवली होती. यावेळी योग्य मोबदला तसेच कुटुंबातील सदस्यांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी…
दिंडीसोहळ्याने रंगली सुरुवात मेळाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद साईमत जळगाव प्रतिनिधी: जाती-पातींच्या भिंती दूर करून हिंदू समाजाने एकसंघपणे पुढे यावे, या उदात्त उद्देशाने जळगाव शहरातील मोहाडी येथील मारुती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू मेळाव्याला रविवारी (दि. २९ मार्च) नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने परिसरात सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला. मेळाव्याची सुरुवात सायंकाळी ४ वाजता मोहाडी गावातून काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले. दिंडीत मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सायंकाळी ६…
३१ मार्च अंतिम मुदत; ७९ बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर, १ एप्रिलपासून जप्ती कारवाई सुरू साईमत जळगाव प्रतिनिधी: मालमत्ता कर वसुलीसाठी जळगाव महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. थकीत करावरील दंडमाफी योजनेची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना महापालिकेने तब्बल ७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. संबंधितांनी ३१ मार्चपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास १ एप्रिलपासून त्यांच्या मालमत्तांना थेट टाळे ठोकून जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने गेल्या काही दिवसांत विशेष मोहीम राबवत आतापर्यंत ७८ कोटी रुपयांची वसुली केली आहे. मात्र, अद्यापही अनेक मोठे थकबाकीदार कर भरण्याकडे…
पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा साईमत पाचोरा प्रतिनिधी: पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध समाजाभिमुख मागण्यांसाठी समता सैनिक दलाने आज प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालय गाठत उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनात नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, शहर अध्यक्ष गंगाराम तेली यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या…
मुस्लिम बहुल भागात मराठी वर्तमानपत्रांचे वाचनालय सुरू साईमत जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला गेला आहे. मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मराठी वृत्तपत्रांचे वाचनालय सुरू करून सामाजिक व भाषिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या वाचनालयात जळगाव शहरातून प्रकाशित होणारी सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज सुमारे दहा विविध मराठी वृत्तपत्रे वाचकांसाठी उपलब्ध राहणार असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण होईल आणि माहिती व ज्ञानाचा नवा दरवाजा खुला होईल, असा उद्देश या उपक्रमामागे आहे. वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष ढोल-ताशांच्या…
कुसुंबा- जळगाव रस्त्यावर अपघात वृद्ध महिलेवर अज्ञात वाहनाची धडक साईमत जळगाव प्रतिनिधी शनिवारी, २८ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास जळगाव शहराजवळील कुसुंबा गावाजवळ एका भयानक रस्ते अपघातात ७० वर्षीय विमलबाई रूपचंद पाटील यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती अशी की, विमलबाई आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा गावात वास्तव्य करत होत्या. सकाळी गावाजवळून जात असताना रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेने असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे विमलबाई गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक सुरेश पाटील यांनी जखमी महिलांना तातडीने जळगाव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच विमलबाईंच्या…
साईमत / मुंबई सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या आठवड्यात चढ-उतार सुरु होते. रामनवमीच्या सुट्टीनंतर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचा भाव किंचित वाढला, तर चांदीची किंमत सुरुवातीच्या दिवसांमध्ये वाढल्यावर शेवटी घसरली. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती त्यांच्या पूर्वीच्या उच्चांकांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत. MCX वरील चांदीच्या वायदे दर चार ट्रेडिंग दिवसांत काही दिवस वाढले तर काही दिवस घसरले. शुक्रवारी, 5 मे रोजी चांदीचा भाव 2,27,750 रुपये प्रति किलोवर बंद झाला, आठवड्याच्या सुरुवातीच्या किंमतीच्या तुलनेत किंचित घसरण दिसली. चांदीच्या उच्च दराशी तुलना केली तर, MCX वर याचा आतापर्यंतचा उच्चांक ₹4,39,337 प्रति किलो होता. सध्याच्या दरापासून हा मौल्यवान धातू ₹2,11,578 प्रति किलोने स्वस्त झाला आहे. सोन्याच्या…
गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह तिघे जेरबंद साईमत जळगाव प्रतिनिधी: शहरातील अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी कारवायांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीसांनी केलेल्या धाडसिक कारवाईत तिघे संशयित जेरबंद झाले. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुस आणि एक महागडी दुचाकी जप्त केली आहे. एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांच्या आसपास आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता जळगाव-संभाजीनगर रोडवरील एअरपोर्ट समोरच्या नेस पार्कजवळ पोलीस गस्त घालत होते. यावेळी एका दुचाकीवरून तीन संशयित येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला असता, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न…
साईमत / बुलढाणा / प्रतिनिधी जिल्ह्यात एका भीषण अपघातात दोन अल्पवयीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाला असून, कुटुंबातील या दोघांना जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी वाहनामध्ये एकाच कुटुंबातील 23 भाविक प्रवास करत होते, ज्यापैकी 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंब सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा जवळ चालकाचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची झोप लागल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे. अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांमध्ये अरमान शरीफ बागवान (वय 16) आणि रिहान सैदु बागवान (वय 17)…