डॉक्टरच्या घरातून ३२ हजारांचा ऐवज लंपास साईमत /जळगाव / प्रतिनिधी: शहरातील बळीराम पेठ परिसरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा पुन्हा एकदा डाव यशस्वी ठरला असून, एका नामांकित डॉक्टरच्या घरावर डल्ला मारत सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठ येथील रहिवासी डॉ. अजिजुल्ला इस्माईल शेख (वय ६२) हे २६ मार्च रोजी दुपारी सुमारास आपल्या कुटुंबासह पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून चोरीची योजना आखली. दरम्यान, चोरट्यांनी घराच्या मुख्य…
Author: saimat
जनजागृती करणारा आवाज थांबला; बारूळकर यांचे निधन साईमत / नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली असून बहुजन चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक, शिवव्याख्याते आणि प्रबोधनकार हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे नांदेडसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर परिसरात हा भीषण अपघात घडला. एका कार्यक्रमानंतर मधुकर महाराज बारूळकर हे दुचाकीने आपल्या गावी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेतली; मात्र वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.…
साईमत / अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात आज एक हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी तलावात गेलेल्या ३ मुलांचा पाण्याचा अंदाज न येण्यामुळे बुडून मृत्यू झाला. ही मुलं सर्व एकाच गावातील आहेत, आणि त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार, सोनई गावातील ८ ते १२ वयोगटातील तिन्ही मुलं साठवण तलावात पोहण्यासाठी उतरली होती. उडी मारल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी एका मुलाचा मृतदेह काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अद्याप दोन मुलांचे मृतदेह मिळालेले नाहीत. पोलिस आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्यांच्या शोधासाठी बचावपथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर…
रेड हाऊसला ‘सर्वोत्कृष्ट हाऊस’ म्हणून सन्मानित करण्यात आले. साईमत /पाळधी बु., ता.धरणगाव / प्रतिनिधी: पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करून ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ज्ञान, संस्कार आणि सर्वांगीण विकासाचा संगम साधणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमानास्पद क्षण ठरला. कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा, वार्षिक स्नेहसंमेलन व रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. चारही हाऊसच्या एकत्रित कामगिरीचा विचार करून रेड हाऊसला ‘सर्वोत्कृष्ट हाऊस’ म्हणून सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संचालक मंडळ सदस्य गजानन पाटील उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील आणि…
५०० लिटर पेट्रोल साठवण्याचा प्रकरण उघडकीस प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन साठवलं साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी: मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणीचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, संबंधित व्यक्ती भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने इंधन साठवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
साईमत / जळगाव “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची आज, 31 मार्चची शेवटची संधी आहे. तांत्रिक अडचणी किंवा अपूर्ण KYC असल्यास त्वरित सुधारणा करा, अन्यथा योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. E-KYC प्रक्रिया कशी कराल? 1. अधिकृत पोर्टलद्वारे: वेबसाईटला भेट द्या: Ladki Bahin Yojana Official Website उघडा. लॉगिन करा: नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. E-KYC पर्याय निवडा: होम स्क्रीनवर ‘E-KYC’ क्लिक करा. आधार नंबर भरा: 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा. OTP पडताळणी: आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP भरून Verify क्लिक करा. सबमिट करा: सर्व माहिती तपासल्यानंतर ‘मी सहमत आहे’ टिक करून…
प्रवाशांना दिलासा! रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू साईमत भुसावळ प्रतिनिधी: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या महत्त्वाच्या गाड्या पुन्हा आपल्या वेळापत्रकानुसार धावू लागल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, आता हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्र. १८०३०) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस (गाडी क्र. १८०२९) यांचा समावेश आहे. ४ ते २४ एप्रिल दरम्यान रद्द असलेल्या गाडी क्र. १८०३० शालिमारहून नियोजित वेळेनुसार पुन्हा धावणार आहे. त्याचप्रमाणे ६ ते २६ एप्रिल दरम्यान रद्द असलेली गाडी क्र. १८०२९ लोकमान्य टिळक…
उखडलेल्या रस्त्याने नागरिकांचे हाल, ठेकेदारावर संताप साईमत भुसावळ प्रतिनिधी: भुसावळ ते मधुकर सहकारी साखर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अचानक ब्रेक लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वेगात सुरू असलेले हे काम मार्चमध्ये पाडळसा-भोरटेक फाट्यावर आयोजित शिवमहापुराण कथेमुळे थांबवण्यात आले. मात्र कथा संपून पंधरा दिवस उलटूनही काम पुन्हा सुरू न झाल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तापी पूल ते पाडळसा दरम्यान सुमारे चार किलोमीटर रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आला असला तरी बामणोद ते पाडळसा या चार किलोमीटर पट्ट्यात ठेकेदाराने रस्ता खोदून मुरूम व माती टाकून तो अर्धवट अवस्थेत सोडला आहे. परिणामी, रस्त्यावर…
साईमत / कर्नाटक कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात आज अंगावर काटा आणणारी भीषण दुर्घटना घडली. कन्नोळी टोलगेटजवळ सरकारी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेनंतर बसला आग लागल्याने एक युवक जिवंत जळून मृत्यूमुखी पडला. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट होऊन तात्काळ आग लागली. यात देवऱ्हिप्परगी तालुक्यातील मुळसावळगी गावचा रहिवासी अभिषेक सायबागौडा नागराळ (वय २२) हा युवक आगीच्या ज्वाळांत सापडून घटनास्थळीच जिवंत जळाला. अपघातानंतर काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत बसलाही वेढले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांनी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. बसमधील सर्व…
१० हजारांच्या मागणीप्रकरणी गुन्हा दाखल” साईमत जळगाव प्रतिनिधी: लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वन विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकारांवर मोठा आघात बसला आहे. भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), व्यवसाय – वनरक्षक (आगार रक्षक चालक), नेमणूक – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल परिसरातील रहिवासी असून ते दोन बोलेरो पिकअप…