मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील टोलचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत बनत चालला आहे. राज्यातील रस्त्यांची दुर्दशा झालेली असातना टोल का भरावा असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उचलून धरला होता.आता, यावरूनच, ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल सुरू का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस वे एमएमआरडीएने मुंबई पालिकेकडे हस्तांतरित…
Author: saimat
साईमत ठाणे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज (५ ऑगस्ट) ६० वा वाढदिवस आहे परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ५ ऑगस्ट माझा वाढदिवस लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात.…
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रात कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी करत अहमदनगरमधील राहुरी शहर आणि तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज (५ ऑगस्ट) सकाळीच या मोर्चाला सुरुवात झाली असून हजारो हिंदू नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपा आमदार नितेश राणेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. राज्यात हिंदू मुलींचे-तरुणींचे फसवून अथवा बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा दावा करत हिंदू संघटनांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चाबद्दल आणि कथित लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राज्यात स्वतःची ओळख लपवून काहींनी मुलींशी लग्न केल्याच्या, त्यानंतर…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी मानवी जीवन अनपेक्षित चढउतार, सुखदुःख आणि अनगिणत आव्हानांनी ओतपोत भरलेले असतानाच भविष्यातील संकटांना धैर्याने सामना करण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे धडे घेतले पाहिजेत व त्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. ते 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. दिनांक 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान विद्यापीठाच्या हिरवागार डोंगरराशीत एनसीसी चा कॅम्प सुरू आहे. या कॅम्पमध्ये सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून कर्नल पवनकुमार, प्रशासकीय अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने…
भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वांजोळा रोड रस्त्यालगत राजस्थान मार्बल जवळ सापाळा रचत चोरटी वाळू वातुक करणारे डंपर ताब्यात घेत कारवाई केली आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दि. ४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, तहसिलदार निता लबडे यांना जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातून डंपरमध्ये वाळुची चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहिती वरून तहसिलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनात पहाटे ५ वाजेच्या सुमारास कुऱ्हे प्र.न.मंडळातील तलाठी, कोतवाल यांनी सापाळा रचला होता. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर राजस्थान मार्बल जवळ डंपर (क्रमांक एमएच-18-सीएम-1584 ) थांबवुन तपासणी केली असता त्यात…