मुंबई ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे.राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केली.यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे. आधी माणगाव…नंतर राजापूर आणि आता रत्नागिरी…मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत कंत्राटदार आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मनसेने ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक आंदोलन सुरू केले.चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातच खड्डे पाहा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता.एकीकडे राज्यात गतीमान सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री वारंवार करतायेत मात्र दुसरीकडे खड्ड्यांमुळे जिकडे-तिकडे वाहतूक मंदावल्याची वास्तव आहे. दीपालीला सय्यद यांचा टोला मनसेच्या या आंदोलनावर शिवसेना…
Author: saimat
गुरुग्राम ः हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर स्क्रू डायव्हरने जीवघेणा हल्ला केला. सेक्ससाठी नकार दिल्याने नराधमाने तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या आरोपीला गुरुग्रामच्या राजीव चौकातून पोलिसांनी अटक केली आहे.शिवम कुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी शिवम विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. पीडित तरुणीने आरोप करत म्हटले की, शिवमने शारीरिक संबंध करण्यासाठी मला मजबूर केले. जेव्हा मी शिवमला शारीरिक संबंध करण्यासाठी नकार दिला, त्यावेळी त्याने माझ्या मानेवर स्क्रू डायव्हरने हल्ला केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला तिच्या नवऱ्यापासून वेगळे होऊन भाड्याच्या…
बीड ः आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांना त्यांच्या अल्पवयीन मुलाने संपवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. बीड जिल्ह्यातील पूस या गावात ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस या ठिकाणी राहणारा एक गृहस्थ त्याच्या पत्नीवर कायमच चारित्र्यावरुन संशय घेत होता तसेच तो रोज दारु पिऊन घरी यायचा आणि पत्नीवर संशय घ्यायचा. १६ ऑगस्टच्या दिवशी आई घरी असताना मुलाने वडिलांना फोन केला आणि जेवणाबाबत विचारणा केली मात्र वडिलांनी मी शेतात जेवणार आहे, डबा पाठवून द्या हे सांगितले. तसेच घरी आल्यावर दूध घेईन असेही त्याने त्याच्या मुलाला सांगितले. यानंतर मोठ्या…
नाशिक ः प्रतिनिधी सिनेटची निवडणूक स्थगित झाली कारण मिंधे आणि भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रमात तयार होता तरीही निवडणूक स्थगित झाली.अशा गोष्टी घडणं लोकशाहीसाठी घातक आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. निवडणुका स्थगित होणे हे घातक आहे. देशात आपल्या लोकशाही नाहीये असेच समजून आता आपल्याला काम करावं लागणार आहे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामागे नेमकं कोण आहे हे तपासून बघावे लागेल असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. तुम्ही छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चाललात का? असे विचारले असता आदित्य ठाकरे…
मलकापूर : प्रतिनिधी “अमरावती ते चिखली” राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील मलकापूर “नांदुरा-चिखली मुक्ताईनगर अशा ४५ कि.मी. लांबी आणि ८०० रुपये कोटी निधीच्या विकास कामाचे शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर लोकार्पण करण्यात आले. नांदुरा-चिखली मुक्ताईनगर खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची लांबी ४५ कि.मी. आहे. याअंतर्गत ६ कि.मी.चा नांदुरा ग्रीनफील्ड बायपास, मलकापूर आरओबी, ४ प्रमुख पूल, १८ छोटे पूल, ११ कल्व्हर्ट, ३ वाहन अंडरपास, ४ पादचारी अंडरपास, ११.५३ कि.मी. दुपदरी सर्व्हिस रोड, २० बस शेल्टर, १ ट्रकले बाई यांचा समावेश आहे. यावेळी खा. रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध…
फैजपूर : प्रतिनिधी येथील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे आणि नगरपरिषदेचा शहरातील पाणीपुरवठा रोजच विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी तात्काळ सावदा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला धनंजय चौधरी, केतन किरंगे, पत्रकार अरुण होले, वीज मंडळाचे फैजपूर येथील उप अभियंता सरोदे, फैजपूर विभागाचे पाटील, लोहारा वीज केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. यापुढे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर आणि आसाराम नगर फिडरवर परिणाम होऊ देणार नाही, असे आश्वासन वीज मंडळाचे सपकाळे यांनी दिले. फैजपूर शहरातील आसाराम नगर फिडरवर गेल्या ४ महिन्यांपासून दररोज वीज पुरवठा दिवसातून किमान ४ वेळा खंडित होत होता. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे…
यावल : प्रतिनिधी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने महर्षी व्यासनगरी यावल येथे तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठकीचे येथील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात आयोजन केले होते. बैठकीला तालुक्यातील ३५ हून अधिक मंदिरांचे मंदिर विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत १४ मंदिरात वस्त्रसंहिता लागू होणार असल्याचा निर्धार मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. ‘मंदिरात वस्त्रसंहितेची आवश्यकता’ या विषयावर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी तर ‘मंदिर संस्कृती रक्षणाची आवश्यकता’ या विषयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. वस्त्रसंहिता लागू करण्याच्या विषयानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या १४ मंदिरांच्या विश्वस्तांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागु करण्याचा निर्णय दिला. महर्षी व्यास मंदिराचे अध्यक्ष प्रमोद गडे आणि त्यांचे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित रहावी, यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता काढले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम, ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) असे स्थानबद्ध केलेल्या दोघांची नावे आहेत. सविस्तर असे की, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध ३ गुन्हे, एमआयडीसी पोलीस स्टेशनला २ तर फैजपूर आणि शनीपेठ पोलीस स्टेशनला प्रत्येकी एक…
साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आजपर्यंत आमरण उपोषण सुरूच आहे. शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच वरूणराजा बरसत आहे. पावसाची कुठलीही पर्वा न करता प्रमोद पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार नाही आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे. गेल्या तीन महिन्यापासून साकेगाव ग्रामपंचायतीत प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी जल जीवन मिशन नळ जोडणी तसेच दलित वस्ती सुधारणा लाईट तसेच गटारी यांच्यामध्ये पंधरा लाख ते वीस लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रमोद पाटील…
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबीर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आली आणि आतापर्यंत त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला नाही. तर आलिया-रणबीरची मुलगी राहाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. आता आलियाने राहाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. आलिया नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांची संवाद साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी राहाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची…