भुसावळ : प्रतिनिधी नागपूर येथील कापड व्यापाऱ्याला शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कट मारल्याचे निमित्त करीत बेदम मारहाण केली. व्यापाऱ्याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केल्यावर मंगळवारी, २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षल संजयकुमार सावकारे (वय २७, रा.पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (वय २०, रा.नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय २३, रा. सराफ बाजार, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सविस्तर असे की, किशोर…
Author: saimat
मुक्ताईनगर : प्रतिनिधी विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे. कुटुंब, समाज आणि राष्ट्रविकासात त्याचा सहभाग असला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा अंगीकारून ‘स्वयंसेवक’ बनले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले. श्रीमती खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्बोधन शिबिर नुकतेच उत्साहात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनएसएसचे लक्ष्यगीत सादर करून कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. एन.एस.एस. हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे साधन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सुदृढ, बौद्धिक दृष्ट्या गुणवान आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनले पाहिजे. तसेच एन.एस.एस.चे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ‘माझ्यासाठी नव्हे तर…
संभाजीनगर ः प्रतिनिधी शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नी आणि मुलांना वडापावमधून विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पतीने पत्नीसह मुलांना वडापावमधून विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पत्नीच्या सतर्कतेमुळे सर्वांचा जीव वाचला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिलेने या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे आणि तिच्या पतीचे कौटुंबिक…
पुणे : सांस्कृतिक शहर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोंढव्यात अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने अल्पवयीन मुलाला याचा व्हिडीओ देखील काढण्यास सांगितले होते. कोरोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्या प्रकरणी एका २८ वर्षीय महिलेविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाची…
रायपूर ः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल बिलासपूरमध्ये पत्रकारांना माहिती देत असताना अचानक साप त्यांच्या पायापर्यंत आला. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता तसेच त्यांचे सुरक्षा रक्षकही होते. सापाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांचे उत्तर हैराण करणारे होते. पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या चक्क पायापर्यंत साप आला. यावर भूपेश बघेल यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले. सापाला घाबरण्याचे कारण नाही, मी लहानपणापासून खिशात साप घेऊन फिरतो,असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. इतकेच नाही तर सापाला मारू नका असा सल्लाही त्यांनी…
भागलपूर : देशभरातील सरकारी शाळांची दुरावस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. सरकार कितीही दावे करत असले तरी खरी परिस्थिती वेळोवेळी समोर येत असते. अशात बिहारमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. ज्यात शाळेची झालेली दुरुवस्था पाहून लोक सरकारने इकडेही लक्ष द्या अशी विनंती करत आहे. सोशल मीडियावर दुरावस्था झालेल्या शाळेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राज्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पावासाळ्यात शाळेचे छत गळत असल्याने वर्गात रोज छत्री घेऊन बसण्याची वेळ आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील भागलपूरच्या गोपालपूर ब्लॉकमधील सैदपूर हायस्कूलमधील आहे. जो भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये…
पाटणा ः अभिनेते प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जेवढं नाव कमावलं आहे तेवढंच नाव त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही कमावलं आहे. सिंघम मधल्या जयकांत शिक्रेमुळे तर ते घराघरात पोहचले. त्यांच्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्या भूमिका जशा चर्चेत असतात तसेच त्यांचे ट्विट्सही चर्चेत असतात. चांद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून देशभरातले खगोलप्रेमी हे आस लावून बसले आहेत तसेच अनेक लोकांकडून प्रार्थनाही केली जाते आहे.अशात प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन हे चहा ओतत असल्याचे…
मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. या ‘जागर यात्रे’वरून शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे. मनसेच्या ‘जागर यात्रे’ दरम्यान रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली तर मनसेचे एकाचे दोन आमदार होतील, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. जागर यात्रेतून राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान नको, असेही त्यांनी म्हटले आहे. सय्यद यांनी ट्वीट करत ही टोलेबाजी केली आहे. दीपाली सय्यद ट्वीटमध्ये म्हणाल्या, “मनसेच्या ‘जागर यात्रे’ने…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे एक विचित्र घटना घडली आहे. आपली बायको माहेरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांनीच त्याला फुस दिल्याच्या संशयातून सख्ख्या मुलाने त्यांची घर जाळून टाकले आहे. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात घडली आहे. सविस्तर असे की, या घटनेतील संशयित आरोपी समाधान भीमराव घोडकी याची बायको अलीकडेच तिच्या माहेरी गेली होती. आपले आई-वडील यांच्यामुळेच बायको माहेरी गेल्याचा संशय त्याच्या मनात बळावला. त्यावरून त्याने आई-वडिलांना धमकावलेही होते. त्यानंतर बापावरती संशय घेत दगड घेऊन तुम्हाला मारतो, असे धमकावत त्याने सर्व घरातील वस्तू जाळून टाकल्या. त्यात किमान आठ हजार रुपये किमतीचे संसार उपयोगी, कपडे, धान्य, गादी, पलंग आणि घरातील…
मलकापूर : प्रतिनिधी येथील सेठ बी.जे.संचेती लोकसेवा ट्रस्टद्वारा आणि साधू वासवाणी, पुणे यांच्या सहकार्याने रविवारी, २० ऑगस्ट रोजी मलकापूर येथील महावीर भवन येथे मोफत कृत्रीम हात, पाय शिबिराचे (आर्टिफिशियल लिम्ब कॅम्प) आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अमरसेठ संचेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.साहेबराव मोरे, भा.रा.काँ.चे शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील, डॉ.विजय डागा, भा.रा.काँ.चे जिल्हा सचिव शिरीष डोरले, मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, हनुमान सेना प्रमुख अमोल टप, संजय श्रीमाळ, मेजर नामदेवराव पाटील, दिलीप गोळीवाले, अशोक संचेती, अमित संचेती, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम राठी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साधू वासवाणी यांच्या…