मुंबई ः प्रतिनिधी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आधी येवला, मग बीड आणि आता कोल्हापुरात शरद पवारांची सभा होणार आहे. येत्या 25 तारखेला कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार? कुणावर टीका करणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर…
Author: saimat
नवीदिल्ली ः काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करण्यात आली होती. यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणात आरोपी असलेल्या माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांनी यापूर्वी जानेवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर प्रदीप शर्मा यांनी…
संभाजीनगर ः केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.यासाठी भाजपा अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणे आवश्यक आहे, तशी आमची दोस्ती आहे,असे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इ्म्तियाज जलील हे दानवे यांच्या शेजारीच बसले होते. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेना-भाजपाची युती असताना असताना शिवसेनेच्या ताब्यात होता. शिवसेनेमध्ये आता दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट भारतीय…
बीड : बीडच्या राजकारणात होत असलेली खळबळ आणि काका पुतण्यांचे वाद जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मात्र, आता जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मोठा धक्का बसत आहे तो म्हणजे त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त आज बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर जाहिरातबाजी केली जात आहे. जाहिरातीच्या बॅनर्सवर जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो लागल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमवीर जयदत्त क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यांसमोर महत्त्वाचा खुलासा केला आहे. आज मुंबईमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली होती. तरीही माझा…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील तीन तरुण सोमवारी रामेश्वर तीर्थक्षेत्राजवळील नदीत बुडाले होते. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. सागर अनिल शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष रवि शिंपी (तिन्ही रा. एरंडोल) अशी बुडालेल्या तीनही तरुणांची नावे आहेत. हे तीनही तरुण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, एरंडोल शहरातील भगवा चौकातील काही तरूण…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडासीम येथील ग्रामपंचायतीला २०२० पासून मिळालेल्या निधीत अनियमितपणा आणि अपहार झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, १० महिन्यांपासून त्याची चौकशी न झाल्याने यावल पंचायत समितीचे माजी गटनेते आणि ग्रामस्थांनी १४ ऑगस्टपासून यावल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाला महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन १८ रोजी रास्ता रोको केला होता. त्याच आधारे पुन्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावखेडासीमच्या ग्रामस्थांनी सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी ४:४५ वाजेपर्यंत अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर यावल येथे टी- पॉईंटवर मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पाच तास यावल येथून चोपडा,…
सोयगाव : प्रतिनिधी निंबायती ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंचपदी सुनीता राजू पाटील यांची सोमवारी, २१ रोजी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी केली. त्यामुळे निंबायतीच्या सरपंचपदी सुनीता पाटील ह्या नवनियुक्त सरपंच ठरल्या आहेत. सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभागृहात होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. निंबायती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवारी अध्यासी अधिकारी विठ्ठल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच पदासाठी सुनीता पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे सुनीता पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी यांनी केली. सूचक म्हणून सदस्य विशाल गोसावी यांनी नाव सुचविले होते. यावेळी…
मलकापूर : प्रतिनिधी स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने जोरदार मुसंडी मारत मेगा कॅम्पस ड्राइव्ह अंतर्गत डिप्लोमा कॉम्प्युटर पदविका व बीई कॉम्प्युटर पदवी तसेच बीसीए, एमसीए शाखेतील २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षीतील विद्यार्थ्यांसाठी डब्लूएनएस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे व सुमा प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील जागतिक पातळीवर सेवा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या नामांकित कंपनीचे ‘ओपन कॅम्पस ड्राईव्ह’चे ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयात मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी एका पाठोपाठ एक अशा अनेक कंपन्याच्या कसोटीला उतरत असल्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगार भिमुखता वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. तसेच महाविद्यालयात ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत…
फैजपूर, ता. यावल : वार्ताहर बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासण्याचा भयंकर प्रकार तालुक्यातील न्हावी गावानजीक उघडकीस आला आहे. यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील एका शेतात पोटच्या पाच वर्षीय चिमुकलीला विहिरीत ढकलून देत तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यात नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनिता ठूशा बारेला (वय ५, रा. न्हावी ता.यावल) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. सविस्तर असे की, ठुश्या भावला बारेला (वय ३०, रा. गुलझीरी ता.झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) हा सध्या यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील सुनील नामदेव फिरके यांच्या शेतात वास्तव्याला आहे. त्यांची पाच वर्षाची चिमुकली कन्या…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या अभियाना अंतर्गत येत्या १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी उपस्थित राहतील. शिबिरात मुक्ताईनगर तालुक्यातील व पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी, एनएसएस स्वयंसेवक आणि नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ हे ब्रीदवाक्य ऊराशी बाळगून आपण प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने कुटुंबात, समाजात व गावागावात पोहोचवावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना व…