मलकापूर : प्रतिनिधी ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग ते मलकापूर तब्बल २०० कि.मी. पायी कावड आणि छत्रपती शिवाजी नगर येथील राजेश्वर शिव मंदिरात जलाचा अभिषेक करण्यात आला. कावडधारी जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सूर्यवंशी, गजराज साळुंके, गोलू पोंदे यांचे छत्रपती शिवाजी नगर वासियांनी ढोल-ताशाच्या निनादात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले. बऱ्हाणपूर येथील शिवभक्त दरवर्षी ओंकारेश्वर ते बऱ्हाणपूर कावड यात्रेचे आयोजन करतात. शांतनु पाटीदार यांच्या अध्यक्षतेखाली ही कावड आयोजित केली जाते. छत्रपती शिवाजीनगर येथील चार जण बऱ्हाणपूर येथील पंकज मोरे यांच्या माध्यमातून यात्रेत सहभागी झाले होते. १८ ऑगस्ट रोजी ही यात्रा ओंकारेश्वर येथून निघून दररोज ४० कि.मी. पायी चालून त्यांचा…
Author: saimat
सोयगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यातील प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय व निर्धार करणारे जरंडी गाव अग्रस्थानी ठरणार आहे. गावातील व्यावसायिक, किराणा दुकानदार, ग्रामस्थांनी प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करून कागदी पेपर पिशवीचा वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतमार्फत केले आहे. दररोज वापरता प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर, मोकळ्या पटांगणात उकिरड्यावर फेकल्या जातात. गुरा-ढोरांच्या खाण्यात प्लास्टिक पिशव्या येत असल्याने त्यांच्या जीवितास हानी होण्याची शक्यात असते. तसेच प्लास्टिक पिशवीचा अति वापर व वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावून तिला योग्य प्रकारे नष्ट करता…
रावेर : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेला विराम देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपण रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. अखेर रावेर विधानसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राजकीय लॉन्चिंग झाले आहे. यासंदर्भात त्यांनी मॅक्रो व्हिजन अकॅडमी शाळेत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. पत्रकार परिषदेला गोपाल दर्जी, पिपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, प्रवीण पाचपोहे, मॅक्रो व्हिजन अकॅडमीचे सचिव स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. रावेर विधानसभा निवडणूक मी लढवावी हे जनतेच्या मनात आहे. म्हणून आपण पुढची निवडणूक लढणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका…
सोलापूर : ‘सैराट’, ‘फँड्री’ या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घातले आहे. आज या चित्रपटांना प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली असली तरीसुद्धा हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. नागराज मंजुळे हे नाव यामुळेच आपल्या लक्षात राहते. नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. २४ ऑगस्ट १९७८ साली त्यांचा जन्म कर्माळा येथे झाला. त्यांच्या चित्रपटातील विविध सामाजिक विषयांचे वास्तविक चित्रण जगासमोर आणले. २०१६ साली आलेल्या ‘सैराट’ या चित्रपटानं तर संपुर्ण जगाला वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘झिंगाट’ हे गाणंही अख्ख्या जगात लोकप्रिय झाले होते. मध्यंतरी चर्चा होती ती म्हणजे नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशीटची. त्यांनी आपली मार्कशीट शेअर केली…
पुणेः तीन वर्षाच्या मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात वडिलांकडे तक्रार केली. मुलीची तक्रार ऐकून बापाच्या पायाखालची जमिनच हादरली. त्याने लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली आहे. टीचर शाळेत केस ओढतात… टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, अशी तक्रार तीन वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांकडे केली. मुलीने केलेल्या या तक्रारीनंतर वडिलांनीही थेट पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. कोथरूड पोलीस ठाण्यात ४० वर्षीय शिक्षिकेविरोधात भादवी ३२३, ५०६, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३६ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. चिमुकलीची वडिलांकडे तक्रार…
चेन्नई : पतीच्या अती शहाणपणामुळे त्याच्या गरोदर पत्नीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युट्युब पाहून पतीने पत्नीची घरची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात पत्नीला अति रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चेन्नईतल्या पोचमपल्ली इथल्या पुलियामपट्टीची ही घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी राधिका यांनी याबाबत माहिती दिली. लोगनयाकी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ती २७ वर्षांची होती. लोगनायकी गरोदर होती. तिला प्रसवपिडा सुरु झाल्याने तिने पती मधेशला रुग्णालयता नेण्यास सांगितलं. पण मधेशने तिला रुग्णालयात न नेता घरातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पत्नीने याला विरोध केला. पण मधेशने तिची…
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव हे जातीयवादी होते. एवढेच नाही तर भाजपाचे ते पहिले पंतप्रधान होते असा आरोप मणिशंकर अय्यर यांनी केला. मणिशंकर अय्यर म्हणाले की राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. त्यांनी राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी राजकारणात आल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं. नरसिंह राव यांनी माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सोनिया गांधींमुळे वाचलो असेही अय्यर यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचं आत्मचरित्र ‘मेमोयर्स ऑफ ए मेवरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स’…
मुंबई : मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत इंडिया बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पुढील काळात राजकीय घडामोडीचे केंद्र मुंबई असेल असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार करण्यात आली आहे. आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे, तर दुसरम्ी बंगळूरुत झाली, तिसरी बैठक मुंबईत होत आहे. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. देशातील सुमारे २६ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना…
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. वांद्य्रातील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव आणि सीमा देव हे सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव होतं. या दोघांनी एकत्र सिनेमे करत इंडस्ट्री गाजवली, तसंच त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली. २०१३ मध्ये सीमा आणि रमेश देव यांनी त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा केला होता. सीमा देव यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी दोघांच्या आयुष्याबाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. सीमा त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या सहजीवनाचं रहस्य सांगितलं होतं. सीमा यांनी लग्नाच्या ५० वर्षाच्या प्रवासाबाबत बोलताना सांगितलं, की लग्न झाल्यानंतर ५० वर्ष कशी गेली…
अमळनेर : आज चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील यांनी सन 1980 मधील इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले की, ‘एक गोष्ट खान्देशासाठी व महाराष्ट्रासाठी लक्षात आणून देणे, त्याची माहिती नवीन तरुणांना करून देणे हे महत्त्वाचं आहे..’ चांगल्या इतिहासाच्या संशोधनाचे एक प्रतीक म्हणून माजी खासदार विजय नवल पाटील 1980 मध्ये एरंडोल मतदार संघातून निवडून गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या मंत्रिमडळात त्यांची केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणून नियुक्ती केली होती.त्यांच्या माध्यमातून बंगरूलू येथील इस्रोच्या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विजय नाना यांनी संबोधित केले व इस्रोच्या प्रकल्पासंदर्भात पाहणी केली. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला अब्दुल कलाम…