मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील मोमिनाबाद जि.प.म.उ.प्रा.शाळा येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ‘शाहू महाराज-एक आठवण’ आणि ‘शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य’ ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ६ वी, ७ वीच्या गटातून सुरेखा वाघोदे तर ३ री, ५ वीच्या गटातून आरुषी वानखडे ह्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक पुरुषोत्तम राणे, रामेश्वर तायडे, सुधीर भंगाळे, सुरेश तायडे, सदाशिव पवार यांच्यासह विद्यार्थ्यांची…
Author: saimat
मलकापूर : प्रतिनिधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले. तेव्हा अण्णाभाऊसह समाजसुधारकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.मुकुल वासनिक यांनी केले. लोणार येथील श्री मंगल कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संकल्प सभेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फॉर्मचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्ट रोजी संकल्प सभा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांनी केले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साहेबराव पाटोळे होते. व्यासपीठावर आ.राजेश एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष…
भुसावळ : प्रतिनिधी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करतांना महसूल पथकाशी हुज्जत घालत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना वराडसीम-बेलव्हाय रस्त्यावर बुधवारी घडली. याप्रकरणी मंडळाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील वराडसीम ते बेलव्हाय रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मंडळाधिकारी योगीता पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. त्यावेळी चालक अविनाश चंद्रकांत पवार (रा. बेलव्हाय, ता. भुसावळ) याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील पंचशिल नगरातील मशीदजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलला धडक देवून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील मटन मार्केटजवळ शाहीम शेख मुजाहिद (वय १६) हा विद्यार्थी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो सध्या दहावीचे शिक्षण घेत आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता शाहीम शेख हा सायकलीने जात होता. तेव्हा शेख तौसिफ उर्फ बाबू शेख फिरोज दुचाकीने जात असतांना शाळकरी मुलाच्या सायकलला धडक दिली. त्याचा जाब विचारल्यावर शेख तौसिफ याने चाकू काढून पायावर व हातावर मारून दुखापत केली. तसेच…
अहमदनगर ः माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण झालेला तरुण अल्वयीन आहे. अत्यंत किरकोळ कारणावरु त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. शेळी चोरल्याच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेय. त्याच्यासह इतर काही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे हा अमानुष प्रकार घडला आहे. अत्यंत अमानुष कृत्य मारहाण करणाऱ्यांनी तरूणाला झाडाला उलटे लटकावले आणि माणुसकीला लाजवणारे कृत्य केले. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणेल असाच हा प्रकार आहे. या…
मुंबई ः प्रतिनिधी भाजपाच्या तेलंगणातील एका खासदारांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यावरून विरोधकांनी आता मोदी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सत्ताधारी भाजपा व केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच या खासदारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. काय म्हणाले खासदार डी. अरविंद? तेलंगणातील भाजपा खासदार डी. अरविंद यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर…
मुजफ्फरनगर ः उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. त्याच्या धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत तीव्र प्रतिक्रिया दिली. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. शिक्षिकेने वर्गात इतर मुलांना एका मुस्लीम मुलाला मारण्यास सांगितले आणि त्याचा अभिमान असल्याचे म्हटले. पीडित मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून काढून घेतले आणि लेखी दिले की, त्यांना कुणावरही कारवाई करायची नाही. वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना न्यायाची कोणतीही आशा नाही आणि त्यांना वातावरण खराब होईल अशी…
कोल्हापूर ः हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन मुश्रीफांनीही शरद पवारांवर टीका करत शरद पवारांनी सहानुभूती दाखवली नाही, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून सहानुभूती मिळाली नाही, असा दावा हसन मुश्रीफांनी केला असल्याबाबत प्रश्न पत्रकारांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, काय करायचं साहेबांनी? साहेबांनी काय करावं अशी इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्यासह मी उभा आहे हे सांगणे सहानुभूती नाही का? शरद पवारांनी अजून काय करावे…
मुंबई ः प्रतिनिधी मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले असून तिला अटक करण्यात आली आहे. रमेश गुप्ता (६९) हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी राजकुमारी या गृहिणी असून हे दाम्पत्य त्यांच्या ३० वर्षीय मुलासह मीरा रोड येथे आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. गुरुवारी सायंकाळी गुप्ता यांच्या फ्लॅटमधून आवाज आल्याने सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या शेजऱ्यांनी गुप्ता कुटुंबाकडे धाव घेतली. तेव्हा रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर त्यांची पत्नी राजकुमारी मृतदेहाशेजारी उभी होती.…
ठाणे : कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात मृतदेह फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिला मृतदेह नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट येथे, तर दुसरा मृतदेह वाशाळा फाटा या ठिकाणी १९ जून रोजी सापडला होता. दोन्ही मृतदेहांबाबत पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, फॉरेनसिक लॅब यांना पाचारण करून पंचनामा केला असता त्यांचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला. एकाच दिवशी दोन मृतदेह सापडल्याने जिल्हा…