काश्मीर ः उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करणे), ५०४ (जाणूनबुजून अपमान…
Author: saimat
मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडले आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत.या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही त्यांच्या काळात केला नसेल.काल गुजरातच्या मंत्रालयात नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपाचा मित्र असलेल्या उद्योगपतीला ३७०० कोटींचा फायदा मिळवून दिला आहे. शक्तिसिंह…
सोलापूर : मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याचा राग मनात धरून दारूड्या नवऱ्याने पत्नीचा खून केला आणि तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार करमाळा शहरात घडला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उमा प्रफुल्ल पवार (वय ३२, रा. फंड गल्ली, करमाळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ दादा मारुती चव्हाण (वय ३५, रा. लऊळ, ता. माढा) याने करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मेव्हणा प्रफुल्ल विठ्ठल पवार (वय ४१) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नोंद झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रफुल्ल पवार यास दारूचे व्यसन असून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नव्हता. त्यामुळे मुलांचे पालनपोषण होणे कठीण झाले होते.…
मुंबई ः प्रतिनिधी मुस्लीम समाजातील विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून थप्पड मारणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही एक गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. कबुतर आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून तीन दलित तरुणांना बेदम मारहाण केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत असून तो हात जोडून विनंती करताना दिसतोय. आपण निर्दोष असल्याचे वारंवार सांगूनही त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही.तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्या मुलाला झाडाला टांगलेले दिसत आहे. “महाराष्ट्रात आणखी एक जातीय अत्याचार. हा व्हिडीओ श्रीरामपूर,…
नागपूर : ‘संकट आले आहे’, असे सांगून सासू-सुनेला बेशुद्ध करून दोन भामट्यांनी त्यांच्याकडील दागिने पळविले. ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील धम्मदीपनगर येथे घडली. याप्रकरणी वर्षा किरण बोरकर (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वर्षा आणि त्यांच्या सासू पुष्पा (वय ४२) या शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघीच घरी होत्या. एक युवक त्याच्या घरासमोर आला. …मी जामसावळी येथून पालखीसाठी आलो आहे, दान द्या’, असे तो म्हणाला. पुष्पा या त्याला दहा रुपये देण्यासाठी गेल्या असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पुष्पा यांनी त्याला प्यायला पाणी दिले.…
मुंबई : कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेले दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई हे मदत मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडेही गेले होते. पण उद्धव ठाकरे यांनी नितीन देसाई यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी त्यांच्याकडे गेलेल्या अनेक मराठी उद्योजकांना अशीच वागणूक दिली. त्याची यादी मी लवकरच जाहीर करेन, असेही दरेकर यांनी सांगितले. त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन याबाबत सविस्तर भाष्य केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपचे खासदार आणि स्टार प्रचारक असलेल्या सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव रोखण्यासाठी २४ तासांत हालचाली झाल्या पण याच…
जळगाव ः प्रतिनिधी परमपूज्य डॉ. बाबासाहेब ऊर्फ चिदानंद अवधूत बाबामहाराज तराणेकर यांचे हस्ते त्यांचे शिष्य मुष्टीकर काका यांचे सन्मानार्थ कृतार्थ पुस्तिकेचा प्रकाशन पुणे येथे दि. २६ ऑगस्ट रोजी थाटात झाला. प्रस्तुत सोहळ्यास जयश्रीवहीनी तराणेकर, राहुल किर्लोस्कर तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.प्रस्तुत प्रसंगी लेखिका तथा कर्तृत्व अग्रणी जयश्री वहीनी तराणेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तेजस तराणेकर व भाग्यश्रीताई तराणेकर, राहुल मुष्टीकर यांचे सक्रिय योगदान लाभले. परमपूज्य बाबामहाराजांनी गुरूवर्य नानामहाराज तराणेकर यांचे कार्यातील पैलू व त्यातील कार्याचे वैविध्यपूर्ण सामर्थ्य,संपन्नतेचे चैतन्य शिष्यांमध्ये पहावयास मिळते यासह श्री. मुष्टीकर यांचे विज्ञान, तत्वज्ञान-निष्ठतेने होणाऱ्या कार्याचा सन्मान करताना …कृतार्थ’ प्रकाशन प्रसंगी आशीर्वादपूर्ण…
यावल : सुरेश पाटील रावेर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ सदस्य पदाचे ‘स्वप्न’ पाहणारे जे कोणी अपक्ष किंवा राजकीय पक्षाचे इच्छुक भावी उमेदवार आहेत ते आधी १९६२ पासून अनुक्रमे यावल व आताचा रावेर विधानसभा क्षेत्राचा तसेच १९५२ पासूनचा जळगाव लोकसभा मतदारसंघापासून तर आताच्या रावेर लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, संस्कृतीचा राजकारणाचा भूतकाळ, वर्तमानकाळाचा भविष्यकाळाचा विचार करणार आहेत किंवा नाही? असे रावेर लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील समाजात, राजकारणात चर्चिले जात आहे. रावेर विधानसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकरीवर्गासह सर्व जाती धर्मातील, सर्वस्तरातील मतदार हा फार ‘हुशार’ आणि ‘चतुर’ आहे. निवडणूक रिंगणात कोणकोणत्या राजकीय पक्षातर्फे किंवा अपक्ष उमेदवारी घेणार…
सोयगाव : प्रतिनिधी बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत असलेले सात प्रवाशी बसमध्ये बसताच अचानक बस स्थानक कोसळल्याची घटना निंबायती फाट्यावर शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दैव बलवत्तर होते म्हणून बसमध्ये चढलेले प्रवाशी बचावले आहे. सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील निंबायती फाट्यावर बस थांबा आहे. हा बसथांबा अनेक दिवसांपासून खिळखिळा झालेला होता. केवळ छत असलेल्या बस थांब्याची मदार खांब्यावर होती. परंतु नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे हा बस थांबा धोकादायक झाला होता. शनिवारी दुपारी बस थांब्यात सात प्रवाशी बसची प्रतीक्षा करत उभे होते. दुपारी दोन वाजता सोयगावकडून बनोटीकडे जाणारी बस थांब्यावर उभी राहिली. बस थोडी पुढे निघाल्यावर छतासह पूर्ण बस थांबा पत्त्यासारखा…
वरणगाव : प्रतिनिधी शिरसाळे येथील मारुती रायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ शनिवारी पहाटे घडली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात बचावले आहे. चौघेही मित्र सावदा येथील रहिवाशी आहेत. घटनेमुळे सावद्याच्या चांदणी चौकात शोककळा पसरली होती. मयत भास्कर कुंभार आणि लखन कुंभार यांच्यावर दुपारनंतर सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत भूषण पुर्भी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, सावदा येथील भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार, भूषण चंद्रकांत कुंभार, भूषण किशोर पुर्भी (सर्वांचे वय-१८ ते १९) हे चार शालेय मित्र गेल्या…