Author: saimat

फैजपूर : प्रतिनिधी येथून जवळील पाडळसे येथे भोई समाजासाठी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सामाजिक सभागृहाची मागणी पुढे येत होती. त्या अनुषंगाने गावातील भोई समाजाच्या युवकांनी पाडळसे ग्रामपंचायतीकडे जागा मागणी केली होती. यासाठी पाडळसे ग्रामपंचायत आवारात पार पडलेल्या ग्रामसभेत जागा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. गावापासून जवळील गट नंबर १२३४ मध्ये भोई समाज सामाजिक सभागृह बांधण्याचे प्रस्तावित असल्याने त्या जागेवर साफसफाई करण्याचे काम पाडळसे येथील सरपंच पती ॲड. सुरज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार भोई, उपसरपंच अलका सोनवणे, पूनम पाटील, पांडुरंग कोळी, मनोज पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश भोई, सुरज कोळी, दिलीप…

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील नाडगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाची आ.एकनाथराव खडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली. आ.एकनाथराव खडसे यांनी पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, किशोर गायकवाड, राजेंद्र माळी, भागवत टिकारे, विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, भरत पाटील, दीपक वाणी, किरण वंजारी, प्रमोद धामोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग आहे. येथे असलेले रेल्वे गेट तासन्‌‍तास बंद राहते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एसबीआय बँकेजवळ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तरूणावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवक एक जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी गांजाचा नशा करणारा शेख रमजान शेख रउफ (वय ३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याच्यावर कारवाई केली. त्यांच्याजवळून नशा करण्याचे साधन हस्तगत केले. पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख रमजान शेख रउफ याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात…

Read More

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात एक भयंकर अपघात झाला आहे. घोडबंदर रोड येथे मेट्रोच्या खांबाला धडकून एका ३० वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. इतके च नव्हे तर अपघातानंतर त्याच्या बाईकने पेट घेतला. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्याकाही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेकदा खड्डयांमुळे तर कधी कधी निष्काळजीपणांमुळेही अपघात होत असतात. ठाण्यातील या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातानंतर दुचाकीही जळून खाक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे ५.३०च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी दुचाकीस्वार हा मिरा रोड…

Read More

भंडारा : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर मोहाडी पोलिसात अपघाताची नोंद करत पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजूला नातेवाईकांसोबत बोलत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या डब्लु सी एल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.या धडकेनंतर दुचाकीस्वार पती -पत्नी जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर झाली आहे. तुमसर-मोहाडी…

Read More

बारासात (पश्चिम बंगाल) ः पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी एका बेकायदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की,कोलकात्याच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या दत्तपुकुर पोलीस ठाण्यांतर्गत नीलगंजच्या मोशपोल भागात फटाक्यांच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत असताना हा स्फोट झाला.जखमींमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण आणि जोरदार होता की, त्याच्या धयाने कारखाना कोसळून त्याचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले. परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केला आहे. मेमध्ये पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा येथे एका…

Read More

बंगळुरु ः काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. त्यानंतर मीरारोड परिसरात सरस्वती वैद्यची तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज सानेने निर्घृणपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये लपवून ठेवले होते.आता पुन्हा एक लिव्ह-इन पार्टनर तरुणीच्या हत्येचा प्रकार उघड झाला आहे. २४ वर्षीय तरुणाने त्याच्या समवयीन लिव्ह-इन पार्टनरची कुकरने हत्या केली असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. बंगळुरूच्या साऊथ-ईस्ट डिव्हिजनचे डीसीपी सी. के. बाबा यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी बंगळुरूच्या बेगूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव वैष्णव असून तरुणीचे नाव देवी…

Read More

चेन्नई ः वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उटी या ठिकाणी असलेल्या चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली. या चॉकलेट फॅक्टरीचे वैशिष्ट्य हे आहे की, या फॅक्टरीत सगळ्या महिलाच काम करतात. इथे काम कसं चालतं हे जेव्हा राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांकडून जाणून घेत होते त्याचवेळी तिथे एक लहान मुलगी आहे. तिने राहुल गांधींना एक विनंती केली. ज्यानंतर राहुल गांधी यांनी केलेली कृती चर्चेत आहे. हा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. काय आहे व्हायरल व्हिडीओत? राहुल गांधी महिला कर्मचाऱ्यांशी बोलत होते त्याचवेळी तिथे एक चिमुरडी मुलगी आली. तिने राहुल गांधींना विचारले, तुम्ही मला सही द्याल का? राहुल गांधींनी तिच्या वहीवर सही केली आणि…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत, असे चॅलेंज राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका कार्यक्रमात केले होते. तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले नऊही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परततील असा दावाही त्यांनी केला होता. यावर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. २०२४ नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय होईल. जागा वाटप या समन्वयाने होईल. त्यानंतर जो काही निकाल येईल, त्यानंतर केंद्रीय संसदीय मंडळ जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “५१ टक्के लोक मोदींच्या बाजूला आहेत.अजितदादांनी चांगला निर्णय घेतला.राजकारणात काही…

Read More

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या बीडच्या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून प्रहार केलेतेलगी प्रकरण, पहाटेचा शपथविधी ते दादांचे नेतृत्व यावरून भुजबळांनी फटकेबाजी करताना शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. संपूर्ण भाषणात भुजबळांनी पवारांना टार्गेट केले. आधीच लांबलेल्या भाषणाला उपस्थित कंटाळले होते. त्यात भुजबळ एकामागून एक पवारांवर वार करत राहिले. हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.पवारसाहेबांच्या विरोधात सूर निघाल्याने उपस्थित बीडकरांनी गोंधळ केला.त्यामुळे पुढच्या २ मिनिटांत त्यांना भाषण गुंडाळावे लागले, अशी टीका रोहित पवार यांनी केली. …सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची……

Read More