Author: saimat

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय ३२) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत…

Read More

लखनऊ ः उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम प्रवाशांना नमाज पठणासाठी दोन मिनीट बस थांबवल्यामुळे एका बस वाहकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी समोर आला होता. दोन दिवसांपूर्वी या बसवाहकाने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली असून आता उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळावर या वाहकाच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. ३२ वर्षीय मोहित यादव उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होते. ३ जून रोजी कौशंबीवरून दिल्लीच्या दिशेने जाणारी बस त्यांनी रामपूरनजीक दोन मिनिटांसाठी थांबवली होती.बसमधील काही मुस्लीम प्रवाशांना नमाज पठनासाठी त्यांनी बसचालक के.पी.सिंह याला दोन मिनिटांसाठी बस थांबवायला सांगितली मात्र याविरोधात काही लोकांनी तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहित यादव…

Read More

बंगळुरु ः भाजपाला पराभवाची धूळ चारत कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता १०० दिवस लोटले आहेत. “सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने पाच आश्वासने दिली होती. त्यापैकी तीन आश्वासने पूर्ण केली असून, चौथे आश्वासन बुधवारी (३० ऑगस्ट) पूर्ण करू”, असे सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे. सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात थोडी डळमळीत होती. बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले होते परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी या पदाचा हट्ट सोडला. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांनी बंगळुरू विकास (ज्याच्या अंतर्गत बृह्नबंगळुरू महापालिका येते) आणि…

Read More

नागपूर : समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता भाजपा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे राहिलेल्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मलाही १०० कोटींची ऑफर असल्याचा दावा सुनिल राऊतांनी केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओत त्यांनी असे म्हटले आहे. “संजय राऊतांनीही विचार केला असता, भाजपासमोर गुडघे टेकले असते तर ते साडेचार महिने तुरुंगात गेले नसते. मंत्री झाले असते. पण संजय राऊत डमगमला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा होती. पक्षासाठी, संघटनेसाठी त्यांनी जे केलं…

Read More

नागपूर : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील पदसंख्येसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण ८१७० ऐवजी ८२५६ पदांची भरती करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तसेच दिनांक २८ जून, २०२३, ७ जुलै, २०२३ व दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार भरावयाच्या एकूण ८१७० पदांचा समावेश करण्यात आला होता. दिनांक ८ ऑगस्ट, २०२३ रोजीचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…

Read More

सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना.अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार यांना योग्य वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिपादन आ. रामराजे नाईक – निंबाळकर यांनी केले. दहिवडी (ता. माण) येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे आदी उपस्थित होते. आ. रामराजे म्हणाले की, खा. शरद पवार यांनी देशात, राज्यात विकासाचे राजकारण केले व तेच कार्यकर्त्यांना शिकवले. भविष्यातील विकासासाठी आम्हाला युती सरकारमध्ये…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी येथील जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे प्रथम वर्ष प्रवेशित इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘इंडक्शन प्रोग्राम’ आयोजित केला होता. यादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विविध प्रयोगशाळा तसेच सुविधांची माहिती दिली. महाविद्यालयाचे ॲकेडेमिक डीन डॉ.पी.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध शाखांच्या अभ्यासक्रमाविषयी तसेच अभ्यासाच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.के.जी.पाटील यांनी प्रथम वर्षाला असलेला अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जळगाव येथील “गती फाउंडेशनचे” देवदत्त गोखले, रश्मी गोखले यांनी विद्यार्थ्यांना “कम्युनिकेशन स्किल” विषयावर मार्गदर्शन केले. पुढील सत्रात धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.जगदीश…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून अवतरण दिन साजरा केला. सुरत येथील राजूभाऊ राणे यांच्या तर्फे ४५ गुलाब पुष्पहार अर्पण करून मोतीचूर लाडूची तुला करण्यात आली. रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करताना राष्ट्रीय कार्य तसेच समाजाभिमुख उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत, असा संदेश त्यांनी दिला. रक्त संकलनाचे कार्य संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांचे संचालक नितीन इंगळे व रक्तपेढी समन्वयक नेमचंद बऱ्हाटे यांच्या संपूर्ण टीमसह सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत रक्त संकलनाचे कार्य केले. दिवसभर परमपूज्य महाराजांना शुभेच्छा…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात २३ रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर पी.एस.आय.बोरकर आणि सोबत असलेले कर्मचारी यांनी सिनेस्टाईलप्रमाणे जामनेरवरून येणारी इर्टिका गाडी अडवून ज्या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्याप्रमाणे त्या गाडीत आठ ते दहा लाख रुपयाची रक्कम असलेले गाठोडे होते, अशी नागरिक चर्चा करत आहे. ज्या हॉटेलवर हा दरोडा पडला त्या हॉटेलवर कायमस्वरूपी क्लब चालविण्याचे चर्चिले जात आहे. हॉटेल मालक जामनेर येथील विशिष्ट राजकीय नेत्यांचे जवळचे असल्यामुळे गाठोडे दाबण्यात तर आले नाही ना? की त्याची प्रशासकीय ‘लेव्हललाच’ विल्हेवाट लावली असेल, अशी चर्चा सुज्ञ नागरिक करत आहे. या टवाळखोऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात विशिष्ट क्लबवरच दरोडा टाकल्याचे चर्चिले जात आहे. सावदा,…

Read More