Author: saimat

मुंबई ः प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संंग्रामच्या निमित्ताने संभाजी नगर येथे उद्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ उद्या संभाजीनगरला येईल. त्यांच्या राहण्याची सोय येथील हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे तर विश्रामगृहेही बुक करण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा सवाल संजय राऊतांना विचारण्यात आता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “या सरकारचे आम्ही अंत्यसंस्कार थाटामाटतच करणार आहोत. हे त्यातच जाणार आहेत. तीन तासांसाठी संपूर्ण प्रशासन वेठीस धरता. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. येथे प्यायला पाणी नाही, अनेक प्रश्न आहेत. आमचे…

Read More

नाशिक ः प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ, पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आत्ता पाऊस पडत असला तरी पाऊस पडण्याआधीच ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे काय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागील वर्षीही नुकसान झाले, त्याचे पंचनामे झाले. त्यावेळी मी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे असे सगळेच फिरत होतो.मागील वर्षी अतिवृष्टी झाली,आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली मात्र, काहीही मदत मिळाली नाही. पंचनामे होतील, पण पुढे काय? “यंदाही पाऊस पडायला सुरुवात झाली असली, तरी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे होतील, पण पुढे काय? म्हणून माझा प्रश्न हाच राहील की, उद्या मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक आहे.कदाचित आत…

Read More

पुणे : प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन आरोग्यप्रमुखांची एकाच दिवशी बदली केल्याने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पदावर तर पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांची मुंबई येथील आरोग्य सेवा औद्योगिक विभागाचे सहाय्यक संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी काढले…

Read More

नवीदिल्ली ः केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा त्यांनी अद्यापही गोपनिय ठेवला असून यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले ेआहे. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून विशेष अधिवेशनात चर्चा होणार याबाबत खुलासा न झाल्याने काँग्रेसनेही यावरून टीका केली आहे. दरम्यान, मोदी चालिसा ऐकण्यासाठी आम्ही अधिवेशनात बसणार नाही,अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाची काल (५ सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. काँग्रेसच्या बैठकीआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली होती. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, “सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नाही…

Read More

रामपूर ः तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून देशभरातून गदारोळ झाला होता. आता उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचे उच्चाटनच केले जायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे विधान उदयनिधी यांनी…

Read More

वॉशिंग्टन ः द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगाशी करून सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबतचे विधान केले. ज्यावरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. तर याप्रकरणी उदयनिधी यांच्याविरोधात आता गुन्हाही दाखल झाला आहे. एकीकडे भारतात हा वाद सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेच्या एका शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंटुकी येथील लुईव्हिल शहराच्या महापौरांनी शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. उपमहापौर बार्बरा सेक्स्टन स्मिथ यांनी महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या वतीने लुईसविले येथील…

Read More

गाझियाबाद : मुलाला पाण्याची भिती वाटू लागली, अचानक वागण्यात बदल होऊ लागला. मध्येच बोलताना भुंकू लागला हा सगळा प्रकार पाहून धास्तावलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचार सुरू करण्यापूर्वीच १४ वर्षांच्या मुलाने बापाच्या कुशीत जीव सोडला. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये १४ वर्षांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा चावला. जखम खोल नसल्याने त्याने घरी कोणालाही न सांगता त्यावर स्वतःच उपचार घेतले. आई-बाबा ओरडतील या भीतीने त्याने त्या जखमेवर मलम लावून. जवळपास एक महिन्यांपूर्वी त्याला कुत्रा चावला होता. पण वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात रेबिजचा संसर्ग पसरला. त्यानंतर त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. शाहवेज असे…

Read More

अकोला ः शहरात एक मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन महिन्यांनंतर चिमुकलीच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकोल्यात आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईने हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसही हादरले आहे. आईच आपल्या पोटच्या लेकराची मारेकरी निघाली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्याने हत्येचा खुलासा झाला आहे. काय घडले नेमके? २ जूनला नाकाला चिमटा लावून मुलगी झोपली होती. नाकाला चिमटा तसाच लागून असल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने गोयल यांना अटक केली आहे. कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. जुलै महिन्यात काय घडले? जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीच्या या कारवाई दरम्यान ईडीने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. आता नरेश गोयल यांना रात्री उशिरा अटक करण्यात…

Read More

प्रतापगड ः राजस्थानातल्या प्रतापगड जिल्ह्यातल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावात एका आदिवासी विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. २१ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीकडून आणि सासरच्यांकडून विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली.ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहात होती.त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात…

Read More