आ.मंगेश चव्हाण यांनी स्वतःची संकल्पना दाखवून जनतेची दिशाभूल थांबवावी

0
26

भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा स्वपक्षियांवर गंभीर आरोप

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण उद्घाटन करण्यात येत आहे. चौकास आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या नावाची संकल्पना देवून आपले नाव त्यावर प्रकाशित करुन आमदारांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक, शिवप्रेमी संघटना तसेच चाळीसगाव शहरातील शिवभक्त जनतेचा आपण अनादर केला आहे, हे दुर्दैवी आहे.

आ.मंगेश चव्हाण यांचे हे वागणे चाळीसगाव भाजपतील लोकशाही संपली असल्याचे विदारक सत्य असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे.शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

ते पुढे म्हणाले की, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी चौकाचे सुशोभिकरण लोकार्पण कार्यक्रम झाला. त्यात जरी मनस्वी आनंद असला तरी काही गोष्टींचा खेद वाटतो. चौकात भव्य-दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिमाखात उभा आहे. हा चौक समस्त मराठा समाजाचाच नव्हे तर समाजातील बारा बलुतेदार तथा अठरा पगड जातीचा अस्मितेचा भाग आहे.

यासंदर्भात १३ फेब्रुवारी २०१९ रोजी चाळीसगाव नगरपालिकेच्या सभागृहाने आमदार होण्यापूर्वी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशा रमेश चव्हाण तसेच सभागृहातील विरोधी पक्षनेते तथा तत्कालीन आमदार राजीव देशमुख, गटनेते संजय रतनसिंग पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश रामचंद्र स्वार, सुरेश हरदास चौधरी यांसह सभागृहातील सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ठराव क्र. ६११ अन्वये एकमताने मंजूर केला होता.

त्याचप्रमाणे पुतळा उभारण्याच्या संघर्षात तत्कालीन आमदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील, शिवप्रेमी संघटना, नगरसेवक प्रदीप आधार निकम, समता सैनिक दलाचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल, संभाजी सेनेचे लक्ष्मणबापू शिरसाठ, रयत सेनेचे गणेश पवार व असंख्य शिवप्रेमी संघटना यांच्या स्वप्नपुर्तीसाठी ठराव केला होता. परंतु खेदाने नमूद करावेसे वाटते की, सुशोभिकरण झालेल्या चौकास आपल्या नावाची संकल्पना देवून आपले नाव त्यावर प्रकाशित करुन आ.मंगेश चव्हाण यांनी समस्त चाळीसगाव नागरिकांसह नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक, शिवप्रेमी संघटना तसेच चाळीसगाव शहरातील शिवभक्त जनतेचा आपण अनादर करीत आहात, हे दुर्दैवी आहे.

त्यामुळे आपण चौकास आपण संकल्पना असे नाव लावणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे संकल्पना हे नाव आपण लोकार्पणापूर्वी तात्काळ न काढल्यास येणाऱ्या काळात जनतेच्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या उद्रेकास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे सांगून आपण त्वरित संकल्पना हे नाव तात्काळ काढून टाकावे,

अशी मागणी केल्याने भाजपच्या आमदाराविरोधात भाजपचे शहराध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख, नगरसेवक घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील यांनी केल्याने जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.घृष्णेश्वर पाटील यांचे गंभीर आरोपाचे, परखड स्वभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here