Author: saimat

मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी कासगंज येथे सांगितले की, संविधान आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी तत्कालीन सरकारने कारसेवकांना पाहताच त्यांच्यावर गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तत्कालीन सरकारने आपले कर्तव्य बजावले होते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य मंगळवारी गणेशपूर येथे बौद्ध एकता समितीच्या वतीने आयोजित बौद्ध जनजागृती परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले, त्यावेळी तत्कालीन सरकार आपले कर्तव्य बजावत होते. ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरात…

Read More

नगर ः राष्ट्रवादी कांँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद माजी सदस्य राणी लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत आपण किंवा पती आमदार लंके निवडणूक लढवणारच असा मनसुबा जाहीर करत, मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. महायुतीत नगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे सध्या प्रतिनिधित्व करतात. पुन्हा उमेदवारी करण्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावोगाव साखर आणि चणाडाळ वाटप करत जनसंपर्काची मोहीम सुरू केली आहे. राणी लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्ष, चिन्ह कोणता याची वाच्यता न करता केवळ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. खासदार विखे व आमदार लंके दोघेही महायुतीत असले तरी दोघांतील…

Read More

नागपूर : भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामीळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल त्यांना आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते.साधारणपणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागातील घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते. या जंगलात अनेक लहानमोठे हिंस्त्र प्राणी आहेत. येथे राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे झाडाखाली राहात जेवढे सामान सोबत नेले, तेवढ्यावरच संशोधकांनी गुजराण केली. २०१५ ला अमित सैय्यद व त्यांच्या चमुला यश आले…

Read More

मुंंबई ः प्रतिनिधी येथील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (ठाकरे गट)नेते,आदेश बांदेकर यांना हटवले आहे.आदेश बांदेकर यांच्याऐवजी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून सदा सरवणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची निवड झाली आहे. याबद्दल सदा सरवणकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा!, असे प्रसाद लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला होता…

Read More

लंडन ः वृत्तसंस्था मानवी आयुष्य वाढवण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या अनेक देशांत संशोधनाचा स्तर वेगाने वाढत आहे. इनसाइट ॲनालिटिक्सनुसार, भलेही या क्षेत्रात संशोधन प्राथमिक अवस्थेत असले तरी दीर्घायुष्य विज्ञान क्षेत्र एक अब्जावधी डॉलरचा उद्योग होण्याच्या तयारीत आहे. हे २०३० पर्यंत १६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षांत ब्रिटन वय वाढवण्याच्या संशोधनात आघाडीची भूमिका बजावत आहे. ब्रिटनमध्ये या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अनेक स्टार्टअप आहेत. सध्या अनेक वर्षांपासून केलेल्या अभ्यासाच्या आधारावर तज्ज्ञांनी ब्रिटनमध्ये २०२० मध्ये जन्मलेल्या मुलींपैकी जवळपास ९० वर्षांपर्यंत आणि मुली जवळपास ८७ वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात पेशी जीर्णतेतील तज्ज्ञ प्रा. लिन…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी स्थानिक म्युनिसिपल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एस. राठोड यांच्या हस्ते दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षकांकडून सामूहिक शपथही घेण्यात आली. शाळेच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. ‘राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू. तसेच देशवासियांमध्ये हा संदेश पोहचविण्यासाठी भरीव प्रयत्न करू, आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी विशेष अधिवेशन बोलाविण्यास आदेशित करून मराठा समाजाच्या वर्षानुवर्ष प्रलंबित आरक्षणाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजास न्याय देण्यात यावा, अशी मागणी आ.राजेश एकडे यांनी थेट राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. यासंदर्भात आ.एकडे यांनी मलकापुरातील साखळी आंदोलनकर्ते समाज बांधवांना अवगत केले. आ.एकडे यांनी मलकापुरातील साखळी उपोषण सुरू केलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात मराठा समाज इतर मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्वतंत्र आरक्षणाच्या मागणी करता सतत उपोषण आणि आंदोलने शांततेच्या मार्गाने करीत आहेत. परंतु राज्य शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे मराठा समाजाला अद्यापपर्यंत आरक्षण रूपी हक्क मिळालेला नाही. सद्यस्थितीत मराठा समाजाच्या रास्त मागणीसाठी आ.राजेश…

Read More

साईमत कजगाव, ता.भडगाव प्रतिनिधी येथे गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी कजगाव ग्रामपंचायत सदस्यांनी आणि उबाठाच्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर येथून जवळील पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील दोन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि तांदुळवाडी येथील महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला आहे. दोन्ही गावांनी लोकप्रतिनिधींना व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव केलेला आहे. तालुक्यासह राज्यात राजीनामाचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. खाजोळा येथे विनोद माणिक पाटील आणि ग्रामस्थांच्यावतीने एक दिवसीय आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थांसह नागरिक उपस्थित होते. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजीनामा सत्र सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा आणि शासनाचे लक्ष वेधून…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील दादावाडीतील आयडियल इंग्लिश मीडिअम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस)अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “इंदिरा गांधीचे प्रथम महिला पंतप्रधान म्हणून भारतीय राजकारणातील योगदान आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राज्यातील ऐक्य प्रस्थापित करण्यासाठीचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

पाटणा :  बिहारमधल्या बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. टूरीगंजे ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला. या ठिकाणी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, ८० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती. या ट्रेनचे २० डबे रुळावरुन घसरले आहेत. ज्या ठिकाणी रेल्वेचे डबे घसरले तिथे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. NDRF, SDRF, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.…

Read More