Author: saimat

सकाळी कीर्तन, सायंकाळी महाआरती अकलूद शिवारात धार्मिक उत्सवाची शोभा साईमत/फैजपूर/ पाडळसे/ /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावदा–फैजपूर रोडवरील पाडळसे येथील अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून, परिसर आधीपासूनच भक्तिमय उत्साहाने न्हालेला आहे. स्थानिक आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांनी पांडाल उभारणी, आकर्षक मंच सजावट, अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय पूर्ण केली आहे. तसेच सर्व सुविधा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि विस्तीर्ण वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षही…

Read More

प्रेमातून पेटले वैर; प्रेयसीची गोळी झाडून हत्या, प्रियकराची आत्महत्या साईमत/अकुलखेडा (ता. चोपडा)/प्रतिनिधी : तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. प्रेयसीवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना २८ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात प्रवेश केला असता दोघांचेही…

Read More

आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीसांत गुन्हा साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) दुपारी घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव येथे संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेली १९ वर्षीय तरुणी शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता श्रीराम मंदिर चौकातील आपल्या आजीच्या घरी गेली होती. गच्चीवर पापड वाळत घालत असताना, त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भावेश भानुदास पाटील (रा. मेहरूण) तेथे आला. दरम्यान, त्याने तरुणीचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या…

Read More

सोशल मीडियावरील तक्रारींना प्रतिसाद; पाच हातगाड्या जप्त, नागरिकांनी व्यक्त केले समाधान साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने दखल घेत धडक कारवाई केली. शनिवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करत दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले. शनिपेठेतील बळीराम मंदिर व शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते लोटगाड्या लावून किंवा रस्त्यावर बसून विक्री करत होते. त्यामुळे जवळपास ७० टक्के रस्ता अडवला जात होता. वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा राहत नव्हती. विशेषतः शनिवारी गर्दीच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट होत होती. काही विक्रेत्यांकडून अरेरावीचे प्रकारही होत…

Read More

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकार उघड; सेवानिवृत्त नागरिकाचे घर लक्ष्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील कोल्हे नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुरलीधर नारायण धांडे (वय ७५) हे सेवानिवृत्त असून ते काही कारणास्तव घरी नसताना ही घटना घडली. २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी संधी साधली. घर बंद असल्याचे लक्षात येताच अज्ञात आरोपींनी मुख्य…

Read More

“महिलांच्या उद्योजकतेला व स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे साईमत/जळगाव/प्रतिनिधी महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव महानगरपालिका व महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे सागर पार्कमध्ये भव्य उद्घाटन झाले. महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते सुरू झालेल्या महोत्सवात शहरातील प्रशासनिक अधिकाऱ्यांपासून नगरसेवकांपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सकाळी १० वाजता सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत आयोजित केला जात आहे. उद्घाटन प्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल…

Read More

  न्यायालय विचारते: आयुक्तांना अटक का केली जाऊ नये? साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील हुडको घरकुल योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल २५ वर्षांनंतरही न दिल्यामुळे, जळगाव दिवाणी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला जोरदार चपराक दिला आहे. न्यायालयाने महापालिका आयुक्तांना “तुम्हाला अटक करून दिवाणी कारागृहात का पाठविण्यात येऊ नये?” अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी हे प्रकरण १९९९ सालापासून प्रलंबित आहे. महापालिकेने शिवाजी नगर येथील हुडको योजनेसाठी श्रीराम गोपालदास खटोड (रा. जयनगर, जळगाव) यांच्या मालकीची दोन एकर जमीन संपादित केली होती. मात्र, जमीन घेऊनही योग्य मोबदला देण्यास प्रशासनाकडून सातत्याने दिरंगाई…

Read More

महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार नवे नेतृत्व साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई कोल्हे यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभापतीपदासाठी एकमेव वैध अर्ज दाखल झाल्याने ही निवड निर्विवाद ठरली असून शहरातील महिला व बालविकासाच्या कामांना आता नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महानगरपालिकेत आयोजित विशेष सभेला महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सभापतीपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. पीठासन अधिकारी मीनल करणवाल यांनी सिंधुताई कोल्हे यांचा अर्ज वैध ठरवत त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली. निवड…

Read More

माधवनगर परिसरातील घटना; निवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांची धाड साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील गजबजलेल्या माधवनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीतच धाडसी घरफोडी करत तब्बल २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेल राणी पार्क समोरील भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे भारत सुलतान संसारे (वय ५९) हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. १५ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी २ लाख रुपयांची रोख…

Read More

पंचर काढताना साधली संधी; डिक्कीतून लाखो रुपये गायब साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या बस स्थानक परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीने व्यापारी व नागरिकांत खळबळ उडाली आहे. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल ८ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने क्षणात लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारे प्रेम महारू जाधव (वय ३५) हे एका खाजगी संस्थेत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ बीके ८१७६) वरून जुन्या बस स्थानकाजवळील संघवी पाईप परिसरातील…

Read More